Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अशी कबुतरे येती...

अ — अत्रुप्त आत्मा, Sat, 03/12/2016 - 14:04
सध्य:स्थितीत रहात असलेल्या जागेत ह्या कबुतरांनी ग्यालरीत जे डांबरी'करण सुरु केलय..त्याला तोड नाही.खरच नाही. कारण घासून काढायला पत्रा किंवा फावडं जरी वापरलं तरी "ते वाळलेले" तुटत काहि नाही. मेलं इथे उद्वेगानी "श्शी!" पण म्हणता येत नाही! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif त्यामुळे त्याच सदर उद्-वेगातून ह्ये वेगवान विडंबन बाहेर पडलेले आहे. ते त्याच भावनेनी वेचावे...सॉरी, वाचावे! ,अशी विनम्र विनंती.(नैतर काहि हुच्च अभिरूचीसंपन्नतावादी येतील परत आपले किरटे नाक घेऊण हुंगायला! ) पहावं तिथे ह्यांची हागी पडलेली,आणि त्यात ती मेली म्हणे ऑक्साइडं असतात..त्यानी ग्यालरीच्या लादीची पुरती वाट लागते,किंवा वाळत टाकलेल्या कपड्यांवर जर "ती" पडली,तर ते वाटेला लागतात. (ह्या हागी शब्दावरूनच ल्हान मुलांच्या डायपर नामक वाळून योग्य जागी कडक-होणार्‍या वस्त्रास 'हागीज' असे उत्-प्रेरक नाव पडले असावे काय!? ;) ) असो! अशी कबुतरे येती आणिक हागी सोडूनी जाती दोन शिटे ती सांडत सांडत,ग्यालरी रंगवूनी जाती॥धृ॥ वि'हंग पहिला तारेवरला, शिटण्यासाठि उभा राहिला जरा बाजूनी पाय सरकूनी, खाली-सोडूनी देती हकलून देता पुन्हा आले, जिथे बसावे तिथे(च्च!) बैसले धुतले नंतर तरि निरंतर बाधित झाली लादी पंख एक तो हळू थरथरला,शेपटी मागून वरी उचलंला वाळत पडल्या कपड्यांमधूनी, ओघळ खाली येती किती करावी? यांस हकाटी, हुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र करोनी फिरवूनि काठी त्या भरल्या कठड्यांच्या गाथा, याद अजुनही देती ==========================================

प्रतिक्रिया द्या
18883 वाचन

💬 प्रतिसाद (57)
न
नाखु Mon, 03/14/2016 - 08:14 नवीन
कवी आणि धन्य ते रसीक (चतुर गुणग्राही,चलाख भावविभोर वगैरे) आज कबुतरेही आप्लया कर्माने कृतकृत्य झाली असतील. अति अवांतर : पोपशास्त्रींकडे कबुतरे उडविण्याचा किंवा टाळण्याचा उपाय असेल असे वाटते. माहीती देवाण घेवाण केल्यानेच साहीत्य निर्मीती होते असे मुवी बाबा म्हणतात ते खोटे नाही . पार वाच लेला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 03/14/2016 - 08:41 नवीन
@ह्या निमित्ताने आम्हाला तुम्ही तुमच्या चाहत्यांच्या जगात स्थाण द्यावे ही प्रलंबित मागणी आम्ही पुन्हा रेटत आहोत.>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
च
चौकटराजा Mon, 03/14/2016 - 08:46 नवीन
बुवाना कबुतरांचा एक फायदा जरूर आहे. त्याना वश करून घ्या बुवा ! सिन्हगड रोडचे सेन्द्रिय डांबरीकरणाचे कंत्राट मिळेल. शिवाय मॅगसेसे सारखे एखादे पारितोषिक या " नव्या" प्रयोगासाठी मिळेल.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 03/14/2016 - 08:46 नवीन
बुवाना कबुतरांचा एक फायदा जरूर आहे. त्याना वश करून घ्या बुवा ! सिन्हगड रोडचे सेन्द्रिय डांबरीकरणाचे कंत्राट मिळेल. शिवाय मॅगसेसे सारखे एखादे पारितोषिक या " नव्या" प्रयोगासाठी मिळेल.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 03/14/2016 - 09:00 नवीन
परत एकदा =)) =))
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 03/14/2016 - 10:33 नवीन
याच प्रतिभासंपण्णतेचे आम्ही फॅण आहोत.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 03/14/2016 - 10:43 नवीन
सूड उगवला (धाग्यावर )! सर्व संबधीतानी ह घेणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा