Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

६ वी क्रिकेट ट-२० विश्वचषक स्पर्धा - २०१६

श
श्रीगुरुजी
Sun, 03/13/2016 - 10:45
🗣 180 प्रतिसाद
क्रिकेटच्या २० षटकांच्या सामन्यांची ६ वी विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे. स्पर्धेत एकूण २ गट आहेत. गट १) इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंका, अफगाणिस्तान गट २) भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश किंवा ओमान (बहुतेक बांगलादेश पात्र ठरेल असे वाटते) गट २ हा गट १ च्या तुलनेत जास्त चुरशीचा वाटतो. २००७ मध्ये प्रथमच या स्पर्धेला सुरूवात झाली. त्या स्पर्धेत अनपेक्षितपणे भारत विजेता ठरला. आतापर्यंत खालील देश विजेते व उपविजेते ठरले आहेत. १) २००७ - भारत विजेता, पाकिस्तान उपविजेता २) २००९- पाकिस्तान विजेता, श्रीलंका उपविजेता ३) २०१० - इंग्लंड विजेता, ऑस्ट्रेलिया उपविजेता ४) २०१२ - वेस्ट इंडिज विजेता, श्रीलंक उपविजेता ५) २०१४ - श्रीलंका विजेता, भारत उपविजेता ६) २०१४ - ? आतापर्यंत श्रीलंकेने १ विजेतेपद व २ वेळा उपविजेतेपद मिळविले आहे. भारत व पाकिस्तान या दोघांनीही एकदा विजेतेपद व एकदा उपविजेतेपद मिळविले आहे. परंतु या स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी भारताच्या तुलनेत जास्त चांगली आहे कारण पहिल्या ४ स्पर्धेत पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचला होता, तर भारत आजतगायत फक्त दोन वेळा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आश्चर्य म्हणजे ५ वेळा एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळविणार्‍या ऑस्ट्रेलियाला ही स्पर्धा आजवर एकदाही जिंकता आलेली नाही. तसेच एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेप्रमाणे दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड यांना आजवर कधीही अंतिम फेरीत प्रवेश मिळालेला नाही, मग विजेतेपद लांबच राहिले (एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत २०१५ मध्ये न्यूझीलंड प्रथमच अंतिम फेरीत पोहोचले होते, परंतु तिथे त्यांचा पराभव झाला). एकंदरीत या स्पर्धेवर आजतगायत भारत, श्रीलंका व पाकिस्तान या आशियायी संघांचेच वर्चस्व राहिलेले दिसते. तसेच प्रत्येक वेळी नवीन संघ विजेता होताना दिसतो, त्यामुळे आजतगायत कोणत्याही संघाला २ वेळा विजेतेपद जिंकता आलेले नाही. एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत भारत व पाकिस्तान ६ वेळा एकमेकांविरूद्ध खेळले आहेत व सर्व ६ वेळा भारताने पाकिस्तानला हरविले. ट-२० सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेतही भारत व पाकिस्तान ३ वेळा एकमेकांविरूद्ध खेळले आहेत व सर्व ३ वेळा भारताने पाकिस्तानला हरविले आहे. तसेच या स्पर्धेत आतापर्यंत भारताने न्यूझीलंडला एकदाही पराभूत केलेले नाही. यावेळी श्रीलंकेचा संघ अगदीच नवखा आहे. पाकिस्तानचा संघ फारसा चांगला नाही व त्यांचे क्षेत्ररक्षण अत्यंत वाईट आहे. वेस्ट इंडिज संघात अनेक तगडे खेळाडू असले तरी एकत्रित संघ असे ते खेळताना फारसे दिसत नाहीत. न्यूझीलंडकडे देखील तगडे खेळाडू असले तरी त्यांची गोलंदाजी फारशी चांगली नाही व विजिगीषू वृत्तीचा अभाव दिसतो. इंग्लंडकडे ट-२० प्रकारातले फारसे नावाजलेले खेळाडू नाहीत. याउलट दक्षिण आफ्रिका, भारत व ऑस्ट्रेलिया या ३ संघांकडे कसलेले खेळाडू आहेत. माझ्या अंदाजानुसार यावेळी दक्षिण आफ्रिका, भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यापैकीच एखादा विजेता असेल. स्पर्धेचे वेळापत्रक असे आहे. १) मंगळवार १५ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. न्यूझीलंड २) बुधवार १६ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, पाकिस्तान वि. बांगलादेश/ओमान ३) बुधवार १६ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. वेस्ट इंडिज ४) गुरूवार १७ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, अफगाणिस्तान वि. श्रीलंका ५) शुक्रवार १८ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड ६) शुक्रवार १८ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. द. आफ्रिका ७) शनिवार १९ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. पाकिस्तान ८) रविवार २० मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, अफगाणिस्तान वि. आफ्रिका ९) रविवार २० मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, श्रीलंका वि. वेस्ट इंडिज १०) सोमवार २१ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश/ओमान ११) मंगळवार २२ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, न्यूझीलंड वि. पाकिस्तान १२) बुधवार २३ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, अफगाणिस्तान वि. इंग्लंड १३) बुधवार २३ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. बांगलादेश/ओमान १४) शुक्रवार २५ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान १५) शुक्रवार २५ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, द. आफ्रिका वि. वेस्ट इंडिज १६) शनिवार २६ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, न्यूझीलंड वि. बांगलादेश/ओमान १७) शनिवार २६ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. श्रीलंका १८) रविवार २७ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, अफगाणिस्तान वि. वेस्ट इंडिज १९) रविवार २७ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. ऑस्ट्रेलिया २०) सोमवार २८ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, दक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका ______________________________________________________________________

२१) बुधवार ३० मार्च, संध्याकाळी ७:०० वाजता, पहिला उपांत्य फेरीचा सामना

२२) गुरूवार ३१ मार्च, संध्याकाळी ७:०० वाजता, दुसरा उपांत्य फेरीचा सामना

______________________________________________________________________

२३) रविवार ३ एप्रिल, संध्याकाळी ७:०० वाजता, अंतिम फेरीचा सामना

______________________________________________________________________
वर्गीकरण
क्रिकेट क्रीडा ट-२० मर्यादित स्पर्धा

प्रतिक्रिया द्या
25952 वाचन

💬 प्रतिसाद (180)
V
viraj thale Sun, 03/13/2016 - 11:32 नवीन
चुकुन 2016 च्य ऐवजी 2014 टाईप झालें अहे ते बघा .
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 03/13/2016 - 16:10 नवीन
हो. ती चूक धागा प्रकाशित केल्यावर लक्षात आली. संमंला सांगून दुरूस्त करता येईल. परंतु किरकोळ चूक असल्याने तशीच राहिली तरी हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: viraj thale
त
तुषार काळभोर Sun, 03/13/2016 - 12:01 नवीन
१) भारत (नियोजनबद्ध रितीने सरावासाठी श्रीलंका व ऑस्ट्रेलियाविरुद्धा ट२० मालिका खेळवल्या गेल्या. तसेच ट२० आशियाचषकाचे आयोजनः यामुळे भारतीय संघाचा आंतरराष्ट्रीय ट्२०चा चांगला सराव झालाय. विशेष म्हणजे या सर्व स्पर्धा जिंकल्या आहेत व संघ ब-यापैकी कायम ठेवलाय) २) ऑस्ट्रेलिया: युवा व गुणवत्तापुर्ण संघ ३) न्युझीलंड/द आफ्रिका: कचखाऊ वृत्ती टाळली, तर स्फोटक कामगिरी करणारे खेळाडू ४) बांग्लादेशः आशियाचषकात नुकतेच उपविजेते ठरले आहेत. उपखंडातील वातावरणात ते उपांत्यफेरीत दाखल झाले तर आश्चर्य वाटणार नाही. ५) पाकिस्तानः उत्कृष्ट वेगवान गोलंदाजीची परंपरा कायम आहे. (ट२० आशिया चषकात मो आमिर ज्या प्रकारे गोलंदाजी करत होता- आपण फिदा झालो! मीरपूरला पाकिस्तानला ८३मध्ये गुंडाळल्यानंतर भारताविरुद्धा त्याने जे पहिले षटक टाकले होते...) फलंदाजांनी साथ दिली तर उपांत्य फेरी नक्की ६) वेस्टइंडीजः ट२० मध्ये दरारा असणारे स्फोटक फलंदाज व गोलंदाज. एकाहाती एका षटकात सामन्याला कलाटणी देऊ शकतील असे खेळाडू. सातत्यपुर्ण सांघिक खेळ केला तर अंतिम फेरी गाठण्याची शक्यता. ७) श्रीलंका: अनुभवाची कमतरता असली तरी उपखंडातील वातावरणात उपांत्य फेरी गाठू शकतात.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 03/13/2016 - 16:39 नवीन
वरील विश्लेषण बरेचसे बरोबर वाटले तरी श्रीलंका उपांत्य फेरी गाठू शकेल असे वाटत नाही. त्यांचा मुख्य गोलंदाज मलिंगा दुखापतीमुळे किती सामने खेळेल याविषयी साशंकता आहे. तो खेळला तरी त्याच्या गोलंदाजीत पूर्वीची धार राहिलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यांचे बहुतेक खेळाडू नवीन आहेत. त्यामुळे श्रीलंका उपांत्य फेरीत येईल असे वाटत नाही. बांगलादेश आशिया चषकात उपविजेते ठरले होते. त्यांचे मुख्य फलंदाज तमीम इक्बाल, सौम्या सरकार, शब्बीर रहमान, महंमदुल्ला इ. सध्या प्रचंड फॉर्मात आहेत. हे फलंदाज सध्या जवळपास सर्व सामन्यात प्रचंड धावा करीत आहेत. परंतु बांगलादेशची कामगिरी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच कळसाला पोहोचली असे वाटत आहे. प्रत्यक्ष स्पर्धेत दुय्यम संघ नसून भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान अशा तुलनेने तगड्या संघाबरोबर त्यांना खेळायचे आहे. त्यांची फलंदाजी चांगली असली तरी गोलंदाजी दुर्बल आहे. त्यामुळे तेही उपांत्य फेरीत येतील असे वाटत नाही. भारत, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका नक्कीच उपांत्य फेरीत येतील असा अंदाज आहे. चौथा संघ वेस्ट इंडिज किंवा इंग्लंड असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
R
Rahul D Sun, 03/13/2016 - 16:28 नवीन
क्रिकेट पहिल्या सारखा खेळ राहिला नाही. जुन्या मॅचेसची सर नवीनला नाही.. काय बोलता ???
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sun, 03/13/2016 - 17:28 नवीन
तमिम इक्बालने या कपमधील पहिली सेंच्युरी काढली
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/14/2016 - 09:17 नवीन
तमीम इक्बाल गेल्या काही सामन्यात खोर्‍याने धावा करीत आहे. या स्पर्धेच्या पात्रता फेरीत तीनही सामन्यात तो चांगला खेळला. तो आणि बांगलादेशाचा संघ स्पर्धा सुरू होण्याआधीच peak झालेत असं वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ब
बेकार तरुण Mon, 03/14/2016 - 04:18 नवीन
काल हॉलंड वि. आयर्लॅड मॅच चांगली झाली (लुटुपुटुची ६ षटकांची होती तरि). खासकरुन सीलार ह्या डच खेळाडूने केव्हिन ओ'ब्रायनचा घेतलेला झेल फारच अप्रतिम होता. बघीतला नसेल तर यु ट्युबवर जरूर बघा.
  • Log in or register to post comments
च
चेक आणि मेट Mon, 03/14/2016 - 07:13 नवीन
दक्षिण अफ्रिका किंवा भारत जिंकेल असा अंदाज आहे.
  • Log in or register to post comments
च
चेक आणि मेट Sun, 03/27/2016 - 19:10 नवीन
द.अफ्रिकेचा तर गाशा गुंडाळलेलाच आहे,आता बघुया भारताचं काय होतय ते! 22 बाॅल 46 रन्स हवेत. अंदाज चूकू नये अशी आशा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
च
चेक आणि मेट Sun, 03/27/2016 - 19:25 नवीन
गोली से डर नही लगता,मगर कोहली से लगता है|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
च
चेक आणि मेट गुरुवार, 03/31/2016 - 19:34 नवीन
अंदाज चुकला,भारतसुद्धा बाहेर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
श
श्रीगुरुजी Mon, 03/14/2016 - 09:19 नवीन
१५ मार्च ते ३ एप्रिल याच काळात महिला ट-२० विश्वचषक स्पर्धा देखील भारतात होत आहे. या स्पर्धेत देखील १० संघ आहेत. एकच फरक आहे. पुरूष स्पर्धेत १० संघ अफगाणिस्तान आहे तर महिला स्पर्धेत त्याऐवजी आयर्लँड आहे. काल बांगलादेशाने ओमानला हरविल्यामुळे ओमान स्पर्धेतून बाहेर पडला असून बांगलादेश आत आलेला आहे. अर्थात हे अपेक्षितच होते.
  • Log in or register to post comments
D
DTPS Mon, 03/14/2016 - 09:30 नवीन
बांगलादेश ला नजर अन्दाज करुन चालनार नाहि ...सध्या अप्रतिम कामगिरि करताय्त ते
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Mon, 03/14/2016 - 11:53 नवीन
या स्पर्धेच्या निमित्ताने बीसीसीआय चे राजकारण परत एकदा दिसले. अनुराग ठाकुर आला की ठेवल्या धरमशाला ला मॅचेस, शशांक मनोहरमुळे नागपुरला ठेवल्या. श्रीनिवासन यांची सद्दी संपली आता चेन्नईला, हैद्राबादला एक पण मॅच नाही. काही राजकारण करायचे आहे ते तुमच्या तुमच्यात करा क्रिकेट रसिकांना त्याची शिक्षा कशाला?
  • Log in or register to post comments
V
viraj thale Mon, 03/14/2016 - 12:17 नवीन
टी 20 विश्वचषक स्पर्धेचे पात्रता फेरीचे सलग दोन सामने जिंकल्यामुळे बंगलादेश संघाचा आत्मविश्वास वाढला असला तरी बांगला समर्थक मात्र मंगळावर पोहोचले आहेत ,भारताला आपल्याच भूमीमध्ये लोळवण्यची भाषा करत आहेत .भारतीय संघ लवकरच त्यांना जमिनीवर आणेल .
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Mon, 03/14/2016 - 12:26 नवीन
आजच्या सराव सामन्यात इंग्लंड आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन एकादश यात लढत आहे. इंग्लंडचे ४ खेळाडू बटलर, विली ,विन्स आणि रशिद मुंबईकडून खेळतायत. मित्र-मित्र टीम पाडून खेळतात तसं वाटतयं :-)
  • Log in or register to post comments
V
viraj thale Mon, 03/14/2016 - 12:49 नवीन
अफ्रीदी पुन्हा डक वर बाद
  • Log in or register to post comments
म
मोहन Tue, 03/15/2016 - 05:26 नवीन
आज न्युझीलंड कोहली आणि कं ला जमिनीवर आणेल काय ? ट२० मध्ये भारताने अजुन न्युझीलंडला हारवले नाही म्हणतात !
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 03/15/2016 - 05:28 नवीन
आज ७:३० वाजता भारत वि. न्यूझीलंड हा उद्घाटनाचा सामना नागपूरमध्ये आहे. नागपूरमध्ये पावसाचे सावट असल्याने सामन्यावर प्रश्नचिन्ह आहे. भारत व न्यूझीलंड एकमेकांविरूद्ध ४ ट-२० सामने खेळले आहेत व चारही सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. न्यूझीलंडची फलंदाजी ताकदवान आहे पण गोलंदाज फारसे चांगले नाहीत. फलंदाजीत त्यांच्याकडे केन विल्यम्सन, रॉस टेलर, कोरी अँडरसन, गप्टिल, मुन्रो, राँकी, अष्टपैलू ग्रँट इलियट व सॅंटनर असे तगडे फलंदाज आहेत. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, सौदी, मॅकलेनघॅन, मिलने हे मध्यम/जलदगती गोलंदाज व नेथन मॅकलम्, सँटनर हे फिरकी गोलंदाज आहेत. कोरी अँडरसन व इलियट देखील कामचलावू गोलंदाज आहेत. मॅकलेनघॅन आयपीएलमध्ये बर्‍यापैकी यशस्वी झाला होता. मुंबई इंडीयन्सकडून खेळताना अनेक सामन्यात तो १८ वे षटक व मलिंगा १९ वे षटक टाकायचे. दोघेही त्या दोन षटकात खूप कमी धावा देऊन किमान २-३ बळी मिळवून सामना मुंबईच्या बाजूला झुकवायचे. दुपारी ३:३० वाजता भारत वि. बांगलादेश हा महिलांचा ट-२० सामना आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/16/2016 - 10:12 नवीन
न्यूझीलंडविरूद्धची पराभवाची परंपरा खंडीत झाली नाही. अगदी वाईट पद्धतीने हरलो. भारतीय संघ ठणठणीत खेळपट्ट्यांवरच वाघ आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. मागील महिन्यात गहुंजेच्या गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर भारत असाच हरला होता. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने खेळपट्टीचे स्वरूप अचूक ओळखून साउदी, बोल्ट, मॅकलेनघॅन असे मध्यमगती गोलंदाज बाहेर ठेवून तब्बल ३ फिरकी गोलंदाज खेळविले. तसे पाहिले तर हे दुय्यम गोलंदाज आहेत. परंतु त्यांची गोलंदाजी भारताला खेळताच आली नाही. केन विल्यमसन पंचाच्या चुकीच्या निर्णयाचा बळी ठरला नसता तर न्यूझीलंडने अजून जास्त धावा केल्या असत्या. रैना, जडेजा व युवराज ज्या पद्धतीने बाद झाले हे आश्चर्यकारक होते. हवेने टम्म फुगलेला फुगा एक टाचणी लावताक्षणी फुटुन लोळागोळा होऊन पडतो, तसाच अपेक्षांच्या ओझ्याने टम्म फुगलेला भारतीय संघ केवळ एकाच सामन्यात पार लोळागोळा होऊन गेला. आता उर्वरीत तीनही सामने जिंकावे लागतील. २०१४ ची ट-२० विश्वचषक स्पर्धा बांगलादेशात झाली होती. त्यात यजमान बांगलादेश सर्व ४ सामने हरला होता. अगदी अफगाणिस्तानने सुद्धा बांगलादेशाला हरविले होते. तसेच यावेळी होते की काय अशी पाल चुकचुकते आहे. आज खालील सामने आहेत. २) बुधवार १६ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, पाकिस्तान वि. बांगलादेश/ओमान ३) बुधवार १६ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. वेस्ट इंडिज संध्याकाळी ७:३० वाजता महिला स्पर्धेत वेस्ट इंडीज वि. पाकिस्तान हा सामना आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/18/2016 - 12:23 नवीन
भारताचा दणदणीत पराभव केलेल्या किवीज् संघाने आज ऑसीज विरूद्ध निराशा केली. पहिल्या ६ षटकात नाबाद ५८ अशा भक्कम स्थितीतून ते शेवटी २० षटकात ८ बाद १४२ इतक्याच धावा करू शकले. ऑसीजने आतापर्यंत २ षटकात नाबाद १९ धावा केलेल्या आहेत. खेळपट्टी निर्जीव असल्याने ऑसीज आरामात जिंकतील असा अंदाज आहे.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 03/18/2016 - 13:54 नवीन
गुरुजी कांगारु हरले याला भारतासाठी फायदेशीर निकाल म्हणावे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
द
दुश्यन्त Fri, 03/18/2016 - 14:02 नवीन
२०-२० षटकांचे सामने असतात आणि १५-२० चेंडूत स्थिती इकडची तिकडे होते. निष्कर्ष काढून पोस्ट टाकण्यापेक्षा थोडा वेळ वाट पाहिलेली उत्तम. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात पहिली इनिंग संपल्यावर सगळ्यांना असेच वाटले होते. प्रत्यक्षात आपण वाईट रीतीने हरलो.
  • Log in or register to post comments
ए
एकनाथ जाधव Fri, 03/18/2016 - 14:21 नवीन
न्युझीलन्ड विजायी चक्क अस्त्रोलीयाला हरवल
  • Log in or register to post comments
न
नया है वह Fri, 03/18/2016 - 14:27 नवीन
न्युझीलन्ड,वेस्ट इंडिज,दक्षिण आफ्रिका नक्कीच उपांत्य फेरीत येतील असा अंदाज आहे. भारत, ऑस्ट्रेलिया मधे उपांत्य फेरी साठी चुरस राहील.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 03/18/2016 - 16:32 नवीन
हा आकडा जरा (की बराच) जास्तंच आहे. दाफ्रिका पार सुटलीये. -गा.पै.
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 03/18/2016 - 16:36 नवीन
उद्या, पाकिस्तानविरुद्ध आपल्याला कठीण जाणार आहे. हरल्यास तिथेच सर्व संपेल. पण मॅचेस जर तिकीटबारीवर नजर ठेवून फिक्स असल्या, तर भारत नक्कीच अंतिम फेरीत पोचेल. शमीला बाहेर ठेवून पंड्या आत, हे काही पटले नाही.
  • Log in or register to post comments
स
स्पार्टाकस Fri, 03/18/2016 - 16:47 नवीन
Proteas gangbanged Poms!
  • Log in or register to post comments
स
स्पार्टाकस Fri, 03/18/2016 - 17:50 नवीन
.... And now its payback time for Proteas!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस
च
चेक आणि मेट Fri, 03/18/2016 - 17:13 नवीन
द.अफ्रिका vs इंग्लंड 230 चा पाठलाग जोरदार सुरू आहे. कल्लूळाचं पाणी कशाला ढवळलं,पोरी जरा जपून दांडा धर ही गाणी मैदानावर लावत आहेत. मज्जाच येतेय:'(
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 03/18/2016 - 17:49 नवीन
मजा आया बॉस! मस्त पाठलाग चाललाय. आवश्यक धावगती १२ च्या आत आहे. आजून ८ षटकं बाकी. -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 03/18/2016 - 17:50 नवीन
आ.धा. ११ च्या आत हवं होतं. क्षमस्व. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Fri, 03/18/2016 - 18:03 नवीन
१५ षटकांत दाफ्रिका १६६/३ तर इंग्लंड १८३/४. २३० चा पाठलाग जोरदार चाललाय. -गा.पै.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 03/18/2016 - 18:09 नवीन
भलताच अटीतटीचा सामना चालु आहे! आतापर्यन्त इंग्लंड कोणाच्या खिजगणतीतही नव्हतं! :)
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 03/18/2016 - 18:29 नवीन
शेवटच्या षटकात १ धाव हवीये. गो इंग्लंड गो! -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे Fri, 03/18/2016 - 18:29 नवीन
अफ्रिकेचा धुव्वा
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 03/18/2016 - 18:31 नवीन
पहिल्याच चेंडूवर जॉर्डन बाद! ५ चेंडून १ धाव पाहिजे! -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 03/18/2016 - 18:32 नवीन
दुसऱ्या चेंडूवर मोईन आली बाद! -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 03/18/2016 - 18:33 नवीन
‌
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Fri, 03/18/2016 - 18:33 नवीन
‌
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Fri, 03/18/2016 - 18:34 नवीन
‌
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 03/18/2016 - 18:35 नवीन
चोकर्स चोकले!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/19/2016 - 13:01 नवीन
काल दोन्ही अंदाज चुकले. न्यूझीलंडने फक्त १४२ धावा केल्यावर व ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज सुरूवात केल्यावर ऑस्ट्रेलिया सहज जिंकेल असे वाटले होते. परंतु न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करून ठराविक अंतराने बळी मिळविले आणि अवघड वाटणारा सामना जिंकला. दुसस्या सामन्यात आफ्रिकेने २२९ धावांचा डोंगर रचल्यावर इतर कोणताही संघ २३० धावा करू शकेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. परंतु पहिल्या षटकापासूनच इंग्लंडच्या रॉय आणि हेल्सने पहिल्या ४.३ षटकातच तब्बल ७१ धावांची जोरदार सलामी दिली. अक्षरशः पहिल्या चेंडूपासूनच दोघांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांची पिटाई सुरू केली. पहिल्या षटकात २१, दुसर्‍यात २३ अशी सुरूवात करून आफ्रिकेच्या गोलंदाजांची पिसे काढली. डेल स्टेन ट-२० या प्रकारात फारसा यशस्वी ठरत नाही हे दिसून आले. आफ्रिकेने मॉर्नी मॉर्केलला बाहेर ठेवण्याची मोठी चूक केली. गोलंदाजांनी तब्बल २२९ धावा हातात असूनसुद्धा अत्यंत खराब गोलंदाजी केली. ३ वेळा वाईड चेंडू यष्टीरक्षकाला चकवून सीमापार झाल्याने फुकट १५ धावा दिल्या. पहिल्या ६ षटकात इम्रान ताहिरला आणायला हवे होते. आज महालढत आहे. पावसामुळे सामन्यावर कितपत परीणाम होईल ते कळेलच. पावसामुळे सामना रद्द झाला भारताची अडचण होईल. आज भारत वि. पाकिस्तान हा महिलांचा सामना सुरू आहे. या सामन्यातही भारताची वाट लागलेली आहे. भारतीय महिलांनी २० षटकात फक्त ७ बाद ९६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानची स्थिती आता ५.२ षटकात १ बाद ३३ अशी आहे. असेच सुरू राहिले तर पाकिस्तानी महिला सहज विजय मिळवतील.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/19/2016 - 13:55 नवीन
महिलांचा भारत वि. पाकिस्तान हा सामना रंगतदार अवस्थेत आहे. भारताच्या ७ बाद ९६ चा पाठलाग करताना पाकिस्तान एकवेळ १४.१ षटकात ३ बाद ७१ अशा चांगल्या स्थितीत होते. विजयासाठी ३५ चेंडूत फक्त २६ धावा हव्या होत्या. नंतर १५ व्या षटकात भारताने १ बळी मिळविला व नंतर १६ व्या षटकाच्या ४ थ्या व ५ व्या चेंडूवर लागोपाठ २ खेळाडू धावबाद झाल्याने १६ षटकात पाकिस्तानची अवस्था ६ बाद ७७ अशी झाली. पण अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्याने सामना थांबविला आहे. डकवर्थ-लुईस नियमानुसार १६ षटकात पाकिस्तानने ७५ धावा करणे आवश्यक आहे. म्हणजे पाकिस्तान २ धावांनी पुढे आहे. सामना पुढे खेळला गेला नाही तर पाकिस्तान विजयी घोषित होईल.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 03/20/2016 - 08:18 नवीन
काल या धाग्यावर कोणीच फिरकलेलं दिसत नाही. भारताने विश्वचषक स्पर्धेत पुन्हा एकदा पाकड्यांना धूळ चारली. पुन्हा एकदा कोहली पाकड्यांना नडला. रोहीत शर्मा, धवन आणि रैना पुन्हा एकदा अपयशी ठरले आहेत. पुढील सामन्यात या तिघांपैकी एकाला बाहेर ठेवून रहाणेला आत आणावे. कदाचित पंड्याऐवजी सुद्धा रहाणेला घेता येईल. दुसरीकडे भारतीय महिला केवळ पावसाच्या अवकृपेने हरल्या. फक्त ४ षटके शिल्लक असताना पाऊस आला. त्यावेळी दोन्ही संघांना समान संधी होती. परंतु पावसाने पाणी फिरविले. आज दुपारी द. आफ्रिका वि. अफगाणिस्तान आणि नंतर श्रीलंका वि. वेस्ट इंडीज हे सामने आहेत.
  • Log in or register to post comments
प
पक्षी Sun, 03/20/2016 - 11:01 नवीन
पुढील सामन्यात या तिघांपैकी एकाला बाहेर ठेवून रहाणेला आत आणावे
अगदी सहमत... कधी नव्हे ते इंडिया batting department मधे कमजोर वाटत आहे. १. रोहित आणि धवल अगदीच बेभरवश्याचे आहेत (धवल च्या जागी अजिंक्य राहणे ला घ्यावे) २. गेल्या २ सामन्यात batting lineup च्या मर्यादा समजल्या, फ़क़्त धोनी पर्यंत फलंदाजी आहे.(जडेंजा वाटत नाही फलंदाजीत काही करू शकतो) ३. कोहली वर फारच निर्भर आहोत, कालच्या सामन्यात कोहली खेळला नसता तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा असता. (We don't have plan B, i.e. What to do if kohli gets out early) ४. फलंदाजीत हार्ड हिटर्स ची कमतरता(हो, धोनी, युवी आणि रैना आहेत पण .....)
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 03/20/2016 - 12:38 नवीन
तो धवन लय बोअर कराय लागलाय आजकाल ! बाहेर काढलेला बरा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्षी
ज
जव्हेरगंज Sun, 03/20/2016 - 12:41 नवीन
बाकी कालचा विजय भारताचा नसून कोहलीचा झालाय असं वाटायला लागलयं. तो सोडून सगळेच ढेपाळलेले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
र
राहूल. Sun, 03/20/2016 - 13:19 नवीन
कोहली, जो रूट आणि स्टीव्ह स्मिथ हे या घडीचे क्लासी बॅट्समन आहेत . पहिले दोघे ऑर्थोडॉक्स , तर तिसरा काहीसा अनऑर्थोडॉक्स . पण हे तिघेही त्यांच्या करियरमधे ग्रेट अचिवमेंट करतील . कारकिर्द संपेल तेव्हा वन ऑफ द ग्रेटेस्ट प्लेअर्स असतील टेस्ट , वन डे आणि ट२० अशा सर्व प्रकारात .
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा