अमलेश्वर आणि खोलेश्वर - अंबाजोगाई
या वर्षी अंबेजोगाई ला जायचा योग आला.योगेश्वरी देवी कुलदेवता असल्याने तसे अधे मध्ये जाऊन येतो.लातूर एक्सप्रेस झाल्याने आता जाणे सोपे झाले आहे. पूर्वी सारखे औरंगाबाद हून बस ने वेग्रे जावे लागत नाही. लातूर ला उतरून एक गाडी केलेली होती.आमच्याच गाडीला अमित देशमुख असल्याने , सिंघम स्तैल मध्ये आधी त्याच्या २०-२५ गाड्यांचा ताफा धुरळा उडवत निघून गेला. मग इतर लोकांच्या गाड्या निघाल्या
सकाळचे लातूर स्टेशन
मध्ये पोहे आणि चहा ब्रेक झाला, लातूरहून अंबाजोगाई साधारण पन्नास किलोमीटर आहे.
गेल्यावर अंघोळी आटपून दर्शनाला गेलो.अभिषेक नेवेद्य झाला कि तसे करण्यासारखे काही नसते, आजूबाजूला फिर्ण्यासारखे पण विशेष काही नाही असे वाटत असतानाच हातातल्या एक कागदावर
अम्लेश्वर आणि खोलेश्वर अशी शिवाची दोन प्राचीन मंदिरे असल्याचे समजले. म्हटले चला काहीतरी वेगळे बघायला मिळेल.गाडी केलेली असल्याने ड्रायवर दिवसभर सोबत होताच , वैजनाथ ला अनेकवेळा गेल्याने तिकडे गेलो नाही.दुपारी जेवण झाल्यावर थोडा आराम केला, प्रचंड उकाडा होता त्यामुळे लगेच बाहेर पडणे अशक्य होते. चहा घेऊन थोडा वेळ देवळात बसलो.
योगेश्वरी देऊळ
देऊळ अगदी प्रशस्थ आहे, पूर्व आणि दक्षिण दिशेला महाद्वार आहेत. समोर दीपमाळा आहेत.चहूबाजूंनी तटबंदी आहे
देवळाच्या आवारात अनेक विरगळ, प्राचीन अवशेष विखुरलेले आहेत. पण सर्वांची अवस्था खूपच कठीण आहे
तिथून आधी अमलेश्वरा कडे निघालो, दहाव्या शतकातले मंदिर यापुढे याबद्दलची काहीही माहिती मिळाली नाही, इथले माहितगार याबद्दल मार्गदर्शन करू शकतील.पण हेमाडपंती बांधकाम वाटले नाही.
देऊळ अगदी एकांतात होते, बाकी कुणीच नव्हते. इतक्या देखण्या मंदिराची अशी अवस्था पाहून वाईट वाटले.
अमलेश्वर
गाभार्यात अप्रतिम कोरीवकाम केले होते, पण खूप अंधार असल्याने शिवाय सोबत क्यामेराही नसल्याने तसेच टिपण्याचा प्रयत्न केला
वर चढायला पायर्या होत्या, पलीकडील बाजूला एक सुंदर पाण्याचे टाके होते, इतक्या दुष्काळात या टाक्याला पाणी असलेले पाहून आश्चर्यच वाटले.
अवस्था खराब असली तरी मुळचे सौंदर्य एकेकाळचे वैभव दाखवतच होते.
देवळाच्या पायर्यांवर असे हत्ती कोरलेले आहेत
याचं हास्य लैच विकृत वाटतंय :)
माहितगार कोणी नसल्याने विशेष माहिती समजली नाही , तिथून निघून मग खोलेश्वराकडे निघालो
आता उकाड्याने परिसीमा गाठलेली होती, पण आकाशात मात्र ढग दाटून यायला लागलेले होते.
खोलेश्वर
इथे थोडी माहिती लिहिलेली दिसली,अतिशय सुंदर देऊळ पण आत भयंकर अंधार असल्याने, शिवाय सर्व भिंतींना कचकून ओईल पेंट चोपडल्याने हिरमुस झाला :(
अजूनही हातात बराच वेळ होता, म्हटले मुकुन्द्राजांची समाधी पाहून येऊ, ग्रुप मधल्या बर्याच लोकांनी पाहिलेली नव्हती
यावेळी मात्र आम्ही बरोबर वेळेला पोहोचलो, समोरच्या दरीत भरपूर मोर पाहायला मिळाले, सोबतची बच्चे कंपनी खुश झाली, पूर्ण पिसारा दाखवत उडणारे मोर पाहणे म्हणजे खरेच विलोभनीय दृश्य होते.
सूर्यदेव हळू हळू घरी पळायच्या मार्गावर होते
आम्हालाही लातूर ला पोहोचायचे असल्याने छोटी भटकंती आम्ही आटोपती घेतली आणि निघालो. लातूर ला वाडा नावाच्या एका अप्रतिम हॉटेल मध्ये जेवलो, एकदमच सुपर, झकास वातावरण निर्मिती केलेली होती, अंधारलेला वाडा, त्याचे महाद्वार, आतमध्ये स्वागताला तुळशी वृंदावन त्यात उदबत्ती पण जळत होती, खर्या तुळशीचे जंगल, नंतर विहीर , आणि आत मध्ये दगडी वाडा.एकदम अंधुक उजेड , जागोजागी कंदील लटकलेले. जेवण तर जबराटच होते. वांग्याचे भरीत, ज्वारीच्या भाकर्या, दाण्याची चटणी, हिरवा ठेचा, शेवभाजी, दही , मजबूतच अडवा हात मारला.
जेऊन बाहेर आल्यावर मात्र वातावरण बदललेले होते , दणकून विजा चमकायला लागल्या.सगळीकडे मस्त मातीचा सुवास सुटला, बारीक पावसाला सुरवात झाली, सुरवातीला गम्मत वाटत होती, पण हळू हळू विजांनी रौद्ररूप धारण केले. कसेबसे स्टेशन ला पोचलो. लातूर एक्स्प्रेस उभी होतीच. मुंबई च्या दिशेने एका सुंदर दिवसाची समाप्ती झाली
टीप : सर्व फोटो मोब्ल्यावरून काढल्याने सर्वसाधारण आलेले आहेत

💬 प्रतिसाद
(45)
अ
अनुप ढेरे
Sun, 03/13/2016 - 13:02
नवीन
फटू नाय दिसले.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 03/13/2016 - 14:06
नवीन
यु मेड इट.
योगेश्वरी देवळात आहे तो गधेगाळ आहे. खोलेश्वर हा सिंघण (दुसरा) ह्याचा सेनापती. आंबे गावात ह्याचे दोन लेख आहेत. एक बहुधा हा योगेश्वरीतील गधेगाळावरील असावा.
दुसरा लेख हा खोलेश्वर मंदिराच्या भिंतीत आहे. ह्याचे छायाचित्र दिसले नाही. खोलेश्वराची कन्या लक्ष्मी हिने रामनारायणाचे देऊळ बांधले असा उल्लेख त्या लेखात आहे. लेखात सिंघण यादव आणि खोलेश्वर ह्याची प्रशस्ती गायिली आहे. कालांतराने हे रामनारायणाचे देऊळ खोलेश्वराचा मठ ह्या नावाने ओळखले जाऊ लागले आणि सध्या हेच नाव प्रचलित दिसतेय.
अमलेश्वराचे मंदिरही भारी दिसतेय.
एकदा आंबेजोगाईला जावेच लागेल. कचकून अवशेष आहेत.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 03/13/2016 - 14:09
नवीन
स्पावड्या लेका आंबेजोगाईला येऊन गेलास? सोलापुरात भेटलो नाही त्याची कसर भरुन काढली असती. ;)
असो. अप्रतिम फोटो. शेवटचा तर लैच आवडण्यात आला आहे.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sun, 03/13/2016 - 14:35
नवीन
किती तो विनय? फोटो अप्रतिम आलेले आहेत. हे म्हणजे एखाद्या लेखकाने पेन साधं होतं म्हणून लेख फालतू झाला असं म्हणण्यासारखं आहे.
रच्याकने मराठवाडी पोहे दाखवायला हरकत नव्हती. तो प्लेटमध्ये डोंगर करुन देण्याची पद्धत खूप आवडते.
- Log in or register to post comments
स
स्पा
Mon, 03/14/2016 - 14:36
नवीन
इथे पोह्यांसोबत ठेचा आणि कढी देतात, वेगळंच काॅम्बो फोटो काढायचा राहून गेला पण
- Log in or register to post comments
अ
अजया
Sun, 03/13/2016 - 14:41
नवीन
छान वृत्तांत.
वाडा लक्षात ठेवला आहे!
- Log in or register to post comments
स
सुधांशुनूलकर
Sun, 03/13/2016 - 15:14
नवीन
वाडा लक्षात ठेवला आहे!
प्रचेतसबरोबर भविष्यात करायच्या करायच्या कट्ट्यांमध्ये एका कट्ट्याची भर घातली आहे.
- Log in or register to post comments
स
स्पा
Sun, 03/13/2016 - 16:27
नवीन
फटू दिसायला हवेत काका , प्राय्वसी सेटिंग पब्लिक ठेवलंय :(
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 03/13/2016 - 16:36
नवीन
पावड्या मोबल्यावर दिसतेत. पीसीवर नै. :(
- Log in or register to post comments
स
सुधांशुनूलकर
Mon, 03/14/2016 - 07:21
नवीन
आज सगळे फोटो दिसले
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 03/13/2016 - 17:45
नवीन
धन्यवाद....!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
स्पा
Sun, 03/13/2016 - 18:18
नवीन
बदल केलेत
- Log in or register to post comments
प
पियुशा
Mon, 03/14/2016 - 05:34
नवीन
सुप्पर , प्रोफेशनलाच्या हातात मोबैल असला तरी फोटु कसा काढावयचा हे तुम्हीच जाणता स्पा ग्रुजी _/\_
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 03/14/2016 - 06:02
नवीन
एका दिवसात करण्यासारखी दिसताहेत. वल्लीम्बरोबर गेलो तरच उजेड पडेल. वाडा शाकाहारी(सुद्धा) असल्यास नक्कीच भेट दिली जाईल.
वल्ली मनावर घेणे.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 03/14/2016 - 06:20
नवीन
एका दिवसांत नै जमणार ब्वा. तिकडे गेलो की पैठण, नेवासे,आंबेजोगाई, पानगाव, धर्मपुरी हे सर्वच करून यावे लागणार.
- Log in or register to post comments
स
स्पा
Mon, 03/14/2016 - 06:25
नवीन
होय इतके काही बघण्यासारखे आहे, एक दिवस कठीण आहे
स्वताची कार हवी आणि
- Log in or register to post comments
P
Parag Purandare
Mon, 03/14/2016 - 09:28
नवीन
निलंगा व खुद्द लातुरमधले सिध्देश्वर मंदिरपण करायला विसरु नका. सर्व मंदिरे एका ट्रिपमधे करायची असल्यास ८ दिवस तरी पाहिजेत.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 03/14/2016 - 10:11
नवीन
अगदी.
खूप काही आहे तिकडील परिसरात.
- Log in or register to post comments
ज
जिन्गल बेल
Mon, 03/14/2016 - 07:29
नवीन
चार वर्षे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात काढल्याने अंबेजोगाई चे माझ्या आयुष्यात एक खास स्थान आहे!!
जुने दिवस आठवले...
योगेश्वरी, मुकुंदराज, खोलेश्वर म्हणजे आमचे पिक-निक spots होते... :)
अनेक धन्यवाद!
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 03/14/2016 - 07:46
नवीन
मस्त रे स्पावड्या! जुन्या दगडी देवळाला ऑईलपेंट लावलेला बघितला की त्या लोकांना चिंचेच्या फोकाने झोडपून काढावेसे वाटते!
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Mon, 03/14/2016 - 12:28
नवीन
अगदी!
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 04/01/2016 - 20:25
नवीन
आणि जुन्या किल्ल्यांवर हार्ट शेप कोरून त्यात नावं लिहिणाऱ्यांना पण!
- Log in or register to post comments
ज
जेपी
Mon, 03/14/2016 - 08:13
नवीन
छान व्रुत्तांत.जवळ असुनही अंबाजोगाई कधी पाहिल नाही..
बाकी वाडा चा उल्लेख आला आहे तर ते ठिकाण आमच्यासाठी हेवनवाशी होण्याचे आहे..
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 03/14/2016 - 08:37
नवीन
आवडला वृ आणि फोटो.
- Log in or register to post comments
ह
हासिनी
Mon, 03/14/2016 - 08:50
नवीन
एकदम मस्त रे स्पावड्या!!
वेगवेगळ्या ठिकाणांची ओळख येऊ देत अजून..!
:)
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Mon, 03/14/2016 - 08:58
नवीन
आमची कुलदेवता योगेश्वरीच आहे १९७२ नंतर आज पर्यन्त गेलो नाही. पण आता लातूरला जाउन जवळ पडतेय का ? असे असेल तर जाईन म्हण्तो. आपल्याला रेल्वेचा प्रवास आवडतो. बाकी फटू मस्त अल्यात.
- Log in or register to post comments
श
शान्तिप्रिय
Mon, 03/14/2016 - 09:55
नवीन
स्पा
मस्त फोटो आणि व्रुत्तांत.
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 03/14/2016 - 10:23
नवीन
अंबेजोगाई? घरात काही शुभकार्य काढलेत काय?
- Log in or register to post comments
क
कंजूस
Mon, 03/14/2016 - 12:19
नवीन
छान ओळख झाली फोटोंतून.एवढं वाइट म्हणतोस तसा काही फरक दिसत नाहीये.मोबल्यातला कॅम्रा वाइड अँगल नेचर फोटोग्राफीत मार खातो पण देवळातल्या मूर्ती वगैरे चांगल्याच येतात.दूरचे फोकसिंग मार खाते.
१)मन्युअल कंट्रोलवाला आहे का?,
२) फोनमध्ये सेव झालेला फोटो जास्तीत जास्त किती एमबीचा आहे?
एकदा मोबाइल विरुद्ध एसएलआरने काढलेले फोटो देऊन तुलनात्मक लेख टाक कधीतरी.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Mon, 03/14/2016 - 14:13
नवीन
लहानपणीच्या कित्येक उन्हाळ्याच्या सुट्ट्या अंबेजोगाईत गेल्या आहेत. पण आता मात्र ६-७ वर्ष होऊन गेली, जाणे झाले नाही. लहानपणी योगेश्वरीच्या देवळात जायचो, तेच हे देऊळ का असा प्रश्न पडला इतके सुंदर फोटो!! परत जाऊन पहावे लागणार मंदिर.
तुमच्या फोटोत जो मुड आला आहे.. पाऊस दाटुन आल्याचा, तशा मुड मध्ये अंबेजोगाई क्वचितच असते. रखरखीतपणाच जास्त. पाणी नाही.. लाईट नाही.. गच्चीवर झोपणे मस्ट. रोज आईस्क्रिम मस्ट!
होलसेलमध्ये डुकरे मी फक्त अ.जोगाईलाच पाहिली आहेत! बाभळीची झाडे खुप. पण आता खुप बदलले असणार.
कशी का असेना.. अंबेजोगाई = उन्हाळ्याच्या सुट्ट्या..!
तुमच्या लेखाने सगळ्या आठवणींनी मस्त वाटले!
- Log in or register to post comments
अ
अनन्न्या
Mon, 03/14/2016 - 14:36
नवीन
माहेरचे कुलदैवत आहे. सोलापूरला मुक्काम आणि दिवसभर जवळपास भटकंती! कारने गेल्यामुळे सोपी झाली ट्रीप. लेख मस्तच!
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 03/14/2016 - 16:04
नवीन
मस्तं फोटु ओ स्पांड्डुब्बा.
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
Mon, 03/14/2016 - 18:08
नवीन
आमचीही कुलस्वामिनी. गुड फ्रायडे वाल्या लाँग वीकांताचा मुर्त आधुन आम्हीही जाउन येतोय तिकडॅ
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 03/15/2016 - 03:43
नवीन
हहीह्हीहही!
पांडू फोटो आणि पांडू माहिती.
- Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 03/17/2016 - 09:23
नवीन
आमचीही योगेश्वरी कुलस्वामिनी...इथुनच हात जोडतो.
बाकि लेख आणि फोटो उत्तम.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 03/17/2016 - 09:34
नवीन
_/\_
फोटो म्हणजे पर्वणीच होती
लव्हली
- Log in or register to post comments
प
पद्मावति
गुरुवार, 03/17/2016 - 10:35
नवीन
लेख फारच मस्तं आहे. फोटो तर केवळ अप्रतिम.
- Log in or register to post comments
स
सविता००१
Sat, 04/02/2016 - 11:01
नवीन
लेख आणि फोटो.
नेहमीप्रमाणेच रे .
झकास
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Sun, 04/03/2016 - 03:49
नवीन
कुलस्वामिनीस दंडवत!
अतिशय रम्य परिसर आहे हा..आता पुनः एकदा जायला हवे.
तो दगड झालेल्या हत्तींचा फोटो हवा होता. आणी त्यांची ती कथाही पुनः ऐकायला आवडेल.
लेखासाठी धन्यवाद.
( @चौराकाका: लातुरातूनच जाणे सोयीचे आहे पुणेकरांना.)
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
Mon, 04/04/2016 - 16:52
नवीन
परवाच गुड फ्रायडे वाल्या वीकांताला जाउन आलो अंबाजोगाईत. हत्तीखान्याची अतिशय वाईट अवस्था आहे. दारुच्या बोटल्स फोडुन काचा प्रत्येक पावलाला होत्या. नावापुरता फलक होता महाराष्ट्र शासनाचा नेहमी असतो तसा, आणि ते हार्ट शेप , नाव वगैरे सगळ्या हत्तींवर आहे काढलेलं. अगदी नंदी पण सुटला नाही त्यातुन.
आम्ही काठ्या वगैरे वापरुन जमल तेवढ साफ केल, बघितल काय बाय आणि परतलो.
- Log in or register to post comments
र
रेवती
Sun, 04/03/2016 - 23:31
नवीन
फोटू व लेख आवडला. जुनी दुर्लक्षित मंदिरे आवडली. आंबेजोगाई मंदिराचे प्रवेश्द्वार आता रंगवलेय. पूर्वी रंगवले नसताना/ रंग उडालेला असताना गेल्याचे आठवते आहे. माझ्या सासूबाईंना माझ्याहातून देवीची ओटी भरायची असल्याने गेलो होतो असे काहीसे आठवते. तेथील एका गुर्जींकडे जेवणाची व्यवस्था केली होती. त्यावेळी तरी देवळाच्या बाहेर बांगड्यांचे दुकान होते. बरोबर असलेल्या सर्व महिलांनी देवीचा प्रसाद म्हणून डझनभर बांगड्या भरून घेतल्या होत्या. नंतर आजूबाजूला राहणार्या एक दोन परिचितांना भेटून आम्ही परत आलो होतो. कितीतरी जुन्या आठवणी जाग्या झाल्या. भयंकर उकाडा अजूनही आठवतोय पण गुरुजींच्या जुन्या पद्धतीच्या घरात गारवा होता. दोनेक मिनिटात आंबेजोगाईची सफर झाली.
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Mon, 04/04/2016 - 02:32
नवीन
या ठिकाणी आधी जाऊन आलेलो असल्याने फोटो व माहिती विशेष आवडली व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
मुकुंदराजांपर्यंत तुम्ही गेलेलाच मग थोडं पुढे बुट्टेनाथ आणि नागनाथला गेला नाही का?
बुट्टेनाथ जरा उंचीवर अवघड कपारीत आहे, तरी पण तिथे मिनी फ्रीस्टाईल रॉक क्लाइबिंग करत जायला मज्जा येते. रिस्की आहे खरं!
तेवढे लातूरातल्या वाड्याचेही फोटो टाकायचे होते की!
Sandy
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
Mon, 04/04/2016 - 06:54
नवीन
स्पा भाऊ, दोन अनोळखी मंदिरांची उत्तम माहिती करुन दिलीत.
फोटो व प्रवास वर्णन झकास्च...
शेवटचे पावसाचे वर्णन मस्तच जमलेले आहे...
- Log in or register to post comments
J
jo_s
Mon, 04/04/2016 - 16:16
नवीन
मस्त फोटो आणि लेख्नन
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 04/04/2016 - 16:40
नवीन
मस्त, लेख आणि छायाचित्रे आवडली.
- Log in or register to post comments