क्रिडा जगत

कूट-मिपा

Primary tabs

मंडळी, हे शब्दकोडं म्हणजे एक किंचित गंमत.

बरेचदा आंतर्जालावर, पण त्यातल्या त्यात मिपावर, काही अफलातून तर काही टंकनकष्ट वाचवणारी लघुरुपं किंवा काही शब्दसमूह वापरले जातात. त्यांचा वापर करून हे कोडं जन्माला आलेलं आहे.

तुलनेने नंतर आलेल्या वाचकांनी सहभाग घेतला तर १०-१२ प्रतिक्रियांत, अन्यथा मुरलेल्या मिपाकरांनी भाग घेतला तर २-३ च प्रतिसादांत या कोड्याचा फडशा पडेल अशी अपेक्षा आहे. पण यानिमित्ताने (सर्वच शब्द सामावून घेणं जमलेलं नाहीच, तरीही) बऱ्याचश्या मिपा-शब्दांची एकाच ठिकाणी गाठ पडावी हा या संकलनामागचा हेतू. म्हंटलं शहाणे करून सोडावे सकल मिपाजन! तर हे घ्या, कूट-मिपा!

(क्रीडा प्रकारात 'शब्दकोडे' हा पर्याय नसल्याने 'नेमबाजी' हा पर्याय वापरला आहे :-))

१ आडवे: एकदा का मिपावर प्रवेश मिळाला की ज्ञानार्जनाचं हे आणखी एक दालन उघडतं.
१ उभे: मिपावर प्रवेश मिळाला की ही उचकपाचक करायला मंडळी शिकतातच!
२ उभे: हपापाचा माल गपापा
३ उभे: कुणाचे उपहासात्मक कौतुक करायचे झाले की असं म्हणत असावेत…
४ उभे: कळफलक बडवायचा नसलं की हे कारण पुढे केलं जातं
५ उभे: त्यात काय मोठंसं?
६ आडवे: कशापायी?
७ आडवे: हल्ली मेघदूत वगैरे नाही, विजेच्या झटक्यात संदेश!
७ उभे: फेका मारू नका, नक्की माहिती द्या!
८ आडवे: अनाहितांना हल्लीच हे नामाभिधान मिळालंय!
९ उभे: 'क्रमशः' लिहून उत्कंठा वाढली की लेखकांना / लेखिकांना असा प्रेमळ दम दिला जातो.
१० आडवे: पूर्वी मिपावर स्व-संपादनाची सोय होती तेंव्हा स्वत: लेखकांना / लेखिकांना असं करता यायचं, हल्ली साहित्य संपादक मदत करतात.
११ आडवे: साहित्यकृती निर्मिणारे वाचकांना वीट येईल इतक्या वारंवारितेने लिखाण करीत असतील तर ही पडणारच!
१२ उभे: बहुतेक 'चुचू' नामक सदस्याने जन्माला घातलेली ही एक अजरामर शेलकी बायकी शिवी आहे.
१३ आडवे: अंमळ उपहासाने 'माझ्या बाल-मनाला लागलं हो!' असं काहीसं म्हणण्याचं हे लघुरूप, '३ उभे'चं दुसरं रुपडं.
१४ उभे: रागावू नका बॉ!
१५ उभे: स्वमत उत्सर्जित करणं अनावर झालं की ही पडते!
१६ उभे: आता हे काय वेगळं सांगायला नको!
१७ आडवे: जाता जाता काही आठवलं की असं म्हणायची पद्धत आहे
१८ उभे: सनविवि ने पूर्वी पत्रं सुरू व्हायची, हल्ली प्रेमाने --- असं म्हणून प्रतिसाद संपतात
१९ उभे: लेखात चढवलेले फोटो न दिसणे
२० आडवे: स्वतःला जपणे म्हणजे -- घेणे
२१ आडवे: किमान शब्दांत कमाल उपहास
२२ आडवे: लेखाअखेरची जोडणी
२३ आडवे: एखाद्या प्रतिसादाने कुणा वाचकांची जळजळ खूपच वाढली तर त्यांना हा प्रेमळ सल्ला दिला जातो!

नाखु

प्रयत्न करतो आणि उत्तरे व्यनीत धाडतो (इतरेजनांचा विरस नको)

अजया

बरंचसं सोडवलं पण तोंडी.टंकाळा आला लिहायला!

एस

सोडवलं तोंडीच. ;-)

आतिवास

तुम्हाला नेहमी नाविन्यपूर्ण कल्पना सुचतात याचं कौतुक वाटतं.
कोडं सगळ सुटलं नाही, पण वाचताना मजा आली.
मी मिपावर अजून तितकी मुरले नाही हे त्यानिमित्ताने लक्षात आलं.

अभ्या..

सुटले ब्वा सगळे. :)
काय करायचे आता? काय मिक्सर बिक्सर हाय का बक्षीस? ;)

चौकटराजा

आरं . म्होटा प्रिन्टर मागीव ! त्ये आमदाराच्या खापर नातवाच्या एक मह्यन्याच्या वाडदिवसाचा ब्य्यानर बन्वाचा हाय !

सस्नेह

नाविन्यपूर्ण उपक्रम.
मलासुद्धा सगळे कोडे नाही बॉ सुटले ! मी किती टक्के मिपाकर याचा विचार करत आहे :)

नीलमोहर

पूर्ण सोडवलेले चित्रकोडे कधी दाखवणार ?
- एक अबोध, अजाण मिपाकर..

बहुगुणी

तीन ठिकाणी झालेल्या मोकळ्या चौकोनाच्या चुका उत्तर देतांना लक्षात आल्या, त्या चाणाक्ष वाचक ओळखतीलच!

सहभागाबद्दल सर्वांचे आभार!

टवाळ कार्टा

यात "छबोकझो" हे पण घ्या...मिपाच्या एका कायप्पावर भलताच फेमस आहे हा शब्द =))

बहुगुणी

तांत्रिक नजरचुकीमुळे मूळ शब्दकोडे धाग्यातून गायब झालेले दिसते आहे, ते पुन्हा खाली देतो आहे.

आदूबाळ

ऑनलाईन सोडवता येण्यासारखं कोडं नसतं का?

पैसा

आता पुन्हा एकदा बुद्धिबळाची स्पर्धा घ्या!