Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काही अपूर्ण कविता....

च — चाणक्य, Mon, 03/14/2016 - 19:16
मला ना काही कळतच नाहीये काय करू त्या अर्धवट राहिलेल्या कवितांचं . . . आता हेच बघ ना त्या दिवशी माझ्या जवळून जाताना तुझ्या अोढणीचा झालेला तो निसटता स्पर्श.... कागदावर उतरवून तर घेतलाय पण पुढे काय करू त्याचं ?? काही कळतच नाहीये मला . . . आणि नविन कानातलं घालून एकदा मान किंचीत तिरपी करून आरश्यात पाहत होतीस तेव्हा, ते तुझं तसं बघणंही लिहून ठेवलंय मी माझ्या कवितेच्या वहीत... अगदी आरश्यातल्या तुझ्या सकट पण मग त्या मीटरमधे बसणारं काही सुचलंच नाहीये अजून पुढे त्यामुळे ती पण एक अपूर्ण राहिलीये सुचेल कधीतरी... कारण, तुझ्या पर्स मधे एक छोटासा आरसा असतो ना नेहमी ठाउक आहे मला! . . . आपलं भांडण झाल्यावर हक्काने आपल्या घरात राहणारा तुझा अबोला, तोही आहे माझ्या वहीत काफिया म्हणून घेतलाय एका गझलेत पण पुढचे शेर काही केल्या सुचत नाहीयेत अवघड आहे काफिया जरा त्याचंही काय करावं कळत नाहीये एकदा वाचशील का तो शेर ? म्हणजे निदान ती गझल तरी पूर्ण होईल. . . . कुठे बाहेर जायचं असलं की सगळं आवरून झाल्यावर तू जो मानेला एक हलकासा झटका देउन केस मागे घेतेस ते एक, आणि सुसाट वारा सुटलेला असताना अस्ताव्यस्त होत असलेले केस नीट करत असतेस ते एक अशी दोन कडवी लिहून झालीयेत एका कवितेची बरेच दिवस झाले... त्याच्यापुढे काही जाऊ शकलो नाहीये कदाचित यंदा वळवात होईल ती पूर्ण . . . अजून एक कविता आहे मुक्तछंदातली.........

प्रतिक्रिया द्या
6345 वाचन

💬 प्रतिसाद (24)
ब
बहुगुणी Mon, 03/14/2016 - 21:51 नवीन
सुरेख! असे निसटते क्षण गोळा करून महाकाव्य होईल! किंचित अवांतरः या मुक्तकाव्यातील वर्णनं इतकी चित्रदर्शी आहेत की प्रत्येक कडव्याला वेगवेगळ्या कलाकारांनी चित्ररूप दिलं तर काय बहार येईल असं वाटलं. मिपा रंगभूषा मंडळातील व मिपावरील इतर कलासक्त लोक, म्हणजे अभ्या, जयंतराव, चित्रगुप्त, संदीप डांगे, स्पा, नीलमोहर, चौकट राजेसाहेब, एस, बबनराव, सूड, पिवशी, आनंदिता वगैरे मंडळी हे मनावर घेतील का? अशी इतरही मुक्तके/ अशा कविता इथे आहेत; मिसळलेला काव्यप्रेमी, आनंदमयी, सांजसंध्या, विशाल कुलकर्णी ही काही चटकन आठवणारी उदाहरणे....
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/18/2016 - 07:28 नवीन
@सुरेख! असे निसटते क्षण गोळा करून महाकाव्य होईल! >> +++१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
स
सटक Mon, 03/14/2016 - 23:04 नवीन
कवितेची कल्पनाच काय सुंदर आहे!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 03/15/2016 - 12:57 नवीन
क्या बात है चाणक्या....!!! निव्वळ अप्रतिम.
  • Log in or register to post comments
भ
भाऊंचे भाऊ Tue, 03/15/2016 - 13:06 नवीन
.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 03/16/2016 - 01:08 नवीन
सुर्रेख!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 03/16/2016 - 04:12 नवीन
सुंदर!!!
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 03/16/2016 - 04:59 नवीन
काय मस्त झुळुक आणली या वैशाख वणव्यात. झक्कास मनमौजी नाखु
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 03/16/2016 - 05:37 नवीन
झकास... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-विकिपिडीया पे चेक कर ले, गुगल तू सर्च कर ले, बेबी जरा लुक अराउंड कर ले...नैयो मिलेगा ऐसा यार सोणिये...इक नंबर. इक नंबर. इक नंबर... :- Sanam Teri Kasam
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 03/16/2016 - 05:55 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 03/16/2016 - 06:18 नवीन
फारच सुंदर झालीये.. आवडली. अवांतरः माझी आठवण काढल्याबद्दल धन्यवाद हो बहुगुणी..
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Wed, 03/16/2016 - 15:48 नवीन
कवितेची कल्पना आवडली
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 03/16/2016 - 15:56 नवीन
सुंदर!!
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Wed, 03/16/2016 - 16:47 नवीन
ह्या खिडकीच्या काचा थोड्या भिजलेल्या हा आडोसा शोधत पाऊस आलेला हे तेव्हाचे वर्णन , हा तेव्हाचा तो क्षण ही तेव्हाची कविता .. कोरी अजूनही ना सुचलेली अजूनही नाही प्रिये -वैभव जोशी
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 03/16/2016 - 17:00 नवीन
अहाहाहाहाहा, अप्रतिम. बहुगुणीसाह्यबांचेच मत परत. मिक्याची आठवण झालीच. ओय मिक्का तुस्सी कित्थे?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 03/16/2016 - 17:01 नवीन
सुंदर ! काही गोष्टी अपूर्ण राहिल्या तरच त्यातला रस, अर्थ आणि आनंद कायम राहतो !
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 03/16/2016 - 17:11 नवीन
आणि बघ ना, तू बसतेस समोर, मला लिहिताना पाहायला आवडते म्हणून. टक लावलेले डोळे, कधी माझ्याकडे, कधी कोर्‍या वहीकडे. काय लिहू आता तुला पाहायचे सोडून. बर्‍याच भेटी झाल्या अशा, तू असलीस की शब्द पळून जातात, नसलीस की ते पण गोंधळून जातात.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 03/17/2016 - 18:26 नवीन
वाह
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
र
रातराणी गुरुवार, 03/17/2016 - 07:06 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 03/17/2016 - 18:25 नवीन
मस्तय
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 03/18/2016 - 06:09 नवीन
मस्त मस्त आणि मस्तच इतक्या संदर कवितेला नक्की कशी दादा द्यावी ते समजत नाहीये. अप्रतिम केवळ अप्रतिम..... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Fri, 03/18/2016 - 17:45 नवीन
धन्यवाद सर्वांना. @जव्हेरभाऊ, वैभव जोशी माझ्याही आवडत्या कवींपैकी आहे. @अभ्या, लय भारी ओळी रे @बहुगुणी, कल्पना छान आहे.
  • Log in or register to post comments
श
शलभ Tue, 03/22/2016 - 15:06 नवीन
खूपच मस्त..एक नंबर..
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Mon, 02/11/2019 - 18:36 नवीन
फारच सुंदर कल्पना..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा