राजकिय धागे आणि वाचक
बरेच लोक राजकिय चर्चांच्या नावाने बोटे मोडतात, मेगाबायटी प्रतिसादांबद्दल नाकं मुरडतात. त्यांना ते वाचल्याशिवाय समजत असेल काय? जर वाचण्याची आवड व गरज वाटते तर मग इथे अशा राजकिय चर्चा-प्रतिसादांबद्दल नाकं का मुरडतात? मला तर हा प्रकार म्हणजे कोंबड्यांच्या झुंजींची मजाही घ्यायची आणि मुक्या प्राण्यांवर अत्याचार म्हणून आरडओरडा करायचा, असा वाटतो. ;-)
टु एवरी अॅक्शन, देअर इज अल्वेज इक्वल अॅण्ड अपोजिट रिअॅक्शन. कितीही चुकीचे असले तरी आपलेच म्हणणे रेटणार्यांबद्दल कुणी बोललेलं दिसत नव्हतं. त्यांना जशास तसा विरोध व्हायला लागल्यावर मिपा राजकिय आखाडा झाल्यासारखा वाटायला लागला. काही आयडी केवळ काही राजकीय पक्ष व संघटनांच्या भूमिकांना कसंही करून योग्य ठरवण्यासाठी मिपावर येतात. हे जेव्हा बंद होईल तेव्हा काही सदस्यांना बोचणार्या गोष्टीही मिपावर होणं बंद होईल.
मिसळपाव संस्थळावर सगळ्याच प्रकारच्या अभिव्यक्तिला प्रकटनाचे स्वातंत्र्य आहे असे वाटते. आपल्याला हवे तसे होत नाही हा विचार बाजूला ठेवला तर प्रत्येकाला आपल्या अभिरुचीप्रमाणे व्यक्त होण्याचे, वाचण्याचे स्वातंत्र्य असायलाच हवे. मला पाकविभाग बोअरिंग वाटतो, बर्याच कविता अगदी बालिश वाटतात. भटकंती विभागात दोन-तीन सदस्य सोडले तर फक्त फोटो (पक्षी पाट्या) टाकणारे असतात. काही धागे मला अजिबात आवडत नाहीत. पण अशा कुठल्याही धाग्यांवर कवितांवर पाककृतींवर भटकंतीवर जाऊन मी किंवा माझ्यासारखा विचार करणारे विरोधात लिहित नाहीत. कारण मी ते वाचतच नाही. अहो रुपम् अहो ध्वनिम् प्रकारच्या लेख, धागे, प्रतिसादांवर जाऊन तसे लिहित नाही. त्यांना त्यात धन्यता वाटते, आनंद मिळतो तर असू देत.
मिपा हे हजार चॅनेल असलेला टीवी आहे. उगा टाइम्स नाऊ लावायचं, बघायचं मग तो अरणव किती ओरडतो बघा बघा असं बोलायचं ह्याला काही अर्थ नाही. एकूणच राजकिय चर्चांच्या वातावरणात विचारसरणीपेक्षा व्यक्तिगत होण्याकडे चर्चा करणारे झुकले आहेत. मिपावरही तेच वातावरण झाले असेल तर नवल नाही.
सगळे राजकिय धागे तात्पुरते बंद करुन हा "मिपावरील राजकिय चर्चा" विषय काथ्याकूटास घ्यावा का? ह्या चर्चांच्या उपयोगितेबद्द्ल, दर्जाबद्दल, गरजेबद्दल सर्व सदस्यांच्या प्रतिक्रिया, मते जाणून घेण्याच एखादा पोल घेता येईल काय?
💬 प्रतिसाद
(66)
प
पुणेकर१
Wed, 03/16/2016 - 11:22
नवीन
सहमत आणि असहमत आहे तुमच्याशी. असाच प्रांजळपणा मला डाव्या किंवा सेक्युलर लोकांकडून दिसत नाही. राही ह्य्नाचे प्रतिसाद हे अतिशय संयत आणि माहितीने पूर्ण असतात. पण त्या पण आपले म्हणणे सोडत नाहीत असा माझा निरीक्षण आहे. एक प्रकारची उजव्या विचारांची खिल्ली उडवणे असा काहीसा प्रकार खुपश्या प्रतिक्रियनमधून दिसून येतो. (हे वाक्य राही ह्यांना नाहीये तर एक निरीक्षण आहे) तेच मग उजवीकडून केले गेले तर तो दांभिक पण ठरतो. असा काहीसा प्रकार चालू आहे. पण लिहिण्याची पातली खाली जाने हे योग्य नाही. मत बदलत नाहीच तर उलट अजून कडवट होत जाते.असे मला तरी वाटते
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 03/16/2016 - 12:50
नवीन
आरे दादा इथे डु आयडींच्या नावाने शंख करणारे अनेक जण डुआयडी बाळगुन आहेत त्याचं काय? त्यातले कैकजण मुळ आयडीने वेश असावा बावळा आणि अंगी नाना कळा असे वागतात त्याचं काय? नुकतचं एक झालेलं प्रकरण माझ्या दृष्टीने किरकोळ होतं. त्या व्यक्तीशी किमान माझ्या बाजुने चांगले संबध होते/ बहुतेक आहेत आणि रहावेत अशी प्रामाणिक इच्छा असल्याने थेट नावं घेउन बोलत नाही. बाकी रोचक चर्चा. बहुतेक मिपानिवृत्ती घ्यायची वेळ जवळ आली आहे.
- Log in or register to post comments
म
मोदक
Wed, 03/16/2016 - 13:10
नवीन
:)
- Log in or register to post comments
ग
गॅरी शोमन
Wed, 03/16/2016 - 07:54
नवीन
शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी नव्हतेच, दादोजी कोंडदेव सुध्दा नव्हते असा नवा खुळचट प्रकार मधल्या काळात सुरु झाला होता. याची कारणे काय ते सांगणे नकोच.
पण अद्याप तरी तुकाराम महाराज शिवाजी महाराजांचे गुरु होते यावर आक्षेप नाही. तुकाराम महारांजांनी म्हणले आहे.
भले तर देऊ कासेची लंगोटी
नाठाळाचे माथी हाणु काठी.
नाठाळ शोधुन काठीने नाही पण प्रतिसादाने हाणायला हरकत नसावी.
- Log in or register to post comments
र
राही
Wed, 03/16/2016 - 08:01
नवीन
हे तुकाराम महाराज म्हणाले आहेत. ते खरे वैष्णव होते. परंपरेने चालत आलेल्या कथांनुसार त्यांनी वैयक्तिकरीत्या अनेक अपमान शांतपणे सोसले.
बरसणारे(पाणी देणारे) ढग वेगळे, गडगडणारे वेगळे.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 03/16/2016 - 10:13
नवीन
सामान्य माणूस एवढा क्षमाशील असावा अशी अपेक्षा करणं चुकीचं नाही का?
- Log in or register to post comments
र
राही
Wed, 03/16/2016 - 11:00
नवीन
माझ्या वरील प्रतिसादाचा एक अर्थ मी असा धरला होता की आपली जी विचारसरणी आहे त्याचेच पुष्टीकरण करणारे वचन आपण हुडकून काढतो. मग त्या संताची/साहित्यिकाची इतर कितीही विरोधी वचने त्याच्या साहित्यात किंवा आचरणात दिसेनात का. हे म्हणजे महापुरुषांना हाय्जॅक करणे झाले. गीतेमध्ये 'गुणकर्मविभागशः' आहे म्हणून गीतेला प्रतिगामी मानणार्यांनी फक्त तेव्हढेच उचलून गीतेला नाकारण्यासारखे आहे हे. गीतेतले अन्य कितीतरी उपदेश आचरणीय आहेत. मला सिलेक्टिव पेक्षा साकल्याने स्वीकृती योग्य वाटते.
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Wed, 03/16/2016 - 12:59
नवीन
"तुकाराम महारांजांनी म्हणले आहे."
इथ पासून प्रतिसाद सुरु केला असतात तरी फारसा फरक पडला असता का तुमच्या प्रतिसादाच्या अर्थात ?
राजकीय चर्चा भटकतात ते अश्या गरज नसलेल्या ओळी नको त्या धाग्यावर आणल्या मुळे .
मूळ मुद्दा काय लोक बोलतात काय .
- Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे
गुरुवार, 03/17/2016 - 09:03
नवीन
चर्चा-विषय आवडला पण आशयाशी सहमत नाही.
राजकीय चर्चा बंद होऊ नयेत. फॉर दॅट मॅटर कुठल्याच चर्चा बंद होऊ नयेत. अगदी हाणामारीवाल्या चर्चांमधूनही काहीतरी चांगलं हाती लागतच. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे नैसर्गिक मानवी स्वभावाचं प्रतिबिंब इथल्या लिखाणावर पडणारच. त्यामुळे सकारात्मक-नकारात्मक प्रतिसाद अथवा प्रतिसादांची चांगली-वाईट भाषा दिसून येणं हे अगदी नैसर्गिक आहे. वाचणार्याला हे असे प्रतिसाद टाळूनही चर्चेचा आनंद घेता येतोच. प्रतिसाद जास्त उजवीकडे सरकायला लागले की सरळ तेवढा भाग स्क्रोल करुन खाली यायचं :)
अशा चर्चांमधे रसच नसेल तर धागा न उघडण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.
आणि शेवटी, अगदीच पातळी सोडून लिखाण होत असेल तर त्यावर कारवाई करायला संमं समर्थ आहेच.
- Log in or register to post comments
ग
गॅरी शोमन
Sat, 03/19/2016 - 04:03
नवीन
आज पर्यतचे सगळे प्रतिसाद तपासुन पहा.
- Log in or register to post comments
म
मन१
Mon, 03/21/2016 - 06:11
नवीन
होस्टेल मधील मुलीचा विनयभंग आणि मिसळपाव.कॉम हा धागा तर्राट भाउंना आवडेल असा अंदाज ;)
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 04/06/2016 - 20:04
नवीन
संयत चर्चेबद्दल आणि आपआपले मुद्दे मांडल्याबद्दल सर्व प्रतिसादक सदस्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
गुरुवार, 04/07/2016 - 05:39
नवीन
.
For this article, TJ 1+
Keep On...
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
गुरुवार, 04/07/2016 - 05:58
नवीन
माणसाबरोबरच, घोड्यानेसुद्धा, 'भारतमाता की जय' म्हटले नाही, तर त्याचे तंगडे मोडू.. किंवा 'भारतमाता की जय' म्हटले नाही, तर इसीस प्रमाणे गळ्यावरून सुरा फिरवू...... असे म्हणणार्या /
अश्या मनोवृत्त्यीच्या काही भक्तांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा आहे का TJ तुम्हाला ?
- Log in or register to post comments
L
lgodbole
गुरुवार, 04/07/2016 - 10:11
नवीन
घोडेमार भाजपी नेत्याचा साधा निषेध्ही कुणी केला नाही इथे
- Log in or register to post comments
झ
झेन
गुरुवार, 04/07/2016 - 12:00
नवीन
सर्वत्रच चर्चा, विशेषत: राजकीय, व्यक्तिगत होवून कटुता वाढताना दिसते. ह्यावर अमिताभ बच्चन यांनी कुठल्याशा कार्यक्रमात त्यांच्या वडिलांचा सांगितलेला किस्सा आठवला.
हरिवंशराय बच्चन यांनी विचा२ले की लोक चित्रपटाना एवढी गर्दी का करतात ? सामान्य माणसाला असं वाटत असतं की रोजच्या आयुष्यात असत्यावर सत्याचा विजय होताना दिसतच नाही जो चित्रपटात दिसतो. म्हणून चित्रपट बघताना त्याला काव्यत्मक न्याय मिळाल्यासारखा वाटतो
मला काहिसे तसे वाटते की रोजच्या कटकटीना तोंड देताना अनेक गोष्टींचा राग काढण्यासाठी (स्वताच्या चुका झाकण्यासाठी) राजकारणी लोकांमधे खलनायक शोधतो. मग जो मला सोयीचा (जातीचा,गावचा,विचारसरणीचा)तो माझा, त्याला विरोघ करणार्यांच प्रत्यक्ष काही वाकड करू शकत नाही, मग विरोधकांची बाजु घेणारा सापडला की सगळी आग शाब्दिक शसत्रांनी शमवण चालू होत. तिकडे त्यांचे हीरो राजकारणी त्यांच्या लीला चालूच ठेवतात, ते त्यांचे देव काळाप्रमाणे बदलतात.
पण दोष दुसर्याना का दयावा शेवटी राजकारणीतरी कोण असतात सामान्य माणसाचे बोल्ड, एनलार्जड आणि नग्न अवतार
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2