मोदीभक्त आम्ही...
मोदीभक्त आम्ही
रात्रंदिन जपतो
नमो नमः ।।धृ।।
तुमचे दौरे तुमच्या भेटी
तुम्ही जोडलेली जगभरची नाती
शिंझो अबे तुमचा मित्र
बराक तुमचा जणू शाळूसोबती
फेसबुक अन गूगलवाले
जीव भारी त्यांचा तुमच्यावरती
मिडियाच कशाला इथला
जग सारे गुणगान गाते पहा ।।१।।
परदेशी गुंतवणुकीस
आला आहे नुसता आता पूर
कारखान्यांमधून पुन्हा
निघू लागला सोन्याच्या धूर
साऱ्या देशाचा आता
बदलत चालला पुरता नूर
झाली सुखाची परमावधी
अच्छे दिन आले आम्हास अहा! ।।२।।
डिजिटल इंडिया जोरात
अन् स्वच्छ आमचा भारत झाला
जगभरचे धनिक लागले
मेक इन इंडिया सारे करायला
मन की बात ऐकून तुमच्या
प्रत्येकजण धन्य धन्य झाला
"दलित, अल्पसंख्य, शेतकऱ्यांचे काय?"
हे कोण बोलला? देशद्रोहीच दिसतो हा ।।३।।
*चाय से केटली गरम
असले की ते विचित्र वाटते असे म्हणु का? *ही एक हिंदीभाषी म्हण आहे तरीही कृपया ह्याचा संबंध मोदींशी जोडू नये ही नम्र इणंती