टागोर आणि सावरकर तत्वज्ञानातील साम्य आणि फरक
माझ्यापुरते एखाद दोन प्रसिद्ध कविता, लेखनाचे काही अंश अधे मध्ये या पलिकडे टागोर आणि सावरकर हे दोन्हीही मी वाचलेले नाहीत, सावरकरांचा जिवन काळ मे १८८३ ते फेब्रु १९६६ तर टागोरांचा जिवनकाळ १८६१ ते १९४१. टागोरांचा जिवन काळ सावरकरांच्या एक पिढी अलिकडे २२ वर्षे आधी चालू होतो तसा सावरकरांच्या २४ वर्षे आधी संपतो. पण मोठा कालखंड दोघांसाठीही समकालीन राहीला असावा.
सावरकर आणि टागोर यांची राष्ट्रवादावरची मते अभ्यासली म्हणजे दोन परस्पर विरोधींची तुलना चालू आहे असे वाटेल, एकदा राष्ट्रवाद विषय डोक्यात आला की बाकी सर्व विसरल्यामुळे साम्य शोधणे कदाचित कठीण जाईल म्हणून विज्ञानवादाशी दोघांचीही नाळ जुळत असे, शब्द प्रामाण्य हे बहुधा दोघांनाही स्विकार्य नसावेत (चुभूदेघे) हि साम्यस्थळे असण्याची शक्यता असेल.
कुणि म्हणेल जाई आणि जुई दोन्ही स्वतंत्र आणि सुवासिक फुले आहेत त्या दोन्हींच्या सुवासाची तुलना का करावयाची किंवा असे काय निमीत्त झाले आहे की या दोघांची तुलना करावी ?
अलिकडील देशभरातील संकुचित सेक्टेरीअनीझमचे महाराष्ट्रातही जे पडसाद पडले त्यात कालची महाराष्ट्राच्या विधानसभेत एमाआयएमच्या एका विधानसभा सदस्याला भारतमाता की जय म्हणण्यास नकार दिल्यामुळे विधानसभा अधिवेशन संपेपर्यंत बडतर्फ केले गेले-इथे भारतमाता की जय या विषयाचा उहापोह वेगळा करावयास हवा-, राजकीय पक्ष कोणताही असो सावरकरांचा समर्थक अथवा विरोधक पण बहुसंख्य महाराष्ट्रातील राष्ट्रभक्तीची सळसळ ही जहालच आणि या महाराष्ट्रातील राष्ट्रभक्तीचे एक तत्वज्ञानी साहित्यिक पुजक म्हणून सावरकर इथे तुलनेस घेतले. एमाआयएमचे नेते ओवेसी यांनी त्यांच्या संकुचित विचारांसाठी चक्क रबिंद्रनाथ टागोरांची दुहाई दिली.
रविंद्रनाथ टागोरांच्या खालील वाक्याची दुहाई देणारे ओवेसी एकटे नव्हेत खालील वाक्य अनेक मान्यवरांनी क्वोट केले आहे
I LOVE INDIA, not because I cultivate the idolatry of geography, not because I have had the chance to be born in her soil, but because she had saved through tumultuous ages the living words that have issued from the illuminated consciousness of her great sonsपण living words that have issued from the illuminated consciousness of her great sons.. म्हणजे काय ? हे कुठेही स्पष्ट होत नाही. टागोंरांचे हे वाक्य कोणत्या संदर्भात आहे कोणत्या पुस्तकातून आले आहे पहावे म्हटले तर ‘A vision of Indian History’ आणि ‘A vision of Indian History’ या टागोरांच्या वेगवेगळ्या (?) निबंध-पुस्तकाचे संदर्भ दिसतात. आणि हि पुस्तके लगोलगतरी आंजावर सहज वाचण्यास उपलब्ध झाली नाहीत. रविंद्रनाथ टागोरांची मला आंजावर सहजपणे जी मते दिसली ती इतरांशी नव्हे त्यांच्या स्वतःच्याच विचारांशी विरोधाभासी नाहीत ना अशी शंका येत राहीली. रविंद्रनाथ टागोरांनासुद्धा देशभक्ति हवी आहे, हिंदूंनी संघटीत असावे संघटीत नसल्यामुळे त्यांना पराभव पत्करावे लागले हा इतिहास त्यांना मान्य आहे पण राष्ट्रवादी असणे त्यांना संकुचितपणाचे वाटते -गांधींना राष्ट्रवादी असणे संकुचितपणाचे वाटत नाही सावरकर आणि गांधी यातला एक फरक हिंसाअहिंसावाला आहे तो या धागाचर्चेचा विषय नाही पण दोघेही राष्ट्रवादी - टागोरांना राष्ट्रवादापेक्षा मानवता ह्युमॅनिझम मोठा वाटतो टागोरांचा ह्य्मॅनीझम बहुधा गौतम बुद्धाच्या जवळ पोहोचणारा असावा. टागोरांची दुहाई देणार्या ओवेसींनी त्यांचा संकुचित धर्मवाद टागोरांच्या मानवतेच्या व्याख्येवर कुठे बसतो हे स्पष्ट करण्याची त्यांच्यात क्षमता आहे का ? ह्याची चर्चा व्हावयास हवीच पण तत्पुर्वी बंगाल आणी महाराष्ट्रातील राजकीय विचारातील फरक समजून घेण्यासाठी सावरकर आणि टागोर यांची साम्य आणि फरक यावर कुणि अधिक प्रकाश टाकू शकत असेल तर पहावे हा या धाग्याचा उद्देश त्यामुळे टागोर आणि सावरकर तत्वज्ञानातील साम्य आणि फरक हे मला इतरांकडून जाणून घेण्यात रस आहे * रबिंद्रनाथ टागोरांची अवतरणे (इंग्रजी विकिक्वोटवर) * सावकरांची अवतरणे (इंग्रजी विकिक्वोट्सवर) टागोरांसाठी काही आगेमागे समकालीन समाज आणि राजकीय पटलावरच्या व्यक्तिंचे जिवनकाळ केवळ संदर्भासाठी बाळ गंगाधर टिळक १८५६ ते १९२०, महात्मा गांधी १८६९-१९४८ , विवेकानंद १८६३ ते १९०२, श्यामा प्रसाद मुखर्जी १९०१ ते १९५३ , सुभाषचंद्र बोस १८९७ - १९४५ चर्चा सहभागासाठी आभार.
💬 प्रतिसाद
(16)
आ
आनन्दा
गुरुवार, 03/17/2016 - 08:40
नवीन
ज्ञानात भर पडेल या आशेने वाखु साठवत आहे.
- Log in or register to post comments
म
म्हया बिलंदर
गुरुवार, 03/17/2016 - 09:03
नवीन
डिट्टो
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 03/31/2016 - 08:37
नवीन
टागोर आणि सावरकर अत्यंत भीन्न व्यक्तीमत्व वाटतात. त्यांचे कार्यक्षेत्रसुद्धा क्य्ठे मॅच होताना दिसत नाहित. त्यांच्यात काय साम्य अथवा फरक शोधणार. दोघेही कवि होते, समाज-क्रांतीकारी होते. पण त्यांची तुलना कशी करायची ??
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 03/31/2016 - 08:48
नवीन
मला जाणवलेले साम्य मी नोंदवलेच आहे. साम्य जाणवत नसेल तर फरक सांगावेत धाग्याचा एक उद्देश सावरकर आणि टागोरांच्या राष्ट्रवाद विषयक दृष्टीकोणावर प्रकाश झोत टाकून हवा आहे.
टागोर आणि सावरकरांना ओवेसी नावाचे एक राजकारणी त्यांच्या सोईने क्वोट करताना दिसताहेत. जो पर्यंत इतर लोक अभ्यासपूर्ण उत्तरे शोधत नाहीत तो पर्यंत ओवेसीच्या श्रोत्यांना ओवेसी जे काही सांगत आहेत ते बरोबर वाटत रहाणार हे ओघाने आले. जे ओवेचींनी केले ते कम्युनीस्ट आधी पासून पण कमी जाहीरपणे करत आले असावेत. आणि त्यांच्या शिवाय इतरही राजकारणि वापरु लागतील तर नवल नाही. ओवेसींवर बरेच जण व्यक्तिगत टिका करतात पण अभ्यासपूर्ण टिका करावयाची असेल आणि त्यांनी टागोर आणि सावरकरांना वापरले असेल तर टागोर आणि सावरकरांचे विचार अभ्यासून भूमिका बनवल्या पाहीजेत असे वाटते. असो.
- Log in or register to post comments
व
विटेकर
गुरुवार, 03/31/2016 - 08:54
नवीन
मूलतः हिन्दू राष्ट्र्वाद हा मानवतावादच आहे ! कृण्वन्तो कृष्ण्मार्यम , वसुधैव कुटुम्बकं , ..... समुद्र्पर्यन्त एकराळिती ... या वाक्यात तुम्हाला कोणता भौगोलिक संकुचितपणा दिसतो ?
बृहत्तर भारत / देशाबाहेरील हिन्दु मंदिरे या मिपावरील दोन धाग्यांचा अभ्यास जरी अभ्यास केला तरी आपल्या लक्शात येईल की हिन्दूनी कधीही आक्रमण करुन आपली उपासना पद्धती लादली नाही.
तेव्हा व्यापक अर्थाने भारतीयांचा राष्ट्रवाद हा जागाच्या कल्याणाकरताच आहे, तेव्हा सावरकर आणि टागोर एकच भाषा बोलत आहेत याबाबत माझ्या मनात संदेह नाही.
जाता-जाता -
योगी अरविंदांचे उत्तरपारा भाषण अभ्यासावे असा एक अनाहूत सल्ला !
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 03/31/2016 - 09:02
नवीन
अभ्यास वाढवा हे कुणाला उद्देशुन आहे ? धागालेखकास उद्देशून असेल तर धागा लेखकाने अभ्यास वाढवण्यासाठीच धागा लेख टाकला आहे. आणि अधिकाधिक लोकांकडून अभ्यास वाढवण्यात साहाय्य हवे आहे.
बाकी तुम्ही आणि सदस्य अर्धवटराव यांच्या मतात अंतर दिसते आहे. सदस्य अर्धवटराव त्या दोघात द्वैत आहे असे म्हणतात आपण त्या दोघात अद्वैत आहे असे म्हणताय असे दिसते. बाकी लोक्स काय म्हणतात तेही ऐकुयात
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 03/31/2016 - 10:02
नवीन
योगी अरविंदांच्या उत्तरपारा भाषणातील राष्ट्र विषयक अवतरणे संदर्भासाठी
* India has always existed for humanity and not for herself and it is for humanity and not for herself that she must be great.
* "But it is not circumscribed by the confines of a single country,.......If a religion is not universal, it cannot be eternal..." आणि पुढे "सनातन धर्म = राष्ट्रवाद" हे या भाषणातील स्वामी अरविंदांचा विचार हे सावरकरांप्रमाणे भौगोलीक सिमेतल्या राष्ट्रवादापर्यंत मर्यादीत वाटत नाहीत तर धार्मीक साम्राज्यवादाला राष्ट्रवाद म्हटल्या सारखे होईल. इथे एक शंका वाटते की ब्रिटीश काळात राजकीय स्वातंत्र्याबद्दल बोलण्यावर बंधने येत त्यामुळे क्रांतीकारी लोकांनी धर्माच्या आडून राष्ट्रवादाची मांडणी चालू केली म्हणजे राजकीय स्वातंत्र्या बद्दल बोलल्याने येणारा ब्रिटीश सत्तेचा वरवंटा टाळून धर्मा आडून राष्ट्रवादावर बोलणे ही निती खासकरुन स्वामी अरविंदांच्या उत्तरपारा भाषणातून अप्रत्यक्षपणे जाणवते. भारत मातेच्या स्वरुपातील परसोनीफिकेशनही याच प्रभावातून आले असू शकेल का ? असे वाटून गेले असो.
स्वामी अरविंदांचे उत्तरपारा भाषण संदर्भ १ संदर्भ २
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 03/31/2016 - 10:19
नवीन
योगी अरविंदांचे अगोदरचे विचार nationalism is not politics but a religion, a creed, a faith. अगोदर असे होते असे ते त्यांच्या भाषणात म्हणतात -जे सावरकरांच्या विचारांच्या जवळ असतील- पण या उत्तरपारा भाषणापासुन पुढे टागोरांप्रमाणे डायरेक्ट वसुधैव कुटूंबकम वर पोहोचून जगभर सनातन धर्माचा प्रसार करण्यासच ते राष्ट्रवाद मानू लागले असावेत असे भाषणावरुन वाटले.
- Log in or register to post comments
व
विटेकर
गुरुवार, 03/31/2016 - 08:56
नवीन
ओवेसी जे बोलतात ते फक्त त्यांच्या सोयीचे बोलतात, त्यात शुद्ध राजकारण आहे, अभ्यास असलाच तर त्याचा सोयिस्कर वापर करण्या करता केला आहे
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 03/31/2016 - 09:07
नवीन
काय आहे,धागा लेखकास ओवेसीच्या नामजपात मजा येत नाह,, एखाद्यावर विनाधार टिका झाली की त्यांना मोठेपण मिळण्याची शक्यता असते. ओवेसीस कोणतेही मोठेपण देऊ इच्छित नाही, ओवेसीचे नाव नाईलाजाने नमुद केले आहे-ते या धागा चर्चेत जिथे जरुरी नाही तेथे टाळायचेच आहे. मुद्याची गोष्ट धागा लेखास टागोर आणि सावरकर अशी मनमोकळी चर्चा करुन हवी आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 03/31/2016 - 09:10
नवीन
टागोरांच्या विचारधारेशी तुलना करण्यासाठी सावरकरांशिवाय इतर राष्ट्रवादी नेत्यांच्या भुमिका मांडल्यातरीही धागा लेखास चालण्यासारखे आहे.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 03/31/2016 - 09:20
नवीन
सनातन प्रभातमधील लेख वाचल्यासारखे वाटले.
फक्त पिशाच्चे वगैरेंचा उल्लेख नाही हा अपवाद.कदाचित तो मिपावरील लिखाण आहे म्हणून टाळला असावा.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 03/31/2016 - 10:09
नवीन
कोणतीही एक बाजूच बरोबर असा तगादा धागा लेखात लावलेला नाही केवळ जाणून घेण्याची जिज्ञासा आहे-किमान स्वरुपाचे सौजन्य सौहार्द बाळगणारे फुलांचे रुपक आहे, मी व्यक्तीपुजक नाही त्यामुळे त्या रुपकाचा अर्थ त्या फुलझाडांची सर्वच वैशिष्ट्यांचे धागा लेखक एकांगी कौतुक करतो असेही नसावे - तरीही आपणास असे वाटते का ब्रे ? धागा लेख तिकडून कापी पेस्ट केलेला नाही हे निश्चित. बाकी चालू द्या.
- Log in or register to post comments
भ
भाऊंचे भाऊ
गुरुवार, 03/31/2016 - 10:09
नवीन
झोप येत नसेल तर उपाय म्हणून वाचायला हे लिखाण वाचनखून म्हणून साठवत आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 03/31/2016 - 10:10
नवीन
ब्वॉर, शुभरात्री !!
- Log in or register to post comments
भ
भाऊंचे भाऊ
गुरुवार, 03/31/2016 - 10:17
नवीन
वाखुसा
- Log in or register to post comments