ओवेसीचे भाषणातील बोल आणि संविधान कोड
निवडणुका जवळ आल्या की अल्पसंक्यांच्या मतांसाठी नेहमीप्रमाणे परवा भाषणात तो YZ ओवेसी " मी भारतमाता की जय बोलणार नाही" तेव्हा माझ्यावर कोणी सक्ती करु नका. आणि आमदार वारिस पठाण यांनी याची री ओढली आणि मला कोणीतरी संविधानात "भारत माता की जय" बोलण्यासाठी तसे कोणते कलम असेल तर सांगा असे काहीसे बरळला. आता यावर राष्ट्रवादीवाले सगळे तोंडात मुग गिळुन गप्प बसले आहेत आणि एक शिवसेना सोडली तर कोणीही विरोध दर्शविलेला नाहीये.
तर जाणकार लोकांनी प्रकाश टाकावी की खरेच असे बोलण्यास काही संविधानात्मक कोड किंवा घटनेमध्ये अशी काही तरतूद आहे काय ज्याद्वारे "भारतमाता की जय" म्हणणे , "जन गण मन" किंवा "वंदे मातरम" चालु असताना आहे त्याच जागेवर सावधान स्थितीत उभे राहाणे हे पाळणे बंधन कारक आहे.
डिस्क्लेमरः- वरिल माहिती ही फक्त माझ्या स्वतःच्या जबाबदारीवर जे काही २/४ दिवसात प्रसारमाध्यमांद्वारे चालु आहे ते ऐकुन पाहुन लिहला आहे. कोणताही विदा मागु नये. संपादक मंडळास काहीही आक्षेपार्ह आढळल्यास लेख काढुन टाकावा.
अक्षरशः कैच्याकै