Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रंडीबाज कवी

ज — जव्हेरगंज, Sun, 03/20/2016 - 07:00
काल मी माझ्या कविता एका पोत्यात भरुन टाकल्या पोत्यात भरता भरता काही मधल्यामध्येच फाटल्या 'तुझ्या'वरच्या कविता मात्र एक एक करुन कापल्या घरामागे शेकोटी करुन मग त्यात काही फेकल्या 'रंडी'वरच्या कविता मात्र पुन्हा पुन्हा वाचल्या घडी घालून त्यांना मग पोत्यातच घातल्या तरीही काही कागद उडतच राहीले अर्धे मुर्धे जळालेले तुकडे फिरतच राहीले काही आभाळी जाऊन पुन्हा खाली झरतच राहीले तर काही राख होऊन वेदनांना कुरवाळत मरतच राहीले अजूनही काही कविता या पोत्यात सडतच आहेत एक 'ही' सोडली तर बाकी सगळ्या रडतच आहेत तुझ्या कवितांवर मी डाव साधला आहे तिरमिरीत का होईना पण एक घाव घातला आहे होरपळलेल्या मनाने अजून एक निर्णय घ्यायचा आहे या रंडीच्या कवितांचाही असाच एक घोट प्यायचा आहे - जव्हेरगंज [औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह]

प्रतिक्रिया द्या
4688 वाचन

💬 प्रतिसाद (10)
अ
अभ्या.. Sun, 03/20/2016 - 07:25 नवीन
जव्हेरभाऊ, गजाआड राहती का वो कविता कधी? दोन पापण्यातून जळणारी ती, दोन व्हटात कुचंबलेली ती, दोन हातात बांधलेली ती, अडकती का वो कधी दोन गजात?
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 03/20/2016 - 08:04 नवीन
जव्हेरभाऊ, ही कविता 'गजाआडच्या कविता' या कवितासंग्रहातून घेतलेली आहे का त्यावरून प्रेरणा घेऊन तुम्हीच लिहिली आहे? . . . जो भी हो.... लिहिलंय परिणामकारक! Sandy
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 03/20/2016 - 08:11 नवीन
काल त्यातल्या दोन चार कविता वाचल्या. पण त्यातून प्रेरित होऊन फक्त शेवटची ओळ ' [औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह]' तेवढीच घेतली आहे! बाकी तसा काही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 03/20/2016 - 08:06 नवीन
साली ही कविता कागदावरच्या शब्दांपुरती मर्यादित असती तर बरे झाले असते. जिवापाड जपलेला कागद केव्हाही फेकता येतो जाळता येतो फाडता येतो चुरगळता येतो हरवला तर पुन्हा एकदा आठवुन लिहिता येतो त्यावर लिहिलेल्या कवितेचे मात्र दुर्दैवाने तसे नसते . या तुरुंगातुन सुटका नाही ही जन्मठेप आहे (अंधारकोठडी मध्ये जन्मठेप भोगणारा) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sun, 03/20/2016 - 19:28 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
स
स्पा Sun, 03/20/2016 - 08:16 नवीन
जे ब्बात
  • Log in or register to post comments
स
स्पा Sun, 03/20/2016 - 08:17 नवीन
जे ब्बात
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 03/20/2016 - 09:42 नवीन
जबय्रा!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sun, 03/20/2016 - 09:46 नवीन
.
  • Log in or register to post comments
न
निनाव Fri, 09/16/2016 - 19:37 नवीन
जब्ब्बर्दस्स्स्स्त्त!!!! आज सर्व जुन्या पोस्त वाचतो आहे.. इतके दिवस न येण्याची खन्त आहे. खूप सुन्दर कविता सुट्ल्या ..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा