Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खुंटीवरच्या कविता

ज — जव्हेरगंज, Sun, 03/20/2016 - 16:46
वाढलेल्या दाढीचे खुंट घेऊन तो बराच वेळ बसला भादरायला कोणीच नसल्याने जरा उदासच वाटला उठून मग त्याने हातात वाटी वस्तरा घेतला ब्रश नसल्याने हातानेच तोंडाला साबण फासला आरशात बघून जेव्हा त्याने वस्तरा फिरवला कवीमहाशयांच्या मनात काव्यबीज संचारला उत्तररात्रीच्या उन्मत्त धुक्यात मग तो लिहीतच राहिला रात्रभर जागून लेखणीला जीवाच्या आकांताने छळतच राहिला सकाळी घोटभर दूध पिऊन पुन्हा पाने फाडतच राहिला संध्याकाळी पेन बदलून नव्या वह्या काढतच राहिला. दिवसांमागून दिवस गेले, पुनव जाऊन आवस आली कविमहाशयांची म्हैस, एकदा नव्हे दोनदा व्याली एकदा ऑफिसला बसलो असता सहाय्यक मला म्हणाला साहेब तो कवी आलाय या कविता छापायला उद्वेगानंच मी त्याला म्हटलं असल्या भिकारड्या कविता मला पुन्हा नको देऊ वाचायला ऑफिसमधून घरी जाताना कवीमहाशय मला बसस्टँडवर दिसले कवितांच गाठोडं उरावर घेऊन प्रयोग करत होते कसले? वाढलेल्या दाढीचे खुंट घेऊन मग ते कविताच पाडत सुटले पण भादरायला कोणीच नसल्याने जरा उदासच वाटले -जव्हेरगंज [कळंबा जेलमधून थेट ....]

प्रतिक्रिया द्या
2152 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ज
जेपी Sun, 03/20/2016 - 16:48 नवीन
आता फंटी वरच्या कविता येऊ द्या..;)
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sun, 03/20/2016 - 16:55 नवीन
काय ? कविता सप्ताह चालू आहे का ? बाकी तो जेलचा काय लोचा आहे ?
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 03/20/2016 - 17:46 नवीन
आणि तो 'लोचा' जेलात गेल्यावरच कळेल बर्का! ;) (ह. घ्या) बाकी, जव्हेरभौ, कविता एकदम अण्टच है, लै आवडली! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
ए
एस Sun, 03/20/2016 - 18:58 नवीन
ही जरा बरी पाडलीयं.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sun, 03/20/2016 - 19:26 नवीन
अरे रे! :)
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 03/21/2016 - 05:33 नवीन
कवीता...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा