Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काय भारी होतं ना बालपण

अ — अभिषेक पांचाळ, Sun, 03/20/2016 - 16:56
काय भारी होतं ना बालपण काही मिळत नसेल तर रडायचं पाहिजेच असा हट्ट धरून अडायचं आपली बालिश बुद्धी आईला कळायची आणि हवी ती गोष्ट लगेच मिळायची आता कितीतरी रडूनसुद्धा काही भेटत नाही आपल्यावाचून कुणाचं काहीच अडत नाही आपली हि बुद्धी आईला अजूनसुद्धा कळते पण काही देण्याची तिला संधी कुठे मिळते ? कळते मोठं झाल्यावर , खूप बदललोय आपण आठवलं कि वाटतं , काय भारी होतं ना बालपण नवीन खेळण्यांसाठी , हट्ट धरायचा मिळालं कि एकदम , उर भरायचा खेळत खेळत कधी , मधेच पडायचं तुटलं कि खेळणं , जोरात रडायचं आता वाटतं , तुटणारी खेळणीच बरी होती परत न मिळायला , ती थोडी खरी होती ? मोठं झाल्यावर आता , मन तुटतं सारखं जीवा भावाचं कोणी , क्षणात होतं परकं विचारलं कोणी , तरी हेच म्हणतं मनपण मोठं होण्यापेक्षा , काय भारी होतं ना बालपण झोप मिळत होती , आईच्या त्या कुशीत हसू दडलं होतं , बाबांच्या त्या मिशीत साऱ्यांचे ते लाड , अगदी दररोज होत होते सगळ्यांसोबत कसे , माझे जिव्हाळ्याचे नाते आता तेच सारं , हरवल्यासारखं दिसतं मोठं ते जग , अगदी खोटं नाटं भासतं जिव्हाळ्याचे शब्द , गायबच झालेत प्रेम करणारे सारे , कुठे दडून गेलेत ? दिवस नवा आला , कि विसरतो मी कालपण आठवतो मी मग , काय भारी होतं ना बालपण मती होती लहान , तरी शिकत होतो सारं रमत होतो जिथे , ते जगच होतं न्यारं कट्टी बट्टी करत , जपत होतो नाती निरागस भावाने , कधी खात होतो माती माती खाणं आता , महागात फार जातं मी पणा मध्ये , हरवून जातं नातं नातं जपायला , आता कट्टी बट्टी नाही कुठेतरी रमायला , इथे कधीच सुट्टी नाही कसे होतो तेव्हा , आता कसे झालो आपण आठवलं कि वाटतं , काय भारी होतं ना बालपण - अभिषेक पांचाळ

प्रतिक्रिया द्या
933 वाचन

💬 प्रतिसाद (1)
प
पियुशा Mon, 03/21/2016 - 11:54 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा