Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इतक्या सहज नसतं शक्य...

व — वटवट, Mon, 03/21/2016 - 09:33
इतक्या सहज नसतं शक्य, तोडणं आपल्या श्वासाची लय… आणि आपल्या रात्रीला लागलेली, तिच्या स्वप्नांची सवय… तसं काहीच नसायचं सोप्पं.. ती असताना आणि नसतानाही… हातही थरथरतो हल्ली, करताना तिच्या कवितेखाली सही… प्रश्न पडतो कसं सांभाळायचो, आपण स्वतःला तिच्यासोबत… प्रत्येक गोष्टीला अफाट मुल्य.. तसं काहीच नसायचं मोफत… म्हणजे चंद्राला अश्रू.. रात्रीला स्वप्न.. आणि तिच्या आठवणींना कविता द्याव्याच लागायच्या… नाहीतर कळ्याही फुलायच्या नाहीत… तश्याच रात्रभर जागायच्या… मग त्यांना पहाटे फुलवता फुलवता, माझ्या नाकी यायचे नऊ.. मग त्याच मला म्हणायच्या, "नकोस ना रे, असा वागत जाऊ.. आम्हाला असं आमच्या सुगंधापासून पारखं करणं बरं नव्हे.. नाराज होऊन जातात ना रे मग, फुलपाखरांचे थवे…!" बरं म्हणून, माफी मागून, जायचो तिथून उठून… प्रश्न पडायचा त्यांच्यासाठी, सुगंध आणू कोठून..? सारं सारं खूप महाग, काहीच नाही स्वस्त… मुळात प्रखर उन्हात, आतलं फुल फुलत नसतं… "ज्याचं जळतं त्यालाच कळतं"… एव्हढं बाकी खरंय… . . . इतकं सहज नसतं शक्य… तोडणं "आपल्याच श्वासांची लय…!" -चेतन दीक्षित…

प्रतिक्रिया द्या
1313 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ज
जव्हेरगंज Mon, 03/21/2016 - 12:08 नवीन
Image removed. लिके इत आवदलि
  • Log in or register to post comments
व
वटवट Fri, 05/20/2016 - 07:35 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 05/20/2016 - 08:19 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Fri, 05/20/2016 - 09:13 नवीन
सुरेखच. (दोन कडव्यांमध्ये जागा ठेवली असती तर अजुन वाचनीय झाली असती.!)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा