केस रंगवण्यातील एक प्रयोग.
बरेच वर्ष न्हाव्याकडे केस रंगवतांना एक प्रश्न छळत असे ....इतका रंग हे का लावतात ....
बारकाईने निरीक्षण करतांना एक लक्षात आले कि ते एक ठराविक इतका मुद्देमाल काहीही करून घेतातच ... तो एकावर एक थर असे चढवत जातातच ...उरला तर सावडून सावडून ब्रश वर घेऊन आधीचा रंगच रंगवतात (केस कधीचेच त्या थरांमध्ये लुप्त असतात)..
शेवटी घरीच एक प्रयोग करावा असे ठरवले :
- लोरीय्ल चे रंग, व्हॉल्यूम, अस्त्रीन्जंत, एक बाउल, आणि रबरी ग्लोव्हज असे घेतले.
- अंदाजे कमीत कमी क्वांटटी घेऊन मिसळले
-ग्लोव्हज घालून सरळ केसांना चोपडले ....हळू हळू मुळा पर्यंत जाऊन व्यवस्थित सगळीकडे तो लागला आहे असे पहिले आणि इतरत्र त्वचेला लागलेला रंग अस्त्रीन्जंत ने पुसून काढला ...
हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला .... तथापि अजून काय करता येईल ह्यावर विचार करतांना एक कल्पना सुचली ...
एक अतिशय बारीक कंगवा (किंवा फणी) घेऊन त्यावरच रंग चोपडून केस विंचरून काढले ...अक्षरश: ३- ४ मिनिटात रंगवून झाले आणि तेही अतिशय व्यव्स्थीत, सुटसुटीत आणि सलून पेक्षा जेमतेम १०-२० % रंग वापरून ...तितकेच टिकाऊ ...
अर्थात हे सगळे बेसिक रंगवणे इतपतच मर्यादित ठरावे ...ते हायलाईट वगैरे करता येईल किंवा कसे .... काय कल्पना नाय
हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला .... तथापि अजून काय करता येईल ह्यावर विचार करतांना एक कल्पना सुचली ... एक अतिशय बारीक कंगवा (किंवा फणी) घेऊन त्यावरच रंग चोपडून केस विंचरून काढले ...अक्षरश: ३- ४ मिनिटात रंगवून झाले आणि तेही अतिशय व्यव्स्थीत, सुटसुटीत आणि सलून पेक्षा जेमतेम १०-२० % रंग वापरून ...तितकेच टिकाऊ ...बायकांचे केस असेच रंगवायची पद्धत मी लेडीज पार्लर मधे शिकले आहे. आरशासमोर बसुन केसांना मधुन भांग पाडुन घ्या, मग एका बाजुच्या भागाला कलर लावुन त्यावर कंगवा सरळ दिशेने फीरवा, त्यानंतर पुन्हा थोड्या बाजुला भांग पाडुन घ्या आणि आधीचीच कृती पुन्हा करा. या कृतीत भांग पाडण्याआधी स्प्रेने थोड्या पाण्याचा वापर केला तरी चालतो. असे करत करत पुढचे पुर्ण केस रंगवुन घ्या, पुरुषांचे मागचे केस हे बारीकच असतात त्यामुळे त्यांना मागुन भांग पाडायची गरज नसते पण समजा ते मोठे असतील तर मागच्या बाजुनेही केस स्प्रेने ओले करुन भांग पाडुन आधीप्रमाणेच कलर करुन त्यावर सरळ दिशेने कंगवा फीरवावा. टीप - केस कलर करताना केसाच्या पुर्ण कडेला (पुढुन आणि मागुन्) कानाच्या बाजुला मागे कोल्ड क्रीमचा एक थर लावावा म्हणजे केसाव्यतिरिक्त स्किनचा भाग कलर होत नाही