Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

देव म्हणजे प्राचीन परग्रहवासी होते का?

अ
अमृता_जोशी
Mon, 03/21/2016 - 19:24
🗣 64 प्रतिसाद
सर्व मिपाकरांना नमस्कार.मी मिसळपावची गेल्या एक वर्षापासून नियमित वाचक आहे. आपणाला मी नवीन असेल, पण मी मात्र बऱ्याच जणांना ओळखते, काही दिवसांपूर्वीच खाते उघडले. आज धाडस करून धागा पाडते आहे. सूरवंट यांच्या या धाग्यामध्ये त्यांनी पिरामिड आअनि क्रोप सर्कल संबंधी प्रश्न विचारले होते, उत्तरे मिळाली नाहीत. इंटरनेटवर यासाठी खूप उत्तरे सापडतात, पण ती कळायला अवघड आहेत. सरळ, कळायला सोप्या अशा भाषेत सांगता आले तर बघा. १. पिरामिड प्राचीन एज्य्प्शिअन लोकांनी बांधलेच कसे? म्हणजे दहा-बारा हजार किलो वजनाचे वीस लाख दगड ५०० किलोमेतेर्वरून आणून भौमितिक दृष्ट्या शंभर टक्के बरोबर अशी ५०० फुट उंच इमारत त्यांनी बांधलीच कशी? पिरामिड बांधण्यात त्या लोकांची मदत देवांनी केली होती अशा अर्थाच्या कथा तिथल्या स्थानिक लोकात खुप आहेत म्हणे, हे देव म्हणजे त्या काळात प्रथ्वीवर आलेले परग्रहवासी असावेत काय? https://en.wikipedia.org/wiki/Ancient_astronaut_hypothesis २. पिरामिड म्हणजे फक्त एक थडगे आहे, त्याकाळच्या शेतीवर जगणाऱ्या लोकांना एवढे अफाट आणि अवाढव्य थडगे बांधायची गरज का भासली असावी? पिरामिड चा वापर रासायनिक पद्धतीने वीज तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. असे काही शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत सिद्ध केले आहे, यात काही तथ्य आहे का? http://www.amazon.com/Giza-Power-Plant-Technologies-Ancient/dp/1879181509 http://gizapower.com ३. क्रोप सर्कलचे रहस्य काय आहे? ४. रामायण, महाभारत खरेच घडले असण्याची शक्यता किती आहे? ५. दि लाइन्स ऑफ नाझ्का कशासाठी बांधल्या गेल्या असाव्यात? फक्त आकाशातूनच काही कॆलोमेतेर्स वर गेल्यानंतर पाहिली जाऊ शकेल अशी एखादी लाखो चौरस फुटाची आकृती पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांनी का काढली असेल? image https://en.wikipedia.org/wiki/Nazca_lines ६. माणूस हा प्राणी इतर प्राण्यांच्या तुलनेत खूपच जास्त बुद्धिमान आहे, असे का? माकडाच्या (किंवा तस्तम प्राण्याच्या) डीएनए मध्ये या प्राचीन परग्रह वासियांनी काही जनुकीय बदल करून माणूस हा प्राणी निर्माण केला अश्या अर्थाचेही भरपूर काही वाचण्यात आले आहे. संपूर्ण सात अब्ज लोक वेगवेगळ्या धर्मातून आपल्याला ज्या देवाने बनवल्याची गोष्ट सांगतात, ते देव हेच का? असे काही झाले असल्याची काही शक्यता आहे? आणखीनही खूप प्रश्न आहेत, तूर्तास एवढेच! धन्यवाद!

प्रतिक्रिया द्या
13788 वाचन

💬 प्रतिसाद (64)
स
सतिश गावडे Mon, 03/21/2016 - 19:32 नवीन
इतक्यात डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णींचे पॄथ्वीवर माणूस उपराच हे पुस्तक वाचलेत काय? तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची जाणकार उत्तरे देतीलच.
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 03/21/2016 - 19:48 नवीन
तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची जाणकार उत्तरे देतीलच. सहमत... :) "देवासी जीवे मारीले" नावाची मला वाटते लक्ष्मण लोंढे आणि अजून एक कोणीतरी (दोघांनी मिळून लिहीलेल्या) कादंबरीत देखील चांगली वर्णने आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
अ
अत्रन्गि पाउस Tue, 03/22/2016 - 07:52 नवीन
हेच म्हणायला आलो hoto
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
अ
अमृता_जोशी Mon, 03/21/2016 - 21:26 नवीन
हे पुस्तक नव्हते वाचले. वाचावे लागेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सूक्ष्मजीव Tue, 03/22/2016 - 06:14 नवीन
१२ एक वर्षांपूर्वी हे पुस्तक वाचले होते. तेंव्हा विकत घ्यायला शोधले तर आउट ऑफ प्रिंट होते. आत्ता मिळते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Tue, 03/22/2016 - 06:33 नवीन
पुण्यात सर्वत्र दिसते. बुकगंगावर ऑनलाइन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूक्ष्मजीव
स
सविता००१ Tue, 03/22/2016 - 07:17 नवीन
आहे हे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 03/22/2016 - 18:54 नवीन
पुस्तक ऑर्डर केलं. धन्यवाद. बुक गंगावर पुस्तक चाळत होतो त्यातल्या त्रिशूलाच्या कथेवर ताजमहाल नहीं भाई तेजोमहाल बोलीये वाल्या ओकांनी लिहिल्याची आठवण झाली. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
न
निशांत_खाडे Mon, 03/21/2016 - 19:37 नवीन
क्रोप सर्कलचे रहस्य ? "Bored people with tools"
  • Log in or register to post comments
प
प्रफुल्ल पा Mon, 03/21/2016 - 19:51 नवीन
बकवास धागा
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 03/22/2016 - 06:48 नवीन
बकवास आहे का नाही ते विचारलं नाहीयं जितक विचारलय तितकेच सांगा ! (माहीत नाही तर इतकं का चिडायचं) खत्रुड्ड ध्धा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रफुल्ल पा
ग
गणेश उमाजी पाजवे Mon, 03/21/2016 - 20:33 नवीन
अमृता ताई या साठी तुम्ही हिस्टरी टीवी १८ चा ancient aliens या मालिकेचे एपिसोड्स नक्की पाहावे. आपल्या बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील
  • Log in or register to post comments
अ
अमृता_जोशी Mon, 03/21/2016 - 21:25 नवीन
धन्यवाद. सगळे एपिसोड तीन तीन वेळा पाहिले हो, पण उत्तरे मिळण्याएवजी आणखीनच प्रश्न पडतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेश उमाजी पाजवे
म
मालोजीराव Tue, 03/22/2016 - 06:28 नवीन
erich von daniken याची सगळी पुस्तके वाचा, हा माणूस जगभर फिरलाय देव आणि एलियन या गोष्टींचा शोध घेण्यासाठी
  • Log in or register to post comments
अ
अद्द्या Tue, 03/22/2016 - 06:39 नवीन
+1 chariot of gods नावाचं पुस्तक आहे त्याचं . (मला एकाच माहितीये )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
च
चाणक्य Tue, 03/22/2016 - 18:20 नवीन
यांचं 'देव? छे, अंतराळवीर' हे ही पुस्तक छान आहे. चॅरीयटस् आॅफ गाॅड मधील बरेच संदर्भ आहेत त्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
च
चाणक्य Tue, 03/22/2016 - 18:31 नवीन
यांचं 'देव? छे, परग्रहावरील अंतराळवीर' हे ही पुस्तक छान आहे. चॅरीयटस् आॅफ गाॅड मधील बरेच संदर्भ आहेत त्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
क
कपिलमुनी Tue, 03/22/2016 - 06:37 नवीन
पाताळेश्वरचा कट्ट्यात या प्रश्नांची उत्तरे मिळतात असे ऐकून आहे. एकदा हजेरी लावून बघा
  • Log in or register to post comments
ग
गरिब चिमणा Tue, 03/22/2016 - 06:56 नवीन
चायला हे परग्रहवासी परत पृथ्विवर का आले नाहीत म्हणायचे? साधं झाड. लावलं तरी रोज ते कीती वाढलं याचे आपण निरिक्षण करतो, इथे तर माणुस तयार करुन एलीयन गायब झाले ते झालेच.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 03/22/2016 - 07:28 नवीन
मिपाच्या नवीन लेखिकेचे स्वागत !! अमृता तुम्ही राजेशजींची विश्वाचे आर्त लेखमाला वाचलीत का ? मला वाटतय सध्यातरी ते आणि तितकेच ज्ञान मानवाला आहे. बाकी अजूनही काही असू शकेल जे आपल्याला माहित नाही. काही कल्पना आपण रचू शकतो (माणूस पृथ्वीवर उपरा वगैरे) पण जोपर्यंत त्या गोष्टी सिध्द होत नाही वा त्यास काहीही आधार (सपोर्टिंग थिअरीज) मिळत नाही तोवर तरी आईनस्टाईन, डार्विन, स्टीफन हॉकिंग (आणि राघा ?) यांच्या थिअरीजच प्रमाण मानता येतील
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 03/22/2016 - 07:41 नवीन
आमच्या सदाशिवपेठेत बरेच देव राहतात. तिथे चौकशी केली का? ;-)
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 03/22/2016 - 07:54 नवीन
आहेत चिंचव्डातही ,कदाचीत माहिती मिळेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
स
सस्नेह Tue, 03/22/2016 - 09:35 नवीन
सदाशिवपेठेतले ना ? छे ! ते अव्वल पुण्यातलेच ! हजार पिढ्यांचा पुण्य-इतिहास सहज सांगतील ! परग्रहावरील देव म्हणे फार्फार पूर्वी एकदा पुण्यात आले होते, त्यांना यांनीच पिटाळून लावले म्हणतात ! खरे-खोटे देवच जाणे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
न
नाखु Tue, 03/22/2016 - 09:46 नवीन
गेला बाजार काही पुरावा आहे काय? कारण मुवी बाबा म्हणतात नसेल पुरावा तर मु(ड्)द्दा गाडावा !!! आधीक माहीतीसाठी मुवींकडील "बाबा निरंतारी-वचने बिनतारी" हे हस्तलिखीत वाचावे(मुवींनी दिल्यास) बाबा परात्पर भक्त नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
क
कविता१९७८ Tue, 03/22/2016 - 09:08 नवीन
असा विचार कधी केलाच नव्हता पण काही सत्ये विचार करण्यासारखी आहे खरी
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 03/22/2016 - 09:42 नवीन
एलीयन्स परत आले नाहीत कारण त्यानी पुण्यात "वाड्याबाहेर पार्किंग केल्यास हवा सोडणेत येईल व सोबत फ्री म्हणून अपमान करण्यात येईल " या पाटीची दहशत घेतलीय.
  • Log in or register to post comments
भ
भाऊंचे भाऊ Tue, 03/22/2016 - 09:42 नवीन
आपले मानसिक वय काय ?
  • Log in or register to post comments
अ
अमृता_जोशी Tue, 03/22/2016 - 16:33 नवीन
अम्म्म... माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ
ट
टवाळ कार्टा Tue, 03/22/2016 - 17:27 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृता_जोशी
न
निशांत_खाडे Tue, 03/22/2016 - 19:39 नवीन
साष्टांग __/\__ =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृता_जोशी
म
मितभाषी Tue, 03/22/2016 - 10:27 नवीन
त्यावेळेस मानव अत्यंत प्रगत टप्पयात असेल. नंतर प्रलयात सगळे नष्ट होऊन परत बे एके बे सुरू झाले असेल.
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 03/22/2016 - 10:34 नवीन
बे एके बे नव्हे, बेकंबे!!! मराठी पाढ्यात 'दोन'ऐवजी हा गुजराथी 'बे'उठून आला, बे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
म
मितभाषी Tue, 03/22/2016 - 10:50 नवीन
आम्ही एके दुने त्रिक चोक पंचे सक साते आठे असे म्हणायचो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
अ
अत्रे Tue, 03/22/2016 - 10:36 नवीन
लहानपणी हे विचार खूप भारी वाटायचे। आताशा बरचसं वाचल्यावर कळतं कि बरीच फेकाफेक आहे यात, अजून काहीच वैज्ञानिकदृष्टया सिध्द झालेले नाही।
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Tue, 03/22/2016 - 10:56 नवीन
कळेल कळेल निश्चित कळेल हं १० वर्षांनी कळेल का १०० का १००० की १००,०००,०००,००० वर्षांनी कळेल ते पहायचं रच्याकने विषय रोचक आहे. याविषयी "देव की अंतराळातील वैज्ञानिक " असे काहीसे नाव असलेले पुस्तक वाचलं होतं वाचताना मस्त वाटते.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 03/22/2016 - 11:02 नवीन
रच्याकने विषय रोचक आहे. हा.हा.हा... उत्पती कशी होते { थेअरी पलिकडे काहीच नाही } पेक्षा उत्पत्ती का होते ? असा विचार करुन पहाणे जास्त रोचक आहे ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Habibi Ya Eini... :- Nourhanne
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
स
सस्नेह Tue, 03/22/2016 - 11:31 नवीन
'देव ? छे ! परग्रहावरील अंतराळवीर !!' ले. बाळ भागवत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
उ
उगा काहितरीच Tue, 03/22/2016 - 12:25 नवीन
सही पकडे ।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
र
रायनची आई Tue, 03/22/2016 - 12:04 नवीन
"क्रोप सर्कलचे रहस्य ? "Bored people with tools" मला नाही तस वाटत..काही दिवसापूर्वीच National Geopgraphic वर एक documnetry बघितली होती..प्रचन्ड आकारमानाची आणि अतिशय complex डिसाईन्स असलेली crop circles कोणी केवळ मजा किवा चाळा म्हणून काढेल अस वाटत नाही..ती काढण्यापूर्वी नीट मापे घेणे, पूर्ण Aria चा विचार करणे आवश्यक आहे..ते रातोरात होणार काम वाटत नाही..तुम्ही हवतर google वर जाउन crop circles images पाहु शकता..
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Tue, 03/22/2016 - 12:09 नवीन
पिरॅमिड्स पाहून आपल्याला थक्क व्हायला होतं खरं. एवढं प्रचंड काम त्याकाळच्या तंत्रज्ञानाने कसं केलं असेल असाही प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण त्यापोटी परग्रहवासीय वगैरेंना आणण्याची गरज नाही. - पहिलं म्हणजे बहुतांश दगड जवळच्या खाणींमधूनच आणले होते. आतला अगदी थोडा भाग ५०० मैलांवरून आणला होता. ते नदीतून आणले जायचे, आणि रस्त्यांवरून बांधकामाच्या ठिकाणी आणले जात. - दगडांची वाहतुक करण्यासाठी वापरलेले स्लेड्स मिळालेले आहेत. जवळच्या खाणीतून गुळगुळीत केलेल्या रस्त्यांवरून बैलांनी ओढून दहा टनी दगड नेणं अशक्य नाही. - यासाठी हजारोंच्या संख्येने कामगार कामाला होते. पूर्वी ते सगळे गुलाम होते असं मानलं जायचं, पण आता ते पगारी कामगार होते असं मानलं जातं. - हे काम वीसेक वर्षं चालू होतं. - ते बांधण्यासाठी नक्की काय पद्धत वापरली याबद्दल वेगवेगळी मतं असली तरी अनेक इंजिनियर्सनी वेगवेगळ्या पद्धती सुचवलेल्या आहेत. - विशिष्ट आकाराचे दगड एकमेकांवर विशिष्ट पद्धतीने रचले की त्यातून योग्य तो कोन साधणं फारसं कठीण नाही. 'पण हे सगळं कशासाठी?' असा प्रश्नही साहजिक आहे. तत्कालीन राजांचा विश्वास आणि अमरत्वासाठी धडपड यापोटी हजारो लोक कामाला जुंपवणं शक्य आहे. (कदाचित ती त्याकाळची मनरेगा योजना असेल :) )
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Tue, 03/22/2016 - 20:18 नवीन
(कदाचित ती त्याकाळची मनरेगा योजना असेल :) ) >> आता कळलं मनरेगा ला काही लोक थडगं का म्हणतात ;-) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 03/22/2016 - 18:39 नवीन
आवडता विषय. ह्यावर भरपुर वाचन केलयं. सवडीने टंकेन.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Tue, 03/22/2016 - 18:47 नवीन
अगदी जवळचा तारा Alpha Centauri हा ४.२ प्रकाशवर्षे दूर आहे. म्हणजे प्रकाशाच्या वेगानेही तिथे पोचायला ४ वर्षे लागणार. एखाद्या एलियन जमातीने प्रकाशाच्या किंवा किमान त्याच्या १/४ वेगाने जाणारं अवकाशयान शोधून जरी काढलं असेल तरी त्या यानाचं वस्तुमान केवढं असेल? गणितांनुसार (इथे चूभूद्याघ्या. हे वाचलेलं आहे.) प्रकाशाएवढा वेग हवा असेल तर विश्वाएवढं वस्तुमान लागेल. म्हणजे त्याच्या १/४ वेग हवा असेल तरी प्रचंडच वस्तुमान लागेल. नक्कीच पृथ्वीपेक्षा जास्त. पृथ्वीपेक्षा जास्त वस्तुमान पृथ्वीवर कसं येईल? पृथ्वीच त्याच्याकडे आकर्षिली जाईल. आणि असं झालं तर त्याचा काहीतरी पुरावा पृथ्वीच्या core मध्ये असायला हवा. तसा काहीही पुरावा आढळत नाही. पिरॅमिड्स आणि इतर गोष्टी चमत्कार म्हणतो आपण पण प्राचीन इजिप्शियन संस्कृती तेवढी प्रगत असावी. अलेक्झांड्रियाचं ग्रंथालय जाळलं गेल्यामुळे कितीतरी ज्ञान नष्ट झालं. कदाचित त्यात त्यांनी त्याकाळी वापरलेल्या तंत्रज्ञानाचा उल्लेख असेल. रच्याकने पृथ्वीवरच माणूस (प्रगत संस्कृती या अर्थाने) आहे असं मला वाटत नाही. विश्वाच्या पसा-यात दुसरीकडे जीवन नक्कीच असणार. जशा विज्ञान कथांमधल्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात आल्या तसं हेही यावं अशी इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Tue, 03/22/2016 - 19:56 नवीन
ते वस्तुमानाचं काय झेपलं नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
व
विकास Tue, 03/22/2016 - 21:15 नवीन
प्रकाशाएवढा वेग हवा असेल तर विश्वाएवढं वस्तुमान लागेल. म्हणजे त्याच्या १/४ वेग हवा असेल तरी प्रचंडच वस्तुमान लागेल. आत्ताच्या स्थल-काल संदर्भातील गणिताप्रमाणे बरोबरच आहे. ते समिकरण तसेच राहील का कोण जाणे! विज्ञानकथांमध्ये हायपरस्पेसचा एक उल्लेख असतो. स्टारवॉर्स मधे देखील त्याचा वापर करून एका आकाशगंगेतून दुसरीकडे गेल्याचे प्रकार दाखवले आहेत जे विज्ञानापेक्षा आत्तातरी चमत्कारीक वाटू शकतात. मात्र याच संदर्भात आता हायपरलूप हा भूतलावरील प्रयोग चालू झाला आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Tue, 03/22/2016 - 21:30 नवीन
(प्रकाशाच्या वेगाने जायचे असल्यास विश्वाएवढे वस्तुमान लागेल) लाॅरेन्स आणि फिट्झजेराल्ड यांनी केलेल्या गणितानुसार काढलेला आहे बहुतेक. बरोबर आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Wed, 03/23/2016 - 12:40 नवीन
आईन्स्टाईनच्या एका समिकरणात आहे... Image removed. यात m म्हणजे गतीमधे असतानाचे मास (mass वजन?) आहे. m(0) हे मुळचे, v ही velocity आणि c speed of light आहे. त्यामुळे velocity जितकी लाईटच्या velocity च्या जवळ जाईल तितके गतीमधे असतानाचे mass वाढत जाईल... ही अगदी पुस्तकी माहिती, मला वाटते ११वीत का १२ वीत असलेली आत्ता जालावर सापडली. बाकी जाणकार सांगतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
क
काळा पहाड Fri, 03/25/2016 - 20:06 नवीन
ते बरोबर आहे. पण प्रकाशाच्या वेगाने जायचे बाकीचे मार्ग आहेत. सध्या ते सैद्धांतिक स्वरूपात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
न
निशांत_खाडे Tue, 03/22/2016 - 19:58 नवीन
जमेल तशी उत्तरे देतोय, थोडा वेळ परग्रहवासी किंवा देव हा विचार मनातून काढून टाका.
१. पिरामिड प्राचीन एज्य्प्शिअन लोकांनी बांधलेच कसे? म्हणजे दहा-बारा हजार किलो वजनाचे वीस लाख दगड ५०० किलोमेतेर्वरून आणून भौमितिक दृष्ट्या शंभर टक्के बरोबर अशी ५०० फुट उंच इमारत त्यांनी बांधलीच कशी?
प्राचीन एजिप्शिअन लोक हे तत्कालीन सर्वात प्रगत लोकांपैकी होते. हजारो मजूर, घोडे, बैल, हत्ती, इत्यादींनी वीस वर्षे काम केल्यास या दगडांची वाहतूक अश्यक नाही, भौमितिक दृष्ट्या बरोबर असण्यामागे त्या लोकांची बुद्धी व अनुभव कारणीभूत होता, म्हणजे गीझा च्या पिरामिड च्या आधीही शेकडो वर्षांपासून हे लोक पिरामिड बनवत आले आहेत, त्याने कदाचित त्यांचे ज्ञान परिपक्व झाले असावे. पण पिरामिड उभे करणे त्या लोकांसाठी अश्यक नव्हते. पिरामिड म्हणजे फक्त एक थडगे आहे, त्याकाळच्या शेतीवर जगणाऱ्या लोकांना एवढे अफाट आणि अवाढव्य थडगे बांधायची गरज का भासली असावी? पिरामिड चा वापर रासायनिक पद्धतीने वीज तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. असे काही शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत सिद्ध केले आहे, यात काही तथ्य आहे का? ताजमहालही थडगेच आहे. ती गरज त्या लोकांना नाही तर राजाला भासली होती. आणि बाकी हे रिकामटेकडे शास्त्रज्ञ काहीही सिद्ध करतील.
क्रोप सर्कलचे रहस्य काय आहे?
याचे उत्तर मी अगोदरच दिले आहे. अधिक माहिती इथे मिळेल http://www.colinandrews.net/David_Chorley-Family-Statement-Colin_Andrews-Crop_Circles.हटमल ४ पास,
लाइन्स ऑफ नाझ्का कशासाठी बांधल्या गेल्या असाव्यात? फक्त आकाशातूनच काही कॆलोमेतेर्स वर गेल्यानंतर पाहिली जाऊ शकेल अशी एखादी लाखो चौरस फुटाची आकृती पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांनी का काढली असेल?
त्या लोकांचा समाज होता की देव आकाशात राहतो, म्हणून त्याला इम्प्रेस करण्यासाठी हा उपद्व्याप.
माणूस हा प्राणी इतर प्राण्यांच्या तुलनेत खूपच जास्त बुद्धिमान आहे, असे का? माकडाच्या (किंवा तस्तम प्राण्याच्या) डीएनए मध्ये या प्राचीन परग्रह वासियांनी काही जनुकीय बदल करून माणूस हा प्राणी निर्माण केला अश्या अर्थाचेही भरपूर काही वाचण्यात आले आहे.
चित्ता सर्वात जास्त वेगाने का धावतो? जिराफाची मान सर्वात लांब का असते? तसाच हा प्रश्न आहे, माणूस जास्त बुद्धिमान का आहे?
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 03/22/2016 - 20:59 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निशांत_खाडे
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा