Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पट पट पट मोजीत नोटा

म — मूखदूर्बळ, Wed, 03/23/2016 - 08:17
पट पट पट पट मोजित नोटा चाले राजा नेता ओठावरती जीन मिसळूनी घेतो रुपेरी सोडा उंची फेरारी स्वतःस छान जनास करी ईंधन दरवाढ भाववाढ ती सामान्यांस अन स्वत: फिरवीतो स्कोडा नेता राजा फार हुषार सत्तेवर तो होता स्वार नुसता त्याला पुरे हवाला स्वीस अकौन्ट काढा सात सदनिका भूखंड सात बळकावितो हा एक दमात आला आला राजा नेता सोडा रस्ता सोडा मूळ कविता: टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा उंच भरारी दोन्ही कान ऐटीत वळवी मान कमान मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा घोडा माझा फार हुशार पाठीवर मी होता स्वार नुसता त्याला पुरे इशारा कशास चाबुक ओढ़ा सात अरण्ये समुद्र सात ओलांडीत हा एक दमात आला आला माझा घोडा सोडा रस्ता सोडा

प्रतिक्रिया द्या
3226 वाचन

💬 प्रतिसाद (11)
स
सस्नेह Wed, 03/23/2016 - 08:33 नवीन
स्पर्धेत का नाही दिले ?
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 03/23/2016 - 09:13 नवीन
उशीर झाला की जरा!
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Wed, 03/23/2016 - 16:23 नवीन
स्पर्धेसाठी हवं होतं. (नावासह) फॉरवर्ड करून पसरवावं इतकं छान जमलं आहे. कोणीतरी याला जोडीला रेखाचित्र काढून टाका धाग्यात, फारच पोटेंशियल आहे!
  • Log in or register to post comments
र
रातराणी गुरुवार, 03/24/2016 - 20:06 नवीन
आवडले! भारी जमलय!
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Fri, 03/25/2016 - 03:02 नवीन
छान जमलंय की.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Fri, 03/25/2016 - 05:04 नवीन
छानच
  • Log in or register to post comments
म
मूखदूर्बळ Tue, 03/29/2016 - 08:50 नवीन
धन्यवाद :) स्पर्धेसाठी उशीर झाला :)
  • Log in or register to post comments
अ
असंका Tue, 03/29/2016 - 09:02 नवीन
काय सुरेख! फारच जोरदार..
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 03/29/2016 - 09:53 नवीन
अरे वा ! सहीच आहे की हे !
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 03/29/2016 - 10:42 नवीन
अगदी "भुजा"त बळ असलेली कविता.
  • Log in or register to post comments
म
मूखदूर्बळ Wed, 03/30/2016 - 09:51 नवीन
परत एकदा धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा