Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आडवाटेची भ्रमंती - जांभे धरण

स
स्पा
Fri, 03/25/2016 - 06:38
💬 50
धुळवडीला दर वर्षी ट्रेक होतोच, पण या वर्षी अति उन्हाळा असल्याने ट्रेक न करता नुसतेच कुठे फिरून येत येईल का या विचारात होतो, ठिकाण पण हटके हवे, म्हणून कंजूष काकांशी बोलणे झाले, त्यांनी सुचवलेला जांभे धरणाचा प्रस्ताव आवडला.यावेळी बाईक ने जायचे नाही असे ठरवले होते. मध्य रेल्वेच्या आसनगाव स्टेशन पासून शहापूर,तिथून नेरवली गावापर्यंत बस(२०किमी),पुढे दीड दोन किमी चालत असा मार्ग होता. पहाटे ६.१४ ची आसनगाव पकडली,काका,मी आणि माझा एक मित्र असे तिघेच होतो.आसनगाव ते शहापूर रिक्षा मिळाली (१० रुपये सीट).तोथून शहापूर डेपो ला पोचलो.लगेचच ७.२० ची बस मिळाली.साधारण अर्ध्या तासात नेरवणे गावात पोचलो.वातावरण मस्त गार होते.बसमधून उतरल्यावरच मन एकदम प्रसन्न झाले.अशा चेंज ची खूप गरज असते. फ्स्दफ्स गाव जेमतेम २०-३० घरांचे असावे.एक माणसाला धरणाचा रस्ता विचारून पुढे निघालो.सगळीकडे पक्षांची किलबिल सुरु होती.धरण क्षेत्राखालचा परिसर असल्याने सगळीकडे छान हिरवेगार होते.मार्च महिना सुरुये असे अजिबात वाटत नव्हते. rfesf xc ddasd वाटेत काका बरीच पक्षांची माहिती देत होते.पाणी भरपूर असल्याने शेते चांगलीच डवरलेली होती.असेच पाणी सर्वांनी वाचवले तर मराठवाडा, विदर्भ देखील असाच हिरवागार दिसेल असे वाटून गेले.या शेतकर्यांनी केलेली एक चांगली गोष्ट म्हणजे झाडे अजिबात न तोडता आजूबाजूने शेती केलेली होती.मध्येच वाट वाकडी करून एका शेतात घुसलो. सडसड ds एका बाजूला ज्वारी आणि दुसर्या भागात भरपूर भाजी लावलेली होती, एका आंब्याखाली दोन गायी एक म्हैस बांधलेली होती,चिकूची दहा बारा झाडे लगडलेली होती.एकूण एकदम पिक्चर परफेक्ट दृश्य होतं gg फड मग पुढे धरणाकडे कडे निघालो,मध्येच मोहाचा सुगंध आला.बाजूलाच मोहाचे झाड होते,त्याची टपोरी फुले खाली पडत होती.हि खायला भारी लागतात, गोडसर आणि एक स्पेसिफिक सुगंध. मोहाचे झाड स्फ्दफ्द फुले qssd काही वेळातच धरणावर पोचलो,इथे जर झाडी जास्तच दाट झालेली होती.सगळी कडे धुक्याची चादर लपेटली गेली होती.भरपूर पाणी होते.महत्वाची गोष्ट म्हणजे "शांतता". पक्षांचा सोडला तर अजिबातच कसला आवाज नव्हता.इथे बराच वेळ बसलो. सडसड दावड wdd खाली मासे पकडणाऱ्यांचे एक घर होते, कसलेसे ऑफिस सुद्धा होते.तिकडे चहा मिळेल का म्हणून चौकशी केली पण नाही मिळाला. sds धरणातले पाणी वरून खाली येत होते. क्फ्द्फ ddsads ds थोड्यावेळाने निघालो, आता पोटपूजेची सोय बघायची होती.येताना परत त्याच शेतात आंब्याखाली पसरलो.बांधावर मस्त हातपाय तोंड धुवून फ्रेश झालो. वेज चिज सॅन्ड्विच,लसून चटणी-पोळ्या,द्राक्ष, केळी, लाडू,आणि अजून काय काय असा भारी बेत होता.खाऊन झाल्यावर मस्त पैकी तिथेच आडवे झालो, आता करण्यासारखे काहीही नव्हतेच.शांतता ऐकत कसा वेळ गेला समजला नाही, काका त्यांच्या भटकंतीचे भरपूर किस्से सांगत होते, त्या मानाने आपण काहीच फिरलो नाही याचीची खंत वाटत होती.थोड्यावेळाने सगळे आवरून परतीला लागलो. आता भयंकर उन्ह तापलेले होते.सकाळचा गारवा कुठच्या कुठे गेलेला होता.बस येते त्या जागी आलो.अजून एक तास वेळ असल्याने तसेच उगाच बसून राहिलो. गावात धुळवड असल्याने सोंग नाचत आली.फुल तर्राट. आमच्या सोबतच्या एका गावकर्याने मग "अरे ए पावन हैती, जा गावात हिगडे नगा त्रास देऊ" म्हणत त्यांना पळवून लावले. बस येईस्तोवर मग उगाच गप्पा मारत बसलो.बरोबर एक ला बस आली. आणि परतीचा प्रवास सुरु झाला. ffg

प्रतिक्रिया द्या
17321 वाचन

💬 प्रतिसाद (50)
प
प्रचेतस Fri, 03/25/2016 - 06:43 नवीन
मस्त छोटेखानी भटकंती. कंजूसकाका, नूलकरकाका ह्यांसारख्या दर्दी माणसांसोबत भटकायला खूप मस्त वाटतं. ह्यांच अनुभवविश्व समृद्ध आहे. सतत काहीनाकाही माहिती आपसूकच मिळत जाते.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 03/26/2016 - 06:56 नवीन
एक प्रयत्न; पक्षांचा आवाज फोन रेकॅार्डिंग http://vocaroo.com/i/s0LkkV39XG6o FILE SIZE : 1.9 MB
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
स्पा Sat, 03/26/2016 - 07:09 नवीन
जबरदस्त काका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कवितानागेश Fri, 03/25/2016 - 06:44 नवीन
ऑं! अच्चं जाल तल! ;)
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 03/25/2016 - 06:44 नवीन
फोटो लोड होण्याआधीच नुसते वर्णन वाचूनच चित्त प्रसन्न झाले. इथे पुण्याहून कसे जाता येईल?
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 03/25/2016 - 06:53 नवीन
पुण्याहून यायचे म्हणजे गाडी असेल तर पुणे- नगरमार्गे मुरबाड तिथून शहापुर . किंवा मग ट्रेन ने कल्याणला येऊन पुढे लोकल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
न
नाव आडनाव Fri, 03/25/2016 - 16:55 नवीन
पुणे- नगरमार्गे मुरबाड कल्याण - नगर रोड वर आळेफाटा आहे. पुण्याहून आळेफाटा आणि तिथून कल्याणला एस.टी. ने जातांना कल्याणच्या (नक्की आठवत नाही पण) ~ अर्धा तास आधी आहे मुरबाड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
श
शैलेन्द्र Sun, 03/27/2016 - 15:22 नवीन
Pune- Nashik phata- Ale phata- MAlshej- saralgaon- Naravane It will be 6 hours journey. Better is by train. Pune- Kalyan- asangaon- shahapur- naravane
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
अ
अजया Fri, 03/25/2016 - 07:12 नवीन
मस्त ठिकाण आहे.छान झालेली दिसते निवांत भटकंती. आमच्या भागातल्या धरणांना चक्कर मारायला हवी वाटायला लागलं ही भटकंती वाचून. कंजूस काकांना तीही ठिकाणं माहित असणार यात संदेह नाही!
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Fri, 03/25/2016 - 07:16 नवीन
मस्त. डोळे निवले.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 03/25/2016 - 07:22 नवीन
वाचून अन फोटो बघून एकदम मस्त वाटलं!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 03/25/2016 - 07:56 नवीन
मस्त फोटो काढतो स्पा.मला तो दृष्यातला फोटो कसा शोधतो ते आवडलं. नेरवली नाही ने ह रो ली. मुंबई ठाणेकरांनी पावसाळ्यात नक्की जावे.हे धरण लगेच वाहते आणि भिंतीवरून वाहणारे शुभ्र पाणी मस्तच. पुण्याहून येण्यासाठी : मागे कशेळेलेला आलात तोच रस्ता परंतू कशेळे येथे उजवीकडे आत वळायचं नाही पुढे मुरबाडला जायचं.(वाटेत म्हसा येथेही उजवीकडे सहा किमिवर एक जांभुरडे तलाव सिद्धगडाच्या पायथ्याशी आहे.) मुरबाडवरून शहापुर रस्ता आहे त्या रस्त्याने लेणारखुर्द येथे उजवीकडे नेहरोली गाव आहे.पुण्याकडून तसं बरंच दूर आहे. #रसायनीपासून जवळ जांभिवली/सवणे गावचा पाटबंधारे तलाव आहे.रम्य ठिकाण रिलाअन्स पेट्रो जवळ आहे.याविषयी मागे एकदा लिहिलं होतं.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 03/25/2016 - 08:12 नवीन
शहापुर ( आसनगाव स्टेशनहून ३ किमी ) ते नेहरोली ( १९ किमी ) रूट ट्रेस. Image removed. सकाळी ( video तला स्क्रीन शॅाट ) Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 03/25/2016 - 08:32 नवीन
छोटेखानी वृत्तांत आवडला. फोटो स्पाटच. मोहाची फुलं पाहून वृत्तांतात काही तपशील वगळले असतील का असे उगाच वाटले. ;) -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 03/25/2016 - 08:37 नवीन
सही पहचाना डाॅक :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज
जगप्रवासी Fri, 03/25/2016 - 10:20 नवीन
मस्त भटकंती
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 03/25/2016 - 10:22 नवीन
ह्म्म !!
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Fri, 03/25/2016 - 11:25 नवीन
मस्तच फोटो. शेवटी पाणी आहे तर सगळं आहे!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 03/25/2016 - 11:34 नवीन
सुंदर फोटो. शेवटचा तर फारच आवडला. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 03/25/2016 - 12:55 नवीन
भारी रे स्पावड्या. महिन्द्रा कमांडरचा दुसरा फोटो लै आवडला. त्यांची अ‍ॅड कॅम्पेन अशीच असायची. जीप हिरवी/खाकी असायची फक्त. ;)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 03/25/2016 - 14:00 नवीन
वाह,किती सुंदर प्रचि अन सुरेख वर्णन ! स्पावडुभाऊ, तुमच्या bबरोबर जाम्भे धरणाची सहल करtताना मजा आली. मस्तच !
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 03/25/2016 - 15:57 नवीन
सिद्धु??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
अ
अनुप ढेरे Fri, 03/25/2016 - 14:26 नवीन
मस्त आहेत फटू!
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Fri, 03/25/2016 - 14:38 नवीन
अजून एका अनवट पर्यटन स्थळाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद ही जागा सुनियोजित पद्धतीने विकसित झाल्यास स्थानिकांना रोजगार मिळू शकतो सरकार ला कर आणि पर्यटकांना एक अजून पर्याय
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/25/2016 - 14:43 नवीन
पांSsssssssssडूSsssssssss ऊऊऊऊ Image removed. वाईट्ट काडलीव फोटू तू पांडू! Image removed. आत्ताच्या आत्ता तिकडं जाऊ वाटायलय! Image removed. दुत्त दुत्त ! Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 03/26/2016 - 04:53 नवीन
'पांSsssssssssडूSsssssssss ऊऊऊऊ' च्या पुढची ही Image removed. स्मायली लैच भावनोत्कट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 03/26/2016 - 07:18 नवीन
बरं मग!? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
स्वामी संकेतानंद Fri, 03/25/2016 - 17:17 नवीन
मस्त फोटो आणि वर्णन!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 03/25/2016 - 17:32 नवीन
स्पा, फोटो आवडले. कंजूसकाकांनी दिलेले फोटो दिसत नाहीयेत मला.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 03/25/2016 - 17:51 नवीन
स्पांडोबा, एक नंबर फटू, डॉळे निवले शीर्यसलि.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 03/25/2016 - 19:24 नवीन
अप्रतिम! सगळे फोटो एकसे बढकर एक!
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 03/25/2016 - 19:43 नवीन
शांततापूर्ण भटकंतीचे वर्णन आवडले. फोटोज छानच.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 03/26/2016 - 04:57 नवीन
मस्तं रे. बरेचं दिवसात अश्या भटकंतीला जायला नाही मिळालं :(!!!!!!!!! तो वठलेल्या झाडाचा फोटो एक नंबर आलाय.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 03/26/2016 - 08:42 नवीन
फोटो आणि वर्णन दोन्ही छान! स्वाती
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sun, 03/27/2016 - 11:30 नवीन
या जागी जाणं आलं आता.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Sun, 03/27/2016 - 12:55 नवीन
क्या बात हे ! किती सुंदर जागा.. अशा अपरिचित जागांवर जायला हवं. कंजुस काकांचे लेख शोधुन वाचायला हवेत. तुमचे फोटोज पण झकास !
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Sun, 03/27/2016 - 12:55 नवीन
क्या बात हे ! किती सुंदर जागा.. अशा अपरिचित जागांवर जायला हवं. कंजुस काकांचे लेख शोधुन वाचायला हवेत. तुमचे फोटोज पण झकास !
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sun, 03/27/2016 - 15:27 नवीन
मस्त फोटो , मजा आलि बघायला
  • Log in or register to post comments
ज
जुइ Mon, 03/28/2016 - 00:32 नवीन
फोटो आणि छोटेखाणी भटकंती आवडली.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Mon, 03/28/2016 - 07:56 नवीन
एक नंबर!
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Mon, 03/28/2016 - 09:25 नवीन
सुंदर भटकंती आणि अफाट मस्त फोटो. छानच ठिकाण निवडलंय रे.. आवडली भ्रमंती
  • Log in or register to post comments
प
पियुशा Mon, 03/28/2016 - 09:47 नवीन
मस्त गार गार वाटल बघुन :)
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 03/28/2016 - 12:12 नवीन
मस्त भटकंती...धरणात डुंबला नाही वाटते?
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 03/29/2016 - 16:27 नवीन
चान चान!! ;)
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 03/29/2016 - 18:13 नवीन
अप्रतिम फोटो
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 03/29/2016 - 21:29 नवीन
मस्त सफर, अप्रतिम फोटो !
  • Log in or register to post comments
र
रुपी Tue, 03/29/2016 - 21:59 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 03/30/2016 - 13:48 नवीन
खुपच सुंदर फोटो ! ॐ किल्कक्लिकफोटोकाढनाथाय पांडुब्बाय नमः !
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 03/30/2016 - 15:50 नवीन
ते 'हस्तमध्येघट्टपकडकॅमकलश' राह्यलं ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
न
निश Wed, 03/30/2016 - 16:28 नवीन
मस्त सफर, सुंदर फोटो !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा