कुंजविहारी हसे का मनी -
कुंजविहारी हसे का मनी -
निद्राधीन ती राधा बघुनी
नयनी उतरे शाममुरारी
हळूच नकळत स्वप्न होऊनी
स्वप्नामधली राधा बावरी
गेली सगळे सत्य समजुनी
हसे खुदुखुदू झोपेमधुनी
खट्याळ कृष्णाची मोहिनी
देशी रे किती त्रास तू मजला
वदते राधा जात मोहुनी
मोरपीस मग अलगद गाली
कान्हा हसतो लबाड फिरवुनी
खोड्या वाढता म्हणते राधा
जा तू आता निघून येथुनी
स्वर राधेला गोड ऐकवी
मुरलीधर हळु पावा काढुनी
नयने उघडी राधा अपुली
मधुर सूर ते पडता कानी
आत्ता होता कुठे कन्हैया
शोधत हसते घरभर फिरुनी
लबाड आणि खट्याळ लीला
आठवे राधा स्वप्नी रंगुनी ..
.
http://mee-videsh.blogspot.in/
💬 प्रतिसाद
(11)
व
विद्यार्थी
Sun, 03/27/2016 - 01:15
नवीन
:-)
राधा आणि कृष्ण हा विषय कवी आणि वाचकांसाठी कधीच जुना होणार नाही. मस्त कविता, एकदम आवडली.
- Log in or register to post comments
र
रातराणी
Sun, 03/27/2016 - 03:45
नवीन
सुरेख!
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Sun, 03/27/2016 - 04:44
नवीन
गोड लिहिलंय.
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Sun, 03/27/2016 - 04:57
नवीन
छान!
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Sun, 03/27/2016 - 05:19
नवीन
छान
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 03/27/2016 - 07:45
नवीन
मस्त. आवडली
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 03/27/2016 - 07:55
नवीन
अत्तिशय सुंदर.
- Log in or register to post comments
व
विदेश
Sun, 03/27/2016 - 10:57
नवीन
विद्यार्थी, रातराणी, लीमाउजेट, प्राची अश्विनी, पाषाणभेद, अभ्या, आत्मबंध ---
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार !
- Log in or register to post comments
ए
एस
Sun, 03/27/2016 - 10:59
नवीन
वा! कवी जयदेवांच्या काव्याची आठवण झाली.
- Log in or register to post comments
उ
उल्का
Mon, 03/28/2016 - 11:21
नवीन
खुपच छान लिहिली आहे.
- Log in or register to post comments
व
विदेश
Mon, 03/28/2016 - 17:01
नवीन
एस, उल्का -
प्रतिसादासाठी धन्यवाद !
- Log in or register to post comments