Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

“उभारू आपण गुढी!”

उ — उल्का, Mon, 03/28/2016 - 11:35
( हल्ली जमाना आहे ‘एक्स्चेंज ऑफर’चा! अशीच एक ऑफर येते ‘रिडेवलपमेंट’ची. जुन्या इमारतीच्या बदल्यात नवी कोरी दणकट इमारत! मग काय? जुन्या पिढीची 'जिवाची घालमेल'. नव्या पिढीची 'उत्साही लगबग'. पण, त्या जुन्या इमारतीला काय बरे सांगायचे असावे? ) तरुण होते मी पूर्वी जेव्हा गृहलक्ष्मी आली घरी तेव्हा अजून ऐकू येतात मला पैंजण आणि घुंगुर वाळा पाककलेला बहर आला अन्नपूर्णेचा वसा वाहिला तिची लगबग, तिची ऐट लटके रुसवे फुगवे कैक सुखदु:खांच्या हिंदोळ्यावर बनली ती सोशिक, कणखर केले साजिरे अनेक सोहळे कोडकौतुके पुरवी डोहाळे मायेचा तो पदर पसरुनी नातवंडाना ती कवेत घेई संध्याछाया जशी पसरत जाई कातरवेळी मन उदास होई नवी पिढी आणि नवे विचार पिकले पान मात्र नाही तयार थकली काया, थकले डोळे आठवणींचे तिज येती उमाळे पण तिला कसे हे कळत नाही? की थकले नाही का आता मीही हाडे झाली माझी खिळखिळी कधी तुटतील हा नेम नाही येऊ देत की माझीही नवी पिढी चल बघू, उभारू आपण गुढी! – उल्का कडले

प्रतिक्रिया द्या
1217 वाचन

💬 प्रतिसाद (2)
अ
अन्या दातार Mon, 03/28/2016 - 13:40 नवीन
छान कविता
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 03/28/2016 - 13:42 नवीन
ही प्रेरणा अत्ता वाचली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा