Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माहेर वारी

त — त्रिपुरा, Tue, 03/29/2016 - 12:50
पोचता पोचता उंबऱ्याशी माहेरच्या, मनाच्या अंगणात पडतो आठवणींचा सडा नव्याने अनुभवताना सवयीची माया नकळत जातात भिजून, पापण्यांच्या कडा परत परत लागतात शोधावे, 'माझ्या' कपाटात सजलेले अनोळखी खण जुनाट फोटोत डोकावणारे सवंगडी आठवतात नुसतेच बनून 'काही' जण मायेच्या ऊन ऊन घासांत, न शोधताच सापडते अमृताची चव कौतुकानं लावलेल्या वेलीवर जुईच्या, हवं तेव्हा चमकतं, लबाड दवं गप्पांच्या फडात लावतात हजेरी, हव्या - नकोशा नात्यांचे बेमालूम पाश पायाखालच्या रस्त्यात खुणेला मिळतं, चिमुकल्या डोळ्यांनी साठवलेलं हक्काचं आकाश दरवेळी घेणं माहेराचा निरोप, नव्यानं भासतो, नावराईच्या पाठवणीइतकाच कठीण बांधून आसवं, निघायचं हसत, नकळत होऊन स्वतःच स्वतःची पाठराखीण....

प्रतिक्रिया द्या
1107 वाचन

💬 प्रतिसाद (2)
र
रायनची आई Tue, 03/29/2016 - 13:40 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Tue, 03/29/2016 - 14:41 नवीन
घाल घाल पिंगा वार्या माझ्या परसात" ची आठवण आली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा