Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शक्तिपात

ए — एच्टूओ, Wed, 03/30/2016 - 11:27
फार पूर्वी कोणीतरी फेकलेला दगड डोक्याला लागून झालेली जखम दाखवण्यासाठी मी डॉक्टरकडे गेल्यावर अचानकच वाढला माझा मेंदू गाठोड्याएवढा खदाखदा हसला डॉक्टर आणि बाहेर घेऊन गेला मला तोपर्यंत वाढला मेंदू अवाढव्य जोमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये हवा भरलेल्या फुग्यासारखा आभाळभर मेंदूच- लिबलिबित मासाचा सुरकुत्यांसकट तरीही जड वाटेना मला. अचनाक फुटून मेंदू त्यातून वहायला लागले लोंढ्यासारखे सगळे इझम्स,वाद,मंडन,खंडन, तण्डन,तत्व,धर्म,बीर्म,कर्म, वर्म,मर्म,इत्यादि इत्यादि -काळ्याशार रंगाचे जुनाट गटारयुक्त दर्पावासाचे त्या दर्पाने मळमळून मी ओकलो रक्त पण डॉक्टर हसतोय खदाखदा वेड्यासारखा मी चिडून बोलण्याचा प्रयत्न केला, पण बोलता येतय कुठे? अगतिकतेने  ओकत राहिलो रक्त अविरत आणि डॉक्टर पोहत-वाहत राहिला रक्त आणि गटारांच्या संमिश्र द्रवात. मेंदू अजून वाढतोच आहे आता मात्र जाणवतय ओझ डॉक्टर मात्र केव्हाच गेलाय वाहून

प्रतिक्रिया द्या
2258 वाचन

💬 प्रतिसाद (12)
व
विवेक ठाकूर Wed, 03/30/2016 - 11:51 नवीन
.
  • Log in or register to post comments
ए
एच्टूओ Wed, 03/30/2016 - 15:42 नवीन
अगदी अगदी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
स
स्पा Wed, 03/30/2016 - 11:56 नवीन
एकदम फर्मास
  • Log in or register to post comments
ए
एच्टूओ Wed, 03/30/2016 - 15:43 नवीन
त्रास समजून घेतल्याबद्दल खूप खूप आभार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
भ
भाऊंचे भाऊ Wed, 03/30/2016 - 13:32 नवीन
वाटत आहे...! ते समर्थ कुठे दिसत नाहित किंतु ?
  • Log in or register to post comments
ए
एच्टूओ Wed, 03/30/2016 - 15:45 नवीन
संदर्भ समजला नाही. थोडं विस्ताराने समजावू शकाल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ
L
lgodbole Wed, 03/30/2016 - 18:59 नवीन
छान
  • Log in or register to post comments
ए
एच्टूओ गुरुवार, 03/31/2016 - 10:48 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lgodbole
व
वेल्लाभट गुरुवार, 03/31/2016 - 07:09 नवीन
माझ्या आकलनक्षमतेचे संकुचित रस्ते तुडवत अगम्यतेचे भाले घेऊन हे काव्य माझ्या मेंदूच्या झोपडीत घुसलं एखाद्या श्वापदासारखं आणि विचारांच्या प्रचंड गदारोळातून घुरासारखा बाहेर पडला.... प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
ए
एच्टूओ गुरुवार, 03/31/2016 - 10:47 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
म
मम्बाजी सर्वज्ञ गुरुवार, 03/31/2016 - 11:06 नवीन
भेजा फ्राय!
  • Log in or register to post comments
ए
एच्टूओ गुरुवार, 03/31/2016 - 14:29 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मम्बाजी सर्वज्ञ
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा