Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इवल्या त्या डोळ्यांमध्ये

अ — अभिषेक पांचाळ, Wed, 03/30/2016 - 15:54
इवल्या इवल्या डोळ्यांना , आस किती मोठी आहे निडर होऊन लढते वेडे , काळ त्याच्या पाठी आहे वादळाची फिकीर मनी , थोडीसुद्धा उरली नाही स्वप्न अधुरे राही , अशी रात कधी सरली नाही जिद्द तरी येते कशी , विचार करी दाही दिशा शंका करती फितूर सारे , केली याने दारू नशा पहाडही ते धस्की घेऊन , जागेवरती टिकून राहते अंगावरती बागडताना , लाटही त्याला दुरून पहाते दिली जरी हि कठोर शिक्षा , जमीन कशी याचा पायाखाली त्रास देऊन तऱ्हेतऱ्हेचा , नियातीही मग बेजार झाली उरले सुरले बळ लावूनि , सारे येती अंगावरती प्रहार करता पूर्ण शक्तीने , नाईलाजाने मागे फिरती गूढ जणू ते लपून बसले , हरेकाच्या कोड्यांमध्ये आसमंतही शांत निजले , इवल्याश्या त्या डोळ्यांमध्ये - अभिषेक पांचाळ

प्रतिक्रिया द्या
1231 वाचन

💬 प्रतिसाद (4)
श
शिव कन्या Wed, 03/30/2016 - 16:59 नवीन
अवध्य मी! दमदार कविता.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 04/05/2016 - 17:36 नवीन
खूप सकारात्मक! छान लिहिताय!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 04/05/2016 - 18:10 नवीन
ही पण भारीच! :)
  • Log in or register to post comments
अ
अभिषेक पांचाळ Wed, 04/06/2016 - 15:34 नवीन
Thanx all
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा