Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इंडीयाचे नाव बदलावे का

क
कपिलमुनी
गुरुवार, 03/31/2016 - 13:30
🗣 99 प्रतिसाद
आपल्या देशाचे सध्याचे नाव रिपब्लीक ऑफ इंडिया आहे. स्वातंत्रांनंतर हे नाव घेण्यात आले. सर्वसाधारणपणे आपला देश ' इंडिया' म्हणून ओळखला जातो. ब्रिटीशांनी ठेवलेले इंडिया नाव बदलावे का ? काहीजण हिंदुस्थान नाव वापरतात पण सर्वसमावेशक भारत हेच योग्य वाटते . श्रीलंकेने सिलोन हे नाव बदलले , बॉंबे, मद्रास , कलकत्ता यांची नावे बदलली तसे इंडियाचा भारत करावे का ?

प्रतिक्रिया द्या
21950 वाचन

💬 प्रतिसाद (99)
ए
एस गुरुवार, 03/31/2016 - 13:31 नवीन
नो! नॉट अगेन...
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 03/31/2016 - 13:40 नवीन
का ब्र ? देशभक्त सरकारकडून एवढी अपेक्षा करणे चूक आहे का ? इंडिया हे ब्रिटीश गुलामगिरीचे प्रतीक असलेले नाव बदलायला हवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ट
टवाळ कार्टा Fri, 04/01/2016 - 18:51 नवीन
देशभक्त सरकारकडून एवढी अपेक्षा करणे चूक आहे का ?
म्हणजे आधीची सरकारे देशभक्त नव्हती????
इंडिया हे ब्रिटीश गुलामगिरीचे प्रतीक असलेले नाव बदलायला हवे
हे काम ६० वर्षांपूर्वीच व्हायला हवे होते *काड्या कमी पडल्या तर कळव...परत येतो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
S
sagarpdy गुरुवार, 03/31/2016 - 13:39 नवीन
जय हिंद! हिंदुस्थान जिंदाबाद!
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 03/31/2016 - 13:41 नवीन
हरकत नाही. पण नवीन (म्हणजे बदली) पासपोर्ट सरकारी खर्चाने आणि खेटे न घालता मिळावा ही अपेक्षा :)
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 03/31/2016 - 13:44 नवीन
भारतच नाव हवे
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 04/01/2016 - 05:11 नवीन
+ वण टू पां डुब्बा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ग
गरिब चिमणा गुरुवार, 03/31/2016 - 13:45 नवीन
इंडीया हे नाव बदलावे,त्याच बरोबर पोर्तुगीजांनी आणलेली मिरची खाणे सोडून द्यावे,त्याऐवजी काळीमीरी वापरावी.मिरची खाणे पोर्तुगिजांच्या गुलामगिरीचे प्रतिक आहे.
  • Log in or register to post comments
S
sagarpdy गुरुवार, 03/31/2016 - 13:54 नवीन
मं ते गोवेकरांनी सोडावं, बाकीच्यांनी कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा
अ
अत्रे गुरुवार, 03/31/2016 - 14:07 नवीन
हा प्रश्न कोर्टाने नुकताच सोडवलेला आहे।
The Supreme Court today dismissed a plea demanding changing the name of 'India' to 'Bharat' as it took strong exception to the petitioner asking him whether he thinks it has nothing else to do and reminded him that Public Interest Litigations (PILs) are meant for "poor".
http://m.ndtv.com/india-news/supreme-court-dismisses-plea-seeking-changing-name-from-india-to-bharat-1286224
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 03/31/2016 - 14:29 नवीन
कोणी व्यक्तीं नाही पण संसद हा निर्णय घेऊ शकते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अमृता_जोशी गुरुवार, 03/31/2016 - 14:08 नवीन
पण नेमके कशासाठी? फक्त नावच का बदलायचे?
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 03/31/2016 - 14:09 नवीन
का बदलावे ? का बदलु नये ? काय हरकत आहे बदलायला ? माणसे, सनस्था, कंपन्या, रस्ते, शहरे, देश नावे बदलतात, काय प्रॉब्लेम येतो? थोड्याच दिवसानी लोक नविन नावानी ओळखतात. नावात बदल ही एक मोठी इतिहास खुण होवुन जाईल इंडियाच्या वाटचालीत. बदलाच एकदा नाव, हौ द्या राडा, हौ द्या खर्च ! आपला देश महासत्ता होण्या पुर्वी (इस 2020 ) बदलाच. म्हंजे महासत्ता झाल्यावर नाव बिव बदलायच्या किरकोळ अक्टिव्हिटी मध्ये वेळ घालवत बसायला नको.
  • Log in or register to post comments
न
नाव आडनाव गुरुवार, 03/31/2016 - 14:13 नवीन
आपला देश महासत्ता होण्या पुर्वी (इस 2020 ) हे कधी ठरलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा गुरुवार, 03/31/2016 - 14:33 नवीन
बास्स का राव? येवड्यात विसरलात ? मा. अब्दुल कलाम भारतीय जनतेला एक भाबडे स्वप्न देवुन गेले "भारत 2020 साली/पर्यंत महासत्ता होणार. त्यांचे हे वाक्य पकडुन, तेच ढोल बडवुन सत्तास्थानी आले! ) मग आता कलामांचं स्वप्न नको पुर्ण करायला ? आता, आमी बी घोषणा देतोय इंडियाचा भारत करा, भारताला महासत्ता करा"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
उ
उगा काहितरीच गुरुवार, 03/31/2016 - 14:12 नवीन
ते "Independent Nation Declared In August" वगैरे तर वाचून हा धागा नाही काढला ना ? ;-) तसं असेल तर आपला पास... तसं नसेल तर काय ठेवायचं नाव ? भारत ? हिंदुस्थान ? हिंदुस्तान ? भारतवर्ष ? आर्यावर्त ? रच्याकने बाकी मुघलांच्या काळात काय म्हणत होते ?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 03/31/2016 - 14:26 नवीन
धागा काढला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 03/31/2016 - 14:39 नवीन
आपल्या देशाचे सध्याचे नाव रिपब्लीक ऑफ इंडिया आहे. स्वातंत्रांनंतर हे नाव घेण्यात आले. सर्वसाधारणपणे आपला देश ' इंडिया' म्हणून ओळखला जातो.
भारताच्या राज्यघटनेतील पहिलेच कलम-- १(१) पुढीलप्रमाणे आहे : "India, that is Bharat, shall be a Union of States." म्हणजेच राज्यघटनेप्रमाणे देशाचे नाव भारत असेही आहेच. त्यामुळे मुद्दामून भारत असे नाव ठेवायची गरज नाही. लोक काय नाव वापरतात हा सवयीचा भाग झाला त्याविषयी फार काही करता येणार नाही-- संसदेला तर अगदीच काही नाही. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
प
पर्ण गुरुवार, 03/31/2016 - 14:39 नवीन
हिंदूंचे राज्य :D
  • Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी गुरुवार, 03/31/2016 - 14:40 नवीन
भारत हे नाव असावे. इंडिया असेल, हिंदूस्थान असेल किंवा आर्यावर्त असेल ही सगळी परकीयांची देण आहे.
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 03/31/2016 - 14:45 नवीन
परदेशी / परकीय पक्षाध्यक्ष आणि उपाध्यक्ष चालतात तर इंडिया हे परकीयांचे देणे का चालत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
ख
खालीमुंडी पाताळधुंडी गुरुवार, 03/31/2016 - 14:51 नवीन
पक्ष्याध्यक्ष परकिय हे एकवेळ ठीक, पण उपाध्यक्ष परकिय हा जावाईशोध कुठून लावलात??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 03/31/2016 - 15:10 नवीन
काडी टाकायला काहीही चालते हो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 03/31/2016 - 19:59 नवीन
एका परकीय कंपनीत डायरेक्टर होताना त्यांनीच तसं अर्जात लिहून दिलंय अशी चर्चा टिव्हीवर झाली होती ! ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
ख
खालीमुंडी पाताळधुंडी गुरुवार, 03/31/2016 - 20:12 नवीन
ते होय, पोर अजून मॅच्युअर नाही ना!!फक्त 46 वर्षाचं आहे:'( बाकि निवडणूकीच्या उमेदवारी अर्जामध्ये भल्याभल्यांनी(?) फेरफार केलेत:-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मोदक Fri, 04/01/2016 - 04:36 नवीन
भल्याभल्यांनी फेरफार केले म्हणून युवारत्नाने केलेले फेरफार चालवून घ्यावेत असे काही आहे का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Fri, 04/01/2016 - 05:25 नवीन
तसे काही नाही,पण सिलेक्टिव फेरफार दिसू नयेत हीच कामना! : : : (ना भक्त ना द्वेष्टा-खामुपाधुं)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 04/01/2016 - 14:53 नवीन
प्रश्न सिलेक्टीव्ह होता ना ? की जगातल्या सर्वच उपाध्यक्षांची जंत्री मागितली होती ??? =)) =)) =)) *** अरे देवा (नास्तिक किंवा अज्ञेयवादी असल्यास, फक्त... अरेरे), काय दिवस आलेत. सरळ प्रश्नाला सरळ उत्तर दिले तर लोकांना त्यातही तिरकेपणा दिसू लागतो ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
म
मोहनराव गुरुवार, 03/31/2016 - 14:43 नवीन
नाव बदलल्याने काय होणार आहे? काही पुरक कारणे तर द्या.
  • Log in or register to post comments
ए
एच्टूओ गुरुवार, 03/31/2016 - 14:46 नवीन
१.काय फरक पडणारे ? भारतीयांच्या राहणीमान, विचार आणि civic sense मध्ये त्यामुळे सुधारणा होईल का ? तसेच सध्या लोकांना देशाबद्दल (कायदेपालन करण्यासाठी)वाटणारे प्रेम जास्त किंवा कमी होईल ? २. बदलानंतर असंख्य सरकारी/निमसरकारी पाट्या, कागदपत्रे, सरकारी स्टेशनरी, कायदे अशा अनेक गोष्टींमध्ये सुधारणा करावी लागेल. त्यासाठी होणारा अधिक खर्च सरकारी तिजोरीतून द्यावा का?
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 03/31/2016 - 18:28 नवीन
1. काय फरक पडणार आहे हा संबंध इथे कशाकरता जोडायचा ? सुधारणा होण्यासाठी करण्यासाठी देशाचे नाव बदलायची वाटpपहायची ? भुमीपुत्र म्हणुन आपल्या भुमीचे नाव धारण करण्यात देशप्रेम वाढणे इ. अवांतर बाबी आहेत. राहणीमान, शिस्त हे एरवीही हवे 2, हो. नाही तर कोण मल्या अथवा सहारा कंपनी देणार का? सरकारी तिजोrरीतून म्हंजे आपल्या सारख्या नागरिकांच्याच खिशातून जाईल. सुधारणा टप्प्या टप्प्याने दिर्घ कालावधीय होइल. उदा. इंडियाच्या जागी भारत म्हणायला सुरुवात केली उद्यापासून 01 अप्रिल 2016 तर 2022 परयंत प्रक्रिया पुर्ण होइल. काही आधीच्या मॉडेल्सचा ( उदा..ब्रह्मदेश चे म्यानमार) aअभ्यास करुन कमीत कमी खर्चात करणे अशक्य जाऊ नये. साधारण पणे 2062 पर्यंत इंडिया हे नाव पुर्णपणे पुसट झाले असेल. त्यावेळी मी "भारत विहंग" या कंपनीच्या विमानाने प्रवासkकरत असेन! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एच्टूओ
प
प्रदीप साळुंखे गुरुवार, 03/31/2016 - 14:48 नवीन
व्वा काय स्ट्राईक रेट आहे!! तासाभरात 22 प्रतिसाद तेही 52 शब्दांच्या धाग्यावर!! त्या विषयात ताकदच तेवढी अचाट आहे=((
  • Log in or register to post comments
प
प्रियाभि.. Wed, 02/14/2018 - 10:49 नवीन
काही नाही हो.. पंचवीस लोकांना काही काम नाही काड्या करण्याशिवाय..पाहिले हे धागा बनविणारे, २२ प्रतिसाद देणारे, आणि तुम्ही एक..आणि हो २५ वा मी बरं का..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
भ
भीमराव गुरुवार, 03/31/2016 - 14:52 नवीन
चक दे इंडीया, कमॉन इंडीया, यारो इंडीया बुला लीया आसल्या स्वांगांच पन पुनर्लेखन/गायन करावं लागल मंग त्याची बी कॉष्ट पडल की
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/31/2016 - 15:18 नवीन
"मनुवर्त" हे नाव ठेवावे. तसाही आपला देश मनुस्मृतीनेच चालतो. म्हणून तर सारखे मनुस्मृती दहनाचे कार्यक्रम सुरू असतात.
  • Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी गुरुवार, 03/31/2016 - 15:27 नवीन
मग जाळू देत ना!! तुमको कुछ प्राॅब्लेम??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
र
रमेश आठवले गुरुवार, 03/31/2016 - 15:49 नवीन
पाकिस्तानच्या मते इंडिया चे नाव भारतच असावे असे आहे . त्यांच्या मते एक इंडिया देशाचे फाळणी नंतर दोन तुकडे झाले आणि त्या नंतर इंडिया नावाचा देश अस्तित्वातच राहिला नाही. म्हणून भारताने इंडिया नावाचा वापर करणे चूक आहे. फक्त भारत नाव असावे याचा आग्रह करताना याचा विचार असावा.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 04/01/2016 - 05:28 नवीन
पाकीस्तान काहीही म्हणाले तरीही त्यांच्या म्हणण्यात लॉजीक नाही, भारत म्हटले तरीही पाकीस्तान प्राचीन भारताचा भाग होता हा इतिहास आणि पुन्हाही असेल हे भविष्य ते बदलू शकणार नाहीत. त्यामुळे पाकीस्तानी राज्यांनी भारतीय राज्यघटनेचा स्विकार करुन आपापली मते अवश्य मांडावीत. राहता भाग ब्रितीशांच्या परक्या सत्तेच्या बळावर का होईना भारतास जेवढा भौगोलीक एकसंघत्वाचा वारसा स्वातंत्र्योत्तर आला त्याची जोपासना होण्याच्या दृष्टीने भारत अथवा इंडीया हे शब्द असोत किंवा त्यासोबत येणार्‍या वारसा हा एकात्म इंडीया/भारताचा वारसा आहे इंडीया नावावर कोटीकरुन अखंड देशाचा वारसा पुसता येत नसतो. भारत अथवा इंडीयाच्या वारश्यात शेअर हवा असेल तर त्यासाठी भारतीय राज्यघटना आपलीशी करावी लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
र
रमेश आठवले Fri, 04/01/2016 - 16:45 नवीन
पाकिस्तान च्या निर्मिती नंतर काही वर्षांनी तेथील सरकारने या नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले आहे . Five thousand years of Pakistan : an archaeological outline - by R.E.M. Wheeler.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ग
गॅरी ट्रुमन Fri, 04/01/2016 - 17:46 नवीन
Five thousand years of Pakistan : an archaeological outline - by R.E.M. Wheeler.
बापरे-- पाकिस्तानची ५ हजार वर्षे? मला तर स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचा पाकिस्तानात १५० वर्षे हा बोर्ड बघूनच आश्चर्य वाटले होते :) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
ट
टवाळ कार्टा Fri, 04/01/2016 - 18:51 नवीन
तुम्ही कधी तिकडे गेलेलात???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 04/01/2016 - 18:58 नवीन
पाकिस्तानी पाठ्यपुस्तकाप्रमाणे Previously India was part of Pakistan. आता बोला !!! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
श
श्रीगुरुजी Sat, 04/02/2016 - 11:36 नवीन
पाकिस्तानी पाठ्यपुस्तकाचा दावा खांग्रेजींना अगदी पटलेला आहे. म्हणून तर मण्या अय्यर, खुर्शीद इ. खांग्रेजी भारताचा थोरला भाऊ असलेल्या पाकिस्तानमध्ये जाऊन "मोदींना घालवा" असे तेथील राज्यकर्त्यांना साकडे घालून आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
न
नाना स्कॉच Sun, 04/03/2016 - 06:27 नवीन
कसले देशद्रोही आहेत लेकाचे! मणिशंकर तर जास्तच खुर्शीद तिप्पट "अखंड पाकिस्तानात" भारत जोडायला कोणाला भेटावे हे ही त्यांना कळत नाही देशद्रोही कुठले ते फ़क्त वेद प्रताप वैदिक ह्यांच्यासारख्या राष्ट्रभक्तांस कळते अन ते थेट हफ़ीज़ सईद ला भेटतात! काय ते देशप्रेम! वाह!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 04/03/2016 - 12:13 नवीन
वेद प्रताप वैदिक या पत्रकाराने हफिझ सईदच्या घेतलेल्या मुलाखतीची व मण्या आणि खुर्शीद पाकिस्तानात जाऊन जे बरळले त्याची तुलना कशी होऊ शकते? पत्रकार कोठेही जाऊन कोणाचीही मुलाखत घेऊ शकतो. श्रीलंकेतील प्रभाकरनच्या सुद्द्धा अनेक पत्रकारांनी मुलाखती घेतलेल्या आहेत. वैदिक तिथे जाऊन मोदींना हटवा असे सईदला म्हणाले होते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Mon, 04/04/2016 - 11:31 नवीन
पत्रकार कोठेही जाऊन कोणाचीही मुलाखत घेऊ शकतो. हे तुमचे विधान आहे अन हे बरोबर आहे न??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 04/04/2016 - 11:37 नवीन
यात काही चूक आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Mon, 04/04/2016 - 12:14 नवीन
माझ्यालेखी नाही, पण ही व्यावसायिक स्थितप्रज्ञता दाखवताना सुद्धा काही लोक सेलेक्टिव होतात! उदा बघा , बरखा दत्त नवाज़ शरीफ ह्यांचा इंटरव्यू घ्यायला गेली होती, तिथे नवाज़ ह्यांच्या दोन्ही कन्या हजर होत्या, साहजिक इंटरव्यू नंतर एक फ़ोटो झाला , तर त्या फ़ोटोची यथेच्छ खिल्ली उडवली गेली होती "Nawaz Sharif with his THREE daughters" म्हणुन (बहुतेक ट्विटर वर जास्त) आता बघा 1 बरखा पत्रकार आहे, बरोबर? 2 तिने शरीफ ह्यांचा इंटरव्यू घेताना मोदी हटाव वगैरे काही म्हणले नाही 3 पत्रकार मुलाखतीघ्यायला जाणारच , बरोबर? मग त्या उडवलेल्या खिल्लीचा आपण निषेध कराल की सबबी देऊन त्याला रास्त ठरवाल इतके सांगा! हा तो फ़ोटो Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कपिलमुनी Mon, 04/04/2016 - 12:46 नवीन
धाग्याशी संबंधित मुद्द्यांवर लिहावे ही विनंती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
श
श्रीगुरुजी Mon, 04/04/2016 - 14:49 नवीन
बरखा ही पत्रकार म्हणून अत्यंत पक्षपाती आहे. तरीसुद्धा पत्रकार या नात्याने मुलाखत घेणे हा तिचा हक्क आहे. त्यामुळे मी या खिल्लीचा निषेध करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा