सारातोव्ह,रशियातील बाप्पा मोरया!!!!!!!
Primary tabs
एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि | तन्नो दन्ति: प्रचोदयात् |
आमच्या होस्टेलमध्ये नेहमीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव साजरा झाला. हे आमच्या सारातोव्ह मेडीकल युनिव्हर्सिटीच्या होस्टेलमधील गणेशोत्सवाचे ५ वे वर्ष होते.पहिल्या वर्षी जेमतेम ५-६ जणांनी मिळुन गणेशोत्सव साजरा केला होता पण आता आमच्या गणेशोत्सवाचे रुपांतर एका मोठ्या उत्सवात झाले आहे व आमचे एक छोटेसे गणपती मंडळच स्थापन झाले आहे.मागच्या वर्षीचा गणपती बराच मोठा करण्यात आम्हाला यश आले होते.यावर्षी त्याहुन पुढे जाण्याचा निश्चय होता.त्यासाठी भारतातच सजावट तसेच प्रसाद याचा एक आराखडा बनवण्यात आला व भारतातुन येताना आवश्यक असलेले सामान आणले.त्याचबरोबर गणेशोत्सवासाठीच्या निमंत्रणपत्रिकाही छापुन आणल्या.येथे सजावटीचे सामान घेणे शक्य नव्हते कारण येथे भारतीय वस्तुंची दुकाने नाहीत व येथील सजावटीचे सामान म्हणजे वाढदिवसाच्या सजावटीसारखे दिसते.
फोटो येथे पहा- http://picasaweb.google.ru/chinya1985/Ganeshotsav200802#
यावर्षी राजवाड्यासारखी सजावट करायचे ठरवले होते. त्यासाठी भारतातुन थर्माकॉलचे मोठे सिंहासन आणले.त्यानंतर येथील दुकानांमधे सीलींगची सजावट करण्यासाठी असणारे थर्माकॉलचे साहीत्य आणुन ते एकमेकांना जोडुन ,रंगरंगोटी करुन त्याचे खांब बनवण्यात आले.त्याचबरोबर ६ गणपतीची चित्रे काढण्यात आली व त्या चित्रांच्या बाजुने मखर बनवण्यात आले.त्याचबरोबर लायटिंग व सीलिंगची सजावट करण्यात आली. होस्टेलमधील सर्व कॉरीडॉरना पताका लावण्यात आल्या. हे सर्व करण्यासाठी जेमतेम १ दिवस व २ रात्री मिळाल्या. त्यात सर्व कार्यकर्त्यांनी जिव तोडुन काम केले. २ तारखेला सर्वांना पत्रिका देण्यात आल्या व नोटिस बोर्डवर सर्वांना निमंत्रण व सहभागासाठी विनंती करण्यात आली. ३ तारखेला दुपारी पुजा सुरु झाली. एकीकडे पुजा सुरु झाली होती पण सजावटही पुर्ण झाली नव्हती.त्यामुळे तेही काम एकीकडे चालु होते.त्याचबरोबर प्रसादही बनवण्याचे काम सुरु होते. पहील्या दिवशी मोदक ,शिरा,पंचामृत्,फळे हा प्रसाद होता.जवळपास २०० मोदक बनवण्यात आले होते.साधारण संध्याकाळी ६ पर्यंत सर्व काम झाले.एकीकडे पुजा चालुच होती. साधारण ७ च्या दरम्यान आरती झाली.आरतीला जवळपास ७० मुले होती.'गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोषाने पुर्ण होस्टेल दुमदुमुन गेले.
दुसर्या दिवशीपासुन संध्याकाळच्या आरतीची सुरुवात शंखनादाने होत असे.शंखाचा आवाज ऐकल्यावर सर्व मुले आरतीला येत.मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही आमच्याकडे दररोज आरती,गणपती अथर्वशीर्षाचे पठन्,प्रसाद ,सांस्कृतिक कार्यक्रम होत.पण त्याचबरोबर यावर्षी अजुन २ गोष्टी आम्ही करु लागलो. पहीली म्हणजे गणेशाच्या नावाचा जप सकाळच्या आरतीनंतर होत असे व त्याचबरोबर संध्याकाळी विविध परंपरांमागचे म्हणजे नमस्कार का करतात्,घंटा का वाजवतात्,प्रदक्षिणा का घालतात इत्यादींमागची भावना,महत्व याची माहीती दररोज सांगण्यात येत असे. ४ तारखेला म्हणजे दुसर्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमामधे गणेशोत्सव सुरु करणार्या लोअमान्य टिळकांबद्दल एक छोटेसे भाषण झाले.त्यात टिळकांच्या चरीत्राचा आढावा,गणेशोत्सव्,शिवजयंती सुरु करण्यामागचा उद्देश सांगण्यात आला. त्याचबरोबर त्या दिवशी 'देहाची तिजोरी' हे गाणे सादर केले.प्रसादासाठी या दिवशी बेसनाचे लाडु होते.५ तारखेला आमच्या सर्वांचा आवडता कार्यक्रम म्हणजे इस्कॉनच्या भक्तांच्या किर्तनाचा कार्यक्रम होता.मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी या कार्यक्रमाला प्रचंड दाद मिळाली.या दिवशी प्रसाद म्हणुन फ्रुट सॅलड बनवले होते.६ तारखेला प्रश्नमंजुषा झाली.यात मुख्यत्वे धर्माशी संबंधित प्रश्न होते.या दिवशी प्रसाद म्हणुन केळीचे शिक्रण होते.
७ तारखेला रविवार असल्याने सकाळच्या पुजेलाही बर्यापैकी गर्दी होती.या दिवशी सकाळी गणपती स्तोत्राची २१ आवर्तने झाली.या संध्याकाळी ट्रेडिशनल डे होता.त्याचबरोबर गणपतीच्या काही कथा सांगण्यात आल्या व 'मल्हार वारी' हे गाणे एका विद्यार्थ्याने अतिशय सुंदररीत्या गायले.या दिवशी गाजराचा हलवा हा प्रसाद करण्यात आला होता.८ तारखेला 'Ganesha Outside Hinduism' या विषयावरील माहीतीपुर्ण भाषण झाले.त्याचबरोबर 'उदे ग अंबे उदे' वर नृत्य व 'सनईचा सुर' या गीताचे समुहगायन झाले.या दिवशी प्रसाद म्हणुन गुलाबजाम बनवले होते.९ तारखेला 'महाराष्ट्राची संत परंपरा' याविषयावर भाषण्,एक नृत्य व एक गाणे हा सांस्कृतिक कार्यक्रम होता. या दिवशी शेवयाची खिर हा प्रसाद बनवला होता.१० तारखेला फॅन्सी ड्रेसचा कार्यक्रम होता.या कार्यक्रमाला अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला. जवळपास २० जणांनी वेगवेगळी वेषभुषा केली होती.यात विविध देविदेवता,ऐतिहासिक व्यक्ती यांचा समावेष होता.याचबरोबर आमच्या होस्टच्या होस्टिंगने या कार्यक्रमाला वेगळीच मजा आणली.या दिवशी भोपळ्याचा हलवा हा प्रसाद होता.११ तारखेला ध्यानधारणा व एका विद्यार्थ्याने स्वतः गणपतीवर लिहिलेला पोवाडा हे सांस्कृतिक कार्यक्रम होते.या दिवशी लस्सी व फळांचा प्रसाद दाखवण्यात आला.
१२ तारखेचा कार्यक्रम अविस्मरणीय होता.आपल्या मराठी भाषेत म्हणतात की 'साधु संत येता घरा तोचि दिवाळी दसरा'.त्याप्रमाणे यादिवशी आमच्या कार्यक्रमाला भक्तिब्रिंग गोविंद स्वामी महाराज आले होते.याच दिवशी आमच्या शहरात जगन्नाथाची रथयात्रा होती . अशा प्रकारे दुग्धशर्करा योग जुळुन आला होता. आम्ही विद्यार्थ्यांची रथयात्रेलाही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्यानंतर संध्याकाळी स्वामीजींनी किर्तन केले व सर्वांना भारतिय संस्कृतीचे महत्व पटवुन सांगितले. हा कार्यक्रम खुपच छान झाला.या दिवशी तांदळाच्या खिरीचा प्रसाद दाखवण्यात आला.१३ तारखेला 'सेंटर ऑफ श्री चिन्मोय' च्या लोकांनी येउन बंगाली भाषेतील काही भजने सादर केली.त्याचबरोबर एका विद्यार्थ्याने 'गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धिमही' हे गाणे सादर केले व याच दिवशी २ नृत्याचे कार्यक्रमही झाले.त्याचबरोबर 'रांजणगावाला महागणापती' हे समुहगानही झाले.या दिवशी नारळाचे लाडु व लस्सी बनवली होती.त्याचबरोबर गणेशोत्सवात चित्रकला स्पर्धाही ठेवण्यात आली होती. जवळपास १० गणपतीची अतिशय सुंदर चित्रे स्पर्धेसाठी आली होती.त्यावर प्रेक्षकांनी मतदान केले व विजेता निवडुन दिला.विजेत्याला व इतर सहभाग घेणार्यांना पारितोषिक वितरण याच दिवशी करण्यात आले.
१४ तारखेला विसर्जनाचे काम खुपच मोठे होते. जवळपास ४०० मोदक बनवायचे होते व ३० लिटर मसाला दुध बनवायचे होते.दर वर्षी विसर्जनाच्या दिवशी संपुर्ण होस्टेलला आम्ही प्रसाद देतो.त्याचबरोबर जे जे विद्यार्थी आरतीला येत त्या सर्वांसाठी म्हणजे जवळजवळ १०० विद्यार्थ्यांसाठी विसर्जनानंतर स्नेहभोजन ठेवले होते. हे सर्व बनवण्याचे मोठे काम कार्यकर्त्यांवर होते. अगदी सकाळपासुन सर्वजण कामाला लागले होते ते काम संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालले.एकीकडे स्वयंपाकाचे काम चालु असताना दुसरीकडे पुजा व अथर्वशीर्षाची ५४ आवर्तने झाली.संध्याकाळी ७ वाजता आरती झाली.त्यानंतर वाजतगाजत आणि 'पुढच्या वर्षी लवकर या' च्या घोषणांसकट गणपती व्होल्गा नदिवर विसर्जनासाठी नेण्यात आले.जवळपास ६० जण विसर्जनासाठी आले होते.विसर्जनानंतर पुर्ण होस्टेलला मोदक व मसाला दुध हा प्रसाद देण्यात आला व पुजेला येणार्यांचे स्नेहभोजन झाले.
विसर्जनानंतरचे १-२ दिवस सर्वच कार्यकर्त्यांसाठी फारच खराब जातात.दहा दिवस पुर्ण जीव तोडुन काम केलेले असते,स्वतःच्या हातानी आणि मोठ्या कष्टानी जी सजावट केलेली असते ती काढावी लागते.अभ्यास्,क्लासेस्,लेक्चर्स सांभाळुन हे सगळे उभे करणे व दहा दिवस चालवणे ही खुप मोठी गोष्ट आहे असे मला वाटते.इतर वेळी सर्वजण स्वतःच्या आयुष्यामध्ये गुंतलेले असतात ते सर्व विनातक्रार एकत्र येतात व एकत्र येउन काम करतात .ही गोष्ट आपण गरज पडल्यास आपापसातली भांडण विसरुन एकत्र येउ शकतो व काहीतरी विधायक कार्य करुन दाखवु शकतो हा विश्वास निर्माण करते.आता परत सर्वांची दिनचर्या पुर्वव्रत होउ लागली आहे,पण कुठेतरी काहीतरी खटकतय्,काहीतरी नाहीये,काहीतरी हरवलय याची भावना मनात आहे.गणपतीच्या इतर दिवशी उत्साहानी नाचणारी मंडळी विसर्जनाला नाचु शकली नाहीत.माझे तर हे येथील गणेशोत्सवाचे शेवटचे वर्ष होते.वर्षातील सर्वात अविस्मरणिय असे क्षण गणेशोत्सवात येतात्.पण आता हे परत होणार नाही.पुढच्या गणेशोत्सवात कुठे असेल माहीत नाही पण इथे होतो तसा गणेशोत्सव तिथे होईल का नाही शंकाच आहे. रुसवे -फुगवे असले तरी होस्टेलमधले विद्यार्थी म्हणजे एक मोठे कुटुंबच असते. असे इतके मोठे कुटुंब पुढे कधी लाभणार आहे??माझ्या आयुष्यातले सर्वात अविस्मरणिय क्षण दिल्याबद्दल या कुटुंबाचे आणि गणराया तुझे लाख लाख धन्यवाद!!!!!!!
चिन्मय कुलकर्णी
छान उपक्रम रे चिन्या, छान लिहिलेस.
धन्यवाद यशोधरा!!!!!!
बघा- http://gandharvablog.blogspot.com/
रशियातील गणेशोत्सव नवीनच आहे!
बाकी बरेच भारतीय तेथे दिसताहेत... मला आधी छायाचित्रे मुंबईतीलच वाटली! सारे विद्यार्थी आहेत? हे नक्की रशियातील कुठल्या भागात आहे? इतके "हिंदू" सण (जगन्नाथाची रथयात्रा वगैरे!) तेथील लोकं कुठल्या नजरेने पहातात? वगैरे माहीती वाचायल आवडेल.
विकास्,प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.इथे जेमतेम १००च्या आसपास भारतीय आहेत व सर्वजण विद्यार्थी आहेत्. हे रशियाच्या मध्यभागात आहे.जगन्नाथाची रथयात्रा इस्कॉनने आयोजित केली होती त्यात भारतीयांचा फक्त सहभाग होता.येथील लोक याच्याकडे चांगल्या दृष्टीने पहातात मात्र चर्चेस खुप विरोध करतात.
बघा- http://gandharvablog.blogspot.com/
हे सगळं करतोयस याबद्दल तुझं कौतुक !
पार्टनर
धन्यवाद पार्टनर!!!!!!
बघा- http://gandharvablog.blogspot.com/
रशियातला गणेशोत्सव आवडला.
सारे विद्यार्थी आहेत? हे नक्की रशियातील कुठल्या भागात आहे? हे विकाससारखेच प्रश्न मलाही पडले. याबद्दल सविस्तर वाचायला आवडेल.
गणपती,जगन्नाथाची रथयात्रा इ. हिंदू सण तुम्ही लोकं मोठ्या उत्साहात साजरे करता त्याचे कौतुक आणि अभिनंदन!
स्वाती
धन्यवाद स्वातीदिनेश्!!!!!!उत्तरे वर दिली आहेत. चर्चेस सोडली तर इतर जनतेचा प्रतिसाद चांगला असतो
बघा- http://gandharvablog.blogspot.com/
सुंदर फोटो. मेहेनत भरपूर घेतलेले दिसतेय.
आमच्या गिरणगावातल्या राजाची शाखा उघडणार रशियात बहुतेक तुम्ही.
(कम्युनीस्टांना लालबाग असं सांगीतलं की फार बरं वाटेल.)
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
धन्यवाद रामदास्!!!!!!!होय भरपुर मेहनत घेतली होती आम्ही.कम्युनिस्टांना गणपती कुठुन आवडणार??मग त्याच्या नावात 'लाल' असले तरीही
बघा- http://gandharvablog.blogspot.com/
वृत्तांत आणि छायाचित्रे मस्त आहेत.
आमचे एक खोटेसे गणपती मंडळच स्थापन झाले आहे
मुद्राराक्षसाचा विनोद म्हणावा काय?"
धन्यवाद प्रभाकर!!!!
दुरुस्ती केली आहे.
बघा- http://gandharvablog.blogspot.com/
दूर देशात मुलांनी उत्साहाने व कष्टाने साजरा केलेला श्रींचा उत्सव कौतुकस्पद आहे. अभिनंदन
(सहमत)बेसनलाडू
सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
धन्यवाद सर्वसाक्षी,बेसनलाडू आणि प्राचु!!!!!
बघा- http://gandharvablog.blogspot.com/
समाजाला एकत्र आणण्याच्या ज्या हेतुने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव चालु केला, तो हेतु, तो उद्देश तुमच्यामुळे पुर्ण झाला.
तुमच्या कष्टाला तोड नाही. तुमचे कौतुक करावे तितके थोडे आहे.
शतकोटी आभार आणि शुभेच्छा !!!
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
गणा मास्तरांशी सहमत.
रुसवे -फुगवे असले तरी होस्टेलमधले विद्यार्थी म्हणजे एक मोठे कुटुंबच असते. असे इतके मोठे कुटुंब पुढे कधी लाभणार आहे??
आणि या मतास तर १० मार्क!
(अजूनही "चेशर हंट"ला परत जावंसं वाटणारी) अदिती
धन्यवाद गणा मास्तर आणि आदिती
बघा- http://gandharvablog.blogspot.com/
चिन्याभाऊ वृतांत वाचुन फार आनंद वाटला..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
धन्यवाद मदनबाण!!
बघा- http://gandharvablog.blogspot.com/
चिन्या तुमचा उपक्रम अगदी झकास आहे रे.
रशियामध्ये तुम्ही शिवजयंतीच्या निमित्ताने भगवा फडकवला होताच, आता तर बाप्पा तिकडे आहेत. :)
सगळे फोटो मस्त आले आहेत.
तुमची फॅण्सी ड्रेस स्पर्धा चांगलीच रंगली होती हे फोटो वरुन कळाल रे :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
धन्यवाद, झकास्!!!आम्ही गणपती येथे ५ वर्ष साजरा करत आहोत आणि शिवजयंतीलाही आता ५ वर्ष होतील्.फॅन्सी ड्रेसला खुपच चांगला प्रतिसाद मिळाला होता
बघा- http://gandharvablog.blogspot.com/
रशियातला गणेशोत्सव पाहून आणि वाचून खूप आनंद झाला.
व्होल्गा पवित्र झाली.
विसुनाना,प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद्!!!!!व्होल्गा पवित्र झाली हे मात्र नक्की
बघा- http://gandharvablog.blogspot.com/
वृत्तांत वाचून छान वाटले. अभिनंदन!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
धन्यवाद नंदन!!
बघा- http://gandharvablog.blogspot.com/
मुक्तसंगः अनहंवादि
चिनू पंडित,
इतक्या पद्धतशीरपणे व उत्साहाने साजरा केलात हे वाचून खूपच बरे वाटले.
(गेल्यावर्षी नवरात्र - दुर्गापूजेच्या वेळी मी मास्कोत होतो, त्याची आठवण झाली.)
(अवांतर : माझा एक भारतीय मित्र मास्को त राहतो, त्याचे टोपणनाव चिनू पंडित आहे. म्हणून असे लिहीले आहे ! )
धन्यवाद 'वारकरी रशियात्'!!!!!तुम्ही मॉस्कोत कशाला आला होता???त्या दुर्गापुजेला माझा एक मित्रही उपस्थित होता.
बघा- http://gandharvablog.blogspot.com/
मुक्तसंगः अनहंवादि
(पंढरीचा) वारकरी व्हाया मुंबई मार्गे मॉस्कोत कशाला ?
पोटासाठी जावे यावे लागते बाबा ...... काय ?
बरोबर आहे तुमच
बघा- http://gandharvablog.blogspot.com/
रुसवे -फुगवे असले तरी होस्टेलमधले विद्यार्थी म्हणजे एक मोठे कुटुंबच असते. असे इतके मोठे कुटुंब पुढे कधी लाभणार आहे??माझ्या आयुष्यातले सर्वात अविस्मरणिय क्षण दिल्याबद्दल या कुटुंबाचे आणि गणराया तुझे लाख लाख धन्यवाद!!!!!!!
वा! सुंदर लेख.....
बोला, गणपती बाप्पा मोरया....
लालबागच्या राजाचा विजय असो....!
तात्या.
धन्यवाद तात्या!!!!!
गणपती बाप्पा मोरया!!!!!!!!मंगलमुर्ती मोरया!!!!!
बघा- http://gandharvablog.blogspot.com/