Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

देवाचे स्थान कुठे ।।

म — माहीराज, Sat, 04/02/2016 - 18:52
मान कुठे, सन्मान कुठे, सद्भावाचे भान कुठे, ज्याने निर्मिली सारी सृष्टी त्या देवाचे स्थान कुठे.. पुजा आमची नित्याची, नैवेद्य ही नित्याचेच श्रद्धेपोटी उगाच आमुचे वादविवाद ही नित्याचेच वाटून घेतले देवही आम्ही माणुसकीचे गान कुठे ज्याने निर्मिली सारी सृष्टी त्या देवाचे स्थान कुठे.. जाती धर्माची वर्गवारी करून घेतली आम्ही जागा प्रत्येक मंदिराची वाटून घेतली आम्ही एक नियती सार्‍यांसाठी आम्हा त्याचे भान कुठे ज्याने निर्मिली सारी सृष्टी त्या देवाचे स्थान कुठे..

प्रतिक्रिया द्या
5857 वाचन

💬 प्रतिसाद (12)
च
चांदणे संदीप Sat, 04/02/2016 - 19:07 नवीन
खत्रा! आवडलीच! Sandy
  • Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Sat, 04/02/2016 - 19:21 नवीन
तो एकच आहे न् चराचरामध्ये आहे. निर्गुण,निराकार बाकि कविता छान.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 04/02/2016 - 21:30 नवीन
जिकडे तिकडे शोधीत का रे फिरसी वेडयापरी, वसे तो देव तुझ्या अंतरी
  • Log in or register to post comments
स
स्पा Sun, 04/03/2016 - 15:44 नवीन
गावडे काका देव नाहीच तर तो अंतरी तरी कसा असेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sun, 04/03/2016 - 17:41 नवीन
तसं आपण मानायचं असतं. नाहीतरी देव ही मानण्याचीच गोष्ट आहे की नाही. रच्याकने, मी वर दिलेली ओळ ही प्रल्हाद शिंदेंनी गायलेल्या गाण्यातील आहे. हेच गाणे अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातही आहे. छान वाटते ऐकायला हे गाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
म
माहितगार Sun, 04/03/2016 - 10:30 नवीन
कविता पोचली. अहिराणीचा संबंध उलगडल्यास आवडेल.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sun, 04/03/2016 - 14:11 नवीन
लाखो वर्षे अस्तिक लोकाना न सुटलेले हे हे कोडे आहे. नास्तिकाना ते पडलेलेच नाही. एक नियती सार्‍यांसाठी आम्हा त्याचे भान कुठे ज्याने निर्मिली सारी सृष्टी त्या देवाचे स्थान कुठे.. आमचा निष्कर्ष देव जर असलाच तर त्याचे स्थान नियति इतके मोठे खचितच नाही. देव हा अंडर सेक्रेटरी असून नियति हा मन्त्रि आहे. सबब नास्तिकही नियति शरणतेचा अनुभव घेत असतातच.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 04/03/2016 - 14:13 नवीन
:) उत्तम निरीक्षण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
स
सतिश गावडे Sun, 04/03/2016 - 17:49 नवीन
सबब नास्तिकही नियति शरणतेचा अनुभव घेत असतातच.
नियती हा शब्द नकारात्मक अर्थाने वापरला जातो. काही नकारात्मक घडले तर "नियतीपुढे कोणाचे चालत नाही" असे आपण सहजतेने म्हणतो. मानवी जीवनाची असहायता किंवा हतबलता म्हणजे नियती असे म्हणता येईल. माणूस आस्तिक असो वा नास्तिक त्याला ही परिस्थितीची अपरिहार्यता चुकत नाही. काही वेळा परिस्थिती हाताबाहेर जात असताना जर देवाचा धावा केला तर देव धावून येतो मदतीला असे म्हणतात. अशा भाग्यवंतांचा मला हेवा वाटतो. मात्र देव धावून आला नाही तर देवाला दोष न देता नशिबाला दोष देणारे लोक जास्त पाहण्यात येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
व
विजय पुरोहित Sun, 04/03/2016 - 17:51 नवीन
क्लासच सगाण्णा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
च
चौकटराजा Sun, 04/03/2016 - 18:18 नवीन
नियति हा केवळ नकारात्मक वापरला जाणारा शब्द नाही. एकच उदाहरण देतो. जोशी अभ्यकर हत्याकांडात आरोप्पी पोलीस॑ स्टेशनला जाउन सारखे अमुक चा काही शोध लागला का अशी चौकशी करीत. असेच ते बाहेर पडत असताना एका तिर्हाइताने त्याना पाहिले व त्याना काही दिवसापूरवी पोलिस स्टशनच्या भागात पाहिल्याचे पोलिसाना सांगेतले. त्यावरून पोलिसानी धागा पकडून एका गहन प्रकरणाचा छाडा लावला. त्या अरोपीना चौकशीची बुद्धी व त्या तिर्हाहिताने त्याचे वेळी तिथे येणे व त्यातून जोशी अभ्यन्कर गोखले हेगडे कुटूंम्बियाना न्याय मिळणे ही नियतीने घडवलेली कटू नव्हे तर गोड योजना आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
म
माहीराज गुरुवार, 02/02/2017 - 08:52 नवीन
एक नियती सार्यांसाठी ..... . ...त्या देवाचे स्थान कुठे।। या ओळींसाठी माझा एकच सरळ अर्थ होता , तो म्हणजे आपण जे भाषिक, प्रांतीय आणि धार्मिक गठ पाडून आपापसात भांडतो पण सार्यांचा जन्म आणि मृत्युची परिसीमा एकच आहे, सार्यांवर अंकुश ठेवणारी नियती ही एकच आहे .... आणि अध्यात्मिक दृष्टा पाहीलंतर प्रत्येकाच्या देवाने या पृथ्वीची रचना केलेली आहे ..... म्हणुन सर्वांना माझा हाच प्रश्न आहे कि नक्की त्या देवाचे स्थान कुठे आहे ?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा