Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्राजक्त

व — विशाल कुलकर्णी, Tue, 04/05/2016 - 07:34
कसे पारिजातास सांगू सख्यांनो जरा आवरी रे गंधा तुझ्या सखी मोगरीही धुंदावली बघ विसरून अस्तित्वगंधा तिच्या नको देखणे ते सडे सोनपुष्पी, नसे रातराणी ध्यानीमनी प्राजक्त दारी ओघळावा, दरवळ रुजावा मुग्ध मातीतुनी फुलावे किती सडे मौक्तिकांचे जणू प्रित तुजवर मोगरीची जडे कधी सांडती आंसवे दोन, पाठी कधी थाप ती कौतुकाची पडे इथे आज शब्दांत घडे आगळे शिल्प सुखे मोहरे ताज स्वप्नांतला नसे शाश्वती श्वास कुठवर टिकावा? फुले नित्य प्राजक्त दारातला . विशाल कुलकर्णी

प्रतिक्रिया द्या
2661 वाचन

💬 प्रतिसाद (14)
प
पैसा Tue, 04/05/2016 - 07:51 नवीन
अहा! उन्हाळ्याच्या तलखीत एकदम थंड वाटलं!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 04/05/2016 - 07:54 नवीन
मससस्त!
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 04/05/2016 - 08:15 नवीन
विशाल्याला चोपा रे कूणी तरी !!! जीवघेण्या कवीता रचून राहलाय !! मिपावच्या कडक उन्हाळी धाद्यातही झुळकीने हरकलेला नाखु
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 04/26/2016 - 13:31 नवीन
कसचं कसचं नाखुकाका ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
म
मदनबाण Wed, 04/06/2016 - 03:08 नवीन
वाह्ह... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- ए सनम आँखों को मेरी खुबसुरत साज दे... :- रंगा पतंगा
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Wed, 04/06/2016 - 03:20 नवीन
सही विशाल दा
  • Log in or register to post comments
र
रातराणी Wed, 04/06/2016 - 08:07 नवीन
अप्रतिम!!
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Wed, 04/06/2016 - 15:47 नवीन
आणि वातावरण एकदम सुगंधित, प्रफुल्लित झालेलं आहे!
  • Log in or register to post comments
अ
अमृता_जोशी Wed, 04/06/2016 - 19:55 नवीन
नको देखणे ते सडे सोनपुष्पी, नसे रातराणी ध्यानीमनी प्राजक्त दारी ओघळावा, दरवळ रुजावा मुग्ध मातीतुनी
कातिल..
  • Log in or register to post comments
न
निशदे Wed, 04/06/2016 - 20:19 नवीन
सुंदर......... ""इथे आज शब्दांत घडे आगळे शिल्प सुखे मोहरे ताज स्वप्नांतला नसे शाश्वती श्वास कुठवर टिकावा? फुले नित्य प्राजक्त दारातला . "" इथे कवितेने कळस गाठला.........
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 04/26/2016 - 13:32 नवीन
_/!\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निशदे
व
विशाल कुलकर्णी Tue, 04/26/2016 - 13:27 नवीन
धन्यवाद मंडळी.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 04/26/2016 - 13:36 नवीन
अतिशय सुंदर रचना...
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Tue, 04/26/2016 - 18:24 नवीन
सुगंधी कविता आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा