Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मंदिरे व आक्रमणे

र
रमेश भिडे
Tue, 04/05/2016 - 19:47
🗣 135 प्रतिसाद
भारतावर मुस्लिमांचे आक्रमण झाले व मंदिरावर हल्ले होऊन मंदिर पाड़ण्याल्या सुरुवात झाली . मंदिर हे भारतीय श्रद्धा स्थानाचे केंद्र बिंदुच आहे. त्या मागे शास्त्रिय कारण ही आहे मात्र अशा आपल्या श्रद्धा स्थानांवर मुस्लिम टोळक्यानि नेहमीच हल्ले केले आता ही असे अतिरेकी करतच आहेत. यात आपल्या काही महत्वाच्या मंदिराना कायमच नुकसान सहन कराव लागल. सध्या जे काही मंदिर प्रवेशा बाबत सुरु आहे तेहि काही असच आहे मंदिरात प्रवेशा च्या नावाखाली जो गोंधळ घातला जात आहे तो चिड निर्माण करणारा आहे. याला कारण हे असले आंदोलन करणारे पुरोगामी. आंदोलन करणाऱ्या महिला या नेहमी मंदिरात जाणाऱ्या व खरोखर देवभक्ति असणाऱ्या अथवा संत मीरा सारख्या कृष्ण वेड्या किंवा पांडुरंग प्रेमी जनाबाई सारख्या असत्या तर त्याचा हट्ट प्रत्यक्ष देवाला ही पुरवावा लागला असता मात्र आंदोलन कोणत्या महिला करत आहेत ज्यांचा व देव धर्माचा काडिमात्र ही संबंध नाही ज्या समलैंगिगतेच्या समर्थनासाठी भर रसत्यात एकमेकिना चुम्बन करतात अशा महिलांना मंदिर प्रवेश हवा आहे हेतु यांचा हेतु स्पष्टच आहे प्रसिद्धि आणि भक्तिच वातावरण गढुळ करणे याला मंदिर प्रशासन आपल्या पद्धतीने विरोध करत ही आहे पन काही गोष्टींचा विचार मात्र गम्भीरतेने होणे अनिवार्य आहे मंदिर समित्यानि मंदिरा मधे काही नियम कड़क करण्याची गरज आहे. आज किती मंदिर समिति मधे धर्मशास्त्र जाननारे सभासद आहेत त्यांची संख्या अजिबात नाही असेच म्हणावे लागेल समिति मधे धर्मशास्त्राच् अध्ययन केलेले विद्वान असतील तर देवतेला अनुकूल असे नियम बनवता येतील तिथे असणाऱ्या पूजकांची शुद्धता देखील पाहणे अनिवार्य आहे , मूर्ति शास्त्रातील माहिती किती जनाना असते हे सगळ लक्षात घेण्याची वेळ आली आहे या साठी दक्षिण भारतातील मंदिरांचा आदर्श घ्यायला हवा . आपण जर देवकलेची शुद्धता ठेवली तर लाखो आक्रमण सहन करण्याची व परतून लावण्याची ताकद तो ईश्वर आपणास देईल या साठी आपण ही शुद्धता व पवित्रता याचं पालन करायला हव देव मूर्तिला स्पर्श करण्या आधी आपण खरोखर किती शुद्ध अवस्थेत आहोत याचा विचार प्रत्येकाने करावा मंदिर हे ऊर्जा स्थान आहे तिथे प्रवेश केला की आपोआप च ती ऊर्जा तुम्हाला भेटनार आहे त्या गाभार्यात प्रवेश पहिंजे हा हट्ट का ? आणि खर तर जे मनापासून देवाला मानतात ते असल्या मुर्ख पणाच्या मागण्या करणार ही नाहीत या मागण्या करणारे कोण आहेत हे सामान्य लोक ओळखून आहेत मात्र आता सर्वानी जागे होण्याची वेळ मात्र नक्कीच आली आहे साभार-© तीर्थराज पैठणकर गुरुजी .

प्रतिक्रिया द्या
19936 वाचन

💬 प्रतिसाद (135)
त
तर्राट जोकर Wed, 04/06/2016 - 14:36 नवीन
ह्याबद्दल शोधता एक पुस्तक आहे असे कळले. https://en.wikipedia.org/wiki/Hindu_Temples:_What_Happened_to_Them
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित_निंबाळकर
D
DEADPOOL Wed, 04/06/2016 - 16:40 नवीन
निंबाळकर साहेब नका नादी लागू! हाही धागा वाचनमात्र होईल नाहीतर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित_निंबाळकर
त
तर्राट जोकर Wed, 04/06/2016 - 14:51 नवीन
लेखात मुस्लिमांना आणण्याचा संबंध असा आहे की तेव्हा त्यांनी आक्रमणं केली त्यात लुटालुट करणे हा एक भाग होता, आता लुटालूट करण्यासाठी काही नतद्रष्ट हिंदू कायदेशीर आक्रमणं करत आहेत. असाच अर्थ असावा. खखो ते पैठणकर गुरुजी जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा
ब
बाळ सप्रे Wed, 04/06/2016 - 14:12 नवीन
मूर्ति शास्त्रातील माहिती किती जनाना असते
अच्छा.. यात पण जनाना/मर्दाना असतं का? ;-)
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Wed, 04/06/2016 - 14:18 नवीन
=)). रच्याकने- सप्रेसाहेब, तोच मुद्दा, तोच काथ्याकूट. तुम्हाला परत परत करायची इच्छा आहे काय? ह. घ्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
'
'पिंक' पॅंथर्न Wed, 04/06/2016 - 16:21 नवीन
"मुर्तीशास्र" म्हणजे नक्की कसलं शास्त्र ?
  • Log in or register to post comments
व
वडापाव Wed, 04/06/2016 - 16:39 नवीन
सगळी मंदीरं, चर्च, मशीदी इ पाडून, हवं तर वास्तुशास्त्रीयरीत्या चांगला नमुना असलेली मोजकी धर्मस्थानं अपवाद म्हणून टूरिस्टांसाठी प्रत्येकी दोन रुपये घेऊन मोकाट सोडून, उर्वरित ठिकाणी शाळा-काॅलेजं आणि हाॅस्पिटलं बांधली जावीत अशी कळकळीची इच्छा आहे. त्याचसोबत नवी धर्मस्थानं/श्रद्धास्थानं बांधण्यावर बंदी यायला हवी.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 04/06/2016 - 16:51 नवीन
वडापाव, नवी श्रद्धास्थानं बांधायला बंदी घालणं अयोग्य अन अशक्य आहे. जगात एव्हढी लोकसंख्या वाढली आहे. तरी लोकांनी पोरे काढायचा उद्योग थांबवला आहे का? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडापाव
ह
हेमंत लाटकर Wed, 04/06/2016 - 18:17 नवीन
देवस्थानात तरी कोणता प्रामाणिकपणा राहिलाय. पैशाचा भष्ट्राचार, तिकीट फाडले तर २तासात दर्शन. देवस्थानांकडे एवढा पैसा आहे पण एकही देवस्थानाने दुष्काळासाठी, शेतकर्यांना मदत दिली नाही. सरकारने सर्व देवस्थाना जवळील पैसा सरकारी जमा करून समापयोगी वापरावा.
  • Log in or register to post comments
V
viraj thale Wed, 04/06/2016 - 18:29 नवीन
आतापर्यंत कितीतरी देवस्थानांनी दुष्काळग्रस्ताना कोट्यावधी ची मदत केलेली आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
त
तर्राट जोकर Wed, 04/06/2016 - 18:36 नवीन
लोकांनी देवस्थानांना पैसा देण्यापेक्षा मग थेट सरकारजमा का करु नये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
ग
गामा पैलवान Wed, 04/06/2016 - 19:34 नवीन
तजो, शासननियुक्त पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधला असीम भ्रष्टाचार तुमच्या कानी आला असेल अशी आशा आहे. शिरडीच्या संस्थानात भ्रष्टाचाराने परम पातळी गाठली आहे. याउलट शेगावचं देवस्थान भक्तांच्या ताब्यात असल्याने तिथली व्यवस्था अप्रतिम आहे. देवळांचा पैसा सरकारजमा झाला की भ्रष्टाचार फोफावतो. मग का द्यायचा पैसा? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 04/06/2016 - 19:53 नवीन
भ्रष्टाचारमुक्त असे शेगावचं देवस्थान हे एकमेव संस्थान असावं. तसेच प्रत्येक भ्रष्टाचारसंपृक्त देवस्थान हे सरकारनियुक्त समितीद्वारे चालवले जात नाही. माझा मुद्दा वेगळा आहे. देवस्थानातला पैसा जर सामाजिक कार्यासाठी वापरला जातो तर मग तीच सामाजिक कार्ये करण्यासाठी देवळांऐवजी पैसा सरकारकडे द्यावा. सरकारला मोप गरज आहे. दर सहा महिन्यांनी सर्विसटॅक्स वाढवण्याची गरज पडणार नाही. देवस्थानने आपल्याला मिळालेला पैसा आणि त्याच्या खर्चाचा ताळेबंद सादर करतात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
क
काळा पहाड Wed, 04/06/2016 - 20:42 नवीन
सरकार गॅरंटी देईल का की हा पैसा मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध, कम्युनिस्ट आणि तत्सम अहिंदू लोकांसाठी वापरला जाणार नाही ते? मी देवस्थानला देणगी कन्हैया कुमारला शिक्षण घेता यावं म्हणून देत नाही. तेव्हा पहिल्यांदा ही सुचना मुसलमानांना करून बघा. मग पाहू.
देवस्थानने आपल्याला मिळालेला पैसा आणि त्याच्या खर्चाचा ताळेबंद सादर करतात काय?
पोप करतात काय ताळेबंद सादर? त्याचे भारतातले हस्तक? मशिदी करतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 04/06/2016 - 20:48 नवीन
सरकार गॅरंटी देत नाही मग सरकारला कर तरी कशाला देता? एवढा विश्वास आहे तर देवस्थानांनाच चालवू दे ना देश. हाय काय नाय काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Wed, 04/06/2016 - 21:07 नवीन
आज काय वीकडेजलाच काय हो? आम्ही सरकारला कर देतो तो तो भरावाच लागतो (कर्तव्य म्हणून) देतो. तसा कायदा आहे म्हणून देतो. सरकारनं ते पैसे नक्की कुठे खर्च करायचे हे सरकारनं ठरवण्यास आमची ना नाही. ते आम्हाला आधीच माहिती आहे. देवस्थानला देणगी देतो ते देवावरच्या प्रेमामुळे देतो. हिंदू धर्मावरच्या प्रेमामुळे देतो. इतर धर्म हिंदू धर्माचे शत्रू आहेत हे माहीत असल्यानं त्याच्या उत्थानासाठी देतो. ते आमचे खाजगी पैसे आहेत. जर आम्ही सेक्युलरच असतो तर सरकारलाच ते पैसे देणगी म्हणून दिले नसते का? राहता राहिला प्रश्न देश चालवण्याचा. देवस्थानांकडून देश चालवणं अपेक्षित नाही. देवस्थाने सुद्धा ते म्हणत नाहीत. तेव्हा तुमच्या सुपीक डोक्यात ही क्ल्पना कुठून आली हे माहिती नाही. पण माझा देणगीचा पैसा सरकारनं मुसलमानांना, कम्युनिस्टांना वगैरे वाटणं एक हिंदू म्हणून मला चालणार नाही. कर आणि देणगी या वेगळ्या गोष्टी आहेत. डोक्यात घुसलं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 04/06/2016 - 21:26 नवीन
आम्ही चोविस तास तारेत असतो, विकेण्ड्स पाळण्यासारखी क्षुद्रभक्ती आपण करत नाही. खालील प्रश्न डोक्यात (सुपिक) आलेत. देवस्थानला देणगी देतो ते देवावरच्या प्रेमामुळे देतो. >> देव तर चराचरात आहे ना? देवस्थानात तर बडवे, पुजारी, पुरोहित, ट्रस्टी असतात. हिंदू धर्मावरच्या प्रेमामुळे देतो. >> जो मंदिरात जात नाही, देणगी देत नाहीत त्याचे हिंदू धर्मावर प्रेम नसते? इतर धर्म हिंदू धर्माचे शत्रू आहेत हे माहीत असल्यानं त्याच्या उत्थानासाठी देतो. >> हे उत्थान नक्की काय असते आणी मंदिरात दान केल्याने कसे होते काही सांगू शकाल काय? भक्तांनी दिलेल्या देणगीचे काय होते हे विचारण्याचा हक्क एका हिंदूला आहे की नाही? ट्रस्टी स्वतःचे गल्ले भरतात का हे बघणे आवश्यक आहे की नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Wed, 04/06/2016 - 21:30 नवीन
देव तर चराचरात आहे ना? देवस्थानात तर बडवे, पुजारी, पुरोहित, ट्रस्टी असतात.
जो मंदिरात जात नाही, देणगी देत नाहीत त्याचे हिंदू धर्मावर प्रेम नसते?
हे उत्थान नक्की काय असते आणी मंदिरात दान केल्याने कसे होते काही सांगू शकाल काय?
मला फालतू पांचट प्रश्नांना उत्तरं देत बसण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि वेळ तर त्याहूनही नाही. तेव्हा, नमस्कार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 04/06/2016 - 21:45 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
L
lgodbole गुरुवार, 04/07/2016 - 04:51 नवीन
पहाडगुरुजीना क्लीन बोल्ड केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
न
नाना स्कॉच गुरुवार, 04/07/2016 - 04:57 नवीन
विनाकामी वसवस केली की असे फळ पदरात पड़ते ! :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
L
lgodbole गुरुवार, 04/07/2016 - 06:50 नवीन
ते माउंटन आहेत म्हणुन त्याना देवाकडे जावेच लागते. इफ मोहम्मद कान्ट गो टू माउंटन, माउंटन हॅस टु गो टु मुहोम्मद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
क
काळा पहाड गुरुवार, 04/07/2016 - 08:49 नवीन
क्लीन बोल्ड वगैरे काही नाही. पण प्रश्न र्‍हिटॉरिकल आहेत. शिवाय त्यांचा मेन धाग्याशी काही संबंधच नाही. आणि त्यांची उत्तरे काय येणार हे त्यांना एक्स्पेक्टेड आहे त्यावर काथ्या कुटण्यासाठीच त्यांनी प्रश्न विचारले आहेत. तेव्हा उगीच फालतू डिस्कशन मध्ये घाळवण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. आणि उगीच चेस्ट पाऊंडींग ची सुद्धा गरज नाही. माझ्या पोस्टस छोट्या असल्या तरी त्या जळजळीत असतील याची काळजी मी घेतोच. सध्या वेळ नाही. तेव्हा भेटूच, मोगासाहेब. तोपर्यंत चालू दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lgodbole
त
तर्राट जोकर गुरुवार, 04/07/2016 - 08:55 नवीन
फाइन. तुम्ही धाग्याशी संबंधित नसलेल्या विषयाबद्दलच्या प्रतिसादावर प्रतिसाद केला. तुमच्या त्याच प्रतिसादावर आधारित प्रश्न आहेत. धाग्याशी संबंधित नसलेल्या बर्‍याच विषयांवर आपण इथे प्रतिसाद दिले आहेत. तेव्हा असोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
V
viraj thale Wed, 04/06/2016 - 18:46 नवीन
देवाच्या नावावर तरी पैसा देतात आणि देवस्थाने ही सरकारच्याच ताब्यात आहेत .
  • Log in or register to post comments
ज
जेपी गुरुवार, 04/07/2016 - 04:57 नवीन
100.. अता सत्कार करायचा पण कंटाळा आला अश्या धाग्यावर... कुणाकुणाचा करायचा?? रच्याकने सत्कार समितीला देणगी मिळेल का ??
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 04/07/2016 - 14:53 नवीन
तृप्ती देसाई २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत खडकवासला मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवार होती....असे (माधव?) भंडारी यांनी स्पष्ट केले. संदर्भ दैनिक लोकमत वृत्त भाजपात गटबाजीचे ‘कमळ’ First Published :06-April-2016 : 23:00:00 Last Updated at: 07-April-2016 : 00:05:08 दिनांक ७ एप्रिल २०१६ सायं १८.१३ मिनीटांनी जसे पाहीले.
या इलेक्शन कमिशनच्या खडकवासला उमेदवार २०१४ अफिडेवीट यादीत तृप्ती देसाईंचे नाव आढळले नाही. भंडारींनी मुद्दाम चुकीचे सांगितले असेही होणार नाही-कदाचित नाव वापस घेतले असेही काही असू शकेल, जर त्या विधानसभेला उभ्या टाकल्या असतील तर इलेक्शन कमिशनचा सुयोग्य दुवा कुणि शोधून देऊ शकेल का ? भंडारींना हिन्दी भाषी संकेत माहित असणार, सहसा हिन्दीभाषी आदरार्थी उल्लेखांबद्दल अधिक सजग असतात, कदाचित पत्रकाराने बातमीत उल्लेख नीट केला नसेल अशी शक्यता असू शकेल का ? बाकी प्रकरण सुरु झाले तेव्हा मंदिर समितीवरील बरेच लोक राष्ट्रवादी अथवा मनसे गटाचे होते आणि आंदोलक काँग्रेसच्या म्हणजे भाजपाला त्यांचा एक पाठीराखावर्ग सनातनी आहे हे ओळखून मुद्दाम कात्रीत पकडायचे - अर्थात कॉन्स्पीरसी थेअरीवर चिमुटभर मीठा पलिकडे विचार करु नये असेच वाटते.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 04/07/2016 - 15:21 नवीन
लोकमत बातमीचा दुवा जोडावयाचा राहीला होता: http://www.lokmat.com/storypage.php?catid=20&newsid=12013325
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/07/2016 - 17:31 नवीन
या इलेक्शन कमिशनच्या खडकवासला उमेदवार २०१४ अफिडेवीट यादीत तृप्ती देसाईंचे नाव आढळले नाही. भंडारींनी मुद्दाम चुकीचे सांगितले असेही होणार नाही-कदाचित नाव वापस घेतले असेही काही असू शकेल, जर त्या विधानसभेला उभ्या टाकल्या असतील तर इलेक्शन कमिशनचा सुयोग्य दुवा कुणि शोधून देऊ शकेल का ?
खालील दोन संकेतस्थळावर तृप्ती देसाईने २०१२ मधील पुणे महानगरपालिकेची निवडणुक काँग्रेसच्या तिकिटावर लढविल्याचे उल्लेख आहेत. http://archive.indianexpress.com/news/officials-say-polls-fair-candidates-protest/916092/ https://www.hindujagruti.org/news/74813.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
L
lgodbole गुरुवार, 04/07/2016 - 18:53 नवीन
काँग्रेस व रा . काँ. म्हणजे हिंदुविरोधी ? हिंदू छत्रपतींचे वंशजही याच पक्षात आहेत ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
माहितगार गुरुवार, 04/07/2016 - 19:24 नवीन
योग्यबाजू आणि कायदा स्त्री प्रवेशाच्या बाजूने आहे तेव्हा आज ना उद्या त्यांना प्रवेश तसाही मिळणारच योग्यवेळी प्रसिद्धीत येऊन राजकीय प्रगती साधण्यात यश आहे आणि अशा पद्धतीने यश घेण्यात एक स्त्री मागे नाही हे ही नसे थोडके. अर्थात राजकीय पार्श्वभूमीच्या व्यक्तीने सामाजिक दृष्ट्या रास्त पुरोगामी भूमिका घेण्यात गैर काहीच नाही, पण जेव्हा राजकीय पार्श्वभूमी आहे तेव्हा ती जी काही आहे किंवा होती ती पारदर्शकपणे मांडली पाहीजे. पारदर्शकता हा कोणत्याही सामाजिक आंदोलनाचा आत्मा असावा. आंदोलनाची एकुण पद्धत तरुण राजकीय कार्यकर्ता स्टाईलच आहे त्यामुळे सामाजिक आंदोलनात सहसा दिसणार्‍या प्रबोधनाच्या स्टेप्स अगदीच वगळलेल्या दिसतात मुख्य म्हणजे आंदोलनाची नाळ सर्वसामान्य स्त्रीशी पुरेशी न जुळताच आंदोलन चालू आहे. मंदिर प्रवेशावरुन एवढे राजकारण रंगते आहे मिपावर एका अनाहितेचा एक धागा सुद्धा नाही. या धाग्यावर प्रतिसाद सुद्धा नाहीत, मिपा सोडून द्या वृत्तपत्रिय बातम्यांखाली चर्चा होतात त्यात महिलाही नाहीत आणि पुरुष पुरोगामीही नाहीत. छुटकु फुटकु बातम्या आहेत, एखाद नमनाला अग्रलेखही आहे पण सामाजिक आंदोलन म्हणून जसे जोमदार समर्थन दिसावयास हवे, लेखनात जोश हवा त्याचा सार्वत्रिक अभाव आहे. पंढरपुरात साने गुरुजी उपोषणास बसले तर प्र.के. अत्रे चौका चौकात चार चार माणसांसाठीसुद्धा एकसारख्या सभाच घेत आपली भूमिका मांडत सुटले पण मुख्य म्हणजे इतर पुढारी कायदा येईल थांबा म्हणत होते साने आणि प्रकेंनी कायद्याच्या पुढे समाज प्रबोधनाला महत्व दिले. या वेळी एक स्त्री राजकारणात जिंकणार हे नक्की, अनेकांचे समाजकारण दिखाऊ असते अजून एक समाजकारण दिखाऊ असल्याने फारसे बिघडत नाही, समाज प्रबोधनातून जेव्हढा फायदा व्हावयास हवा कदाचित तेवढा होऊ शकेल का? शेवटी मंदिर प्रवेशाचे आंदोलन प्रातिनिधीक असणार त्यातून एकुण स्त्री समतेची चळवळ किती पुढे जाते आहे या बद्दल साशंकता वाटते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
भ
भंकस बाबा Fri, 04/08/2016 - 02:38 नवीन
शेवटी मंदिर प्रवेशाचे आंदोलन प्रातिनिधिक असणार, हेच म्हणायचे आहे. ह्या मंदिर प्रवेशाला राष्ट्रवादी व् कॉंग्रेसच्या किती महिला आमदार व् खासदार हजेरी लावतात ते पाहू. विशेष करून शनिच्या चौथर्यावर! अगदी न्यायालयाने परवानगी देऊन देखिल वा कायदा बनून देखिल हा हक्क् बजावन्यास किती प्रतिसाद मिळेल? जाता जाता, या महिलातील काहिना कुठलेतरी टिकिट पक्के आहे. याचसाठी केला होता अट्टाहास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
च
चेक आणि मेट Fri, 04/08/2016 - 05:41 नवीन
व्वा छान! हिंदूराष्ट्र देवो भवः भारत माता कि जय : : : (मराठी नववर्षाच्या शुभेच्छा,प्रभू रामचंद्र कि जय,जय भवानी जय शिवाजी,जय भीम)
  • Log in or register to post comments
र
राही Fri, 04/08/2016 - 17:42 नवीन
शनिचौथर्‍यावर महिलाप्रवेशाचा तिढा सामंजस्याने सुटला आहे. ग्रामस्थांनी स्त्री-पुरुष दोघांनाही चौथर्‍यावर प्रवेश असण्यास ना हरकत दाखवली आहे. सर्व संबंधितांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
अ
अत्रे Sat, 04/09/2016 - 07:36 नवीन
ग्रामस्थांनी स्त्री-पुरुष दोघांनाही चौथर्‍यावर प्रवेश असण्यास ना हरकत दाखवली आहे.
मी तर लोकसत्तामधे वाचलं की ग्रामस्थ शनिवारी ग्रामसभा घेणार आहेत या विषयावर. अजून विषय पूर्णपणे पचनी पडलेला नाही असे वाटते. सध्या तरी न्यायालयीन बडगा दाखवल्याने ऐकत आहेत एवढेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा