Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महावितरण कंपनीकडुन वीज पुरवठा बंद पडल्यास पेनल्टी कशी मागायची ?

न
नितीनचंद्र
Wed, 04/06/2016 - 09:49
🗣 11 प्रतिसाद
दिनांक ३ एप्रील ला चिंचवड विभागात वीज पुरवठा भर दुपारी खंडीत झाला. सुमारे पाच तास चिंचवड विभागातले ग्राहक हाश्य - हुश करत राहिले. अनेकांनी फोन करुन वीज महावितरण कंपनीकडे किती वेळ लागेल इ. विचारणा केली पण वीज वितरणाचे अधिकारी फोनवर उपलब्ध नव्हते. याची नोंद दि. ४ एप्रीलच्या दैनीक सकाळच्या पिंपरी चिंचवड अवृतीतही घेतली गेली. सामन्यपणे आपला ( ग्राहकाचा ) आवाज वर्तमान पत्रात दिसला या नादात ग्राहक खुष झाले असतील. जर सप्लायचा फ्युज गेला असेल आणि शहरात ४ तासांपेक्षा जास्त काळ वीज बंद असेल तर दर तासाला पन्नास रुपये पेनल्टी ग्राहक मागु शकतो या बाबत मात्र ग्राहक जागरुक नाहीत. संदर्भ - २० मे २०१४ चे शासनाचा जी आर. या शासनाच्या आदेशात कोणत्या प्रकारच्या तक्रारीसाठी कोणत्या भागात ( शहरी/ग्रामीण ) जास्तीत जास्त वेळ वीजपुरवठा बंद पडल्यास ग्राहक पेनल्टी मागु शकतो याचा उल्लेख आहे पण ही पेनल्टी कशी मागायची या बाबत उल्लेख नाही. अश्या पेनल्टी मागण्याचा उद्देश इतकाच की वीज महावितरणाच्या कारवाईत जर दिरंगाई झाली असेल तर संबंधीतांना याची जाणिव व्हावी इतकाच आहे. पेनल्टी मागण्याची काल मर्यादा साठ दिवसांची आहे. मला अद्याप ३ एप्रीलला हा विद्युत पुरवठा नेमक्या कोणत्या कारणासाठी बंद आहे हे समजले नाही. हे कसे समजेल याबाबत महा वितरण कंपनीच्या वेब साईटवर माहिती नाही. जर माहितीच्या अधिकारात अर्ज केला तर ६० दिवसात उत्तर येईल अशी अपेक्षा ठेवता येत नाही आणि माहिती जरी मिळाली तरी नेमकी कोणत्या ऑफीसमधे अशी पेनल्टी मागावी या बाबतही माहिती वेब साईट वर उपलब्ध नाही. याबाबत मिपाकरांनी कधी अशी पेनल्टी वसुल केली आहे का ? जर असेल तर माहिती द्यावी.
वर्गीकरण
माहिती हवी आहे

प्रतिक्रिया द्या
7488 वाचन

💬 प्रतिसाद (11)
आ
आनन्दा Wed, 04/06/2016 - 09:51 नवीन
ग्राहक न्यायलयात चौकशी करावी असे वाटते.
  • Log in or register to post comments
न
नितीनचंद्र Wed, 04/06/2016 - 09:55 नवीन
कृपया असा सल्ला देऊ नये. ग्राहक न्यायालय जेव्हा असा क्लेम रिफ्युज केला जाइल तेव्हाच केस दाखल करुन घेते. ग्राहक न्यायालय अश्या चौकशीला उत्तरे देत नाही.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Wed, 04/06/2016 - 10:09 नवीन
सदर कंपनीच्या संपर्क अधिकार्‍याकडे ही माहिती मिळण्याची शक्यता व ती देण्याचे काम असावे
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 04/06/2016 - 10:49 नवीन
http://mercindia.org.in/pdf/Order%2058%2042/SoP_2014_English.pdf ही लिंक पहा. तसेच जवळच्या तक्रार निवारण केंद्रात संपर्क साधा.
  • Log in or register to post comments
न
नितीनचंद्र Wed, 04/06/2016 - 11:07 नवीन
ही लिंक माझ्याकडे आहे पण हे वाचुन क्लेम कसा करावा हा अर्थबोध होत नाही. मला असे अपेक्षीत आहे की ज्याने हे सोपस्कार आधिच केलेले असतील त्याचे मार्गदर्शन मिळावे. http://mercindia.org.in/pdf/Order%2058%2042/SoP_2014_English.pdf ही लिंक पहा. तसेच जवळच्या तक्रार निवारण केंद्रात संपर्क साधा. तक्रार निवारणात कुणी नीट उत्तरे देत नसते. जेव्हा लेखी अर्ज दाखल केला जातो तो योग्य त्या ऑफीस मधे दाखल न झाल्यास, योग्य त्या फॉर्मॅट मधे नसल्यास किंवा सोबत आवश्यक डॉक्युमेंटस न जोडल्यास बाद होतो. हा अर्ज बाद झाला आहे असे स्वतः हुन कुणी सांगत नाही. आपण फक्त धक्के खात रहातो. मला हे टाळायचे आहे.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 04/06/2016 - 11:40 नवीन
तुमच्या बिलावर संबंधित उपविभागाचा फोन नंबर व बिलिंग युनिट क्रमांक लिहिलेला असतो. तिथे फोन करून जवळच्या ग्राहक सुविधा केंद्राचे नाव व पत्ता मिळू शकेल. तिथे जाऊन 'other' या कॅटेगरीखाली सध्या कागदावर काँपेन्सेशन अर्ज दिला तर त्याची डेटेड पोच मिळते. ती सर्वथा ग्राह्य धरली जाते. तसेच यानंतर कोणत्या अधिकाऱ्याशी संपर्क साधायचा ही माहितीही तिथेच मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितीनचंद्र
अ
अन्या दातार Wed, 04/06/2016 - 11:18 नवीन
कंपनी अथवा तक्रारदार विद्युत पुरवठा नेमका किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत नव्हता हे प्रूव्ह कसे करणार? पॉवर मॉनिटरिंग कंपनीने केलेले चुकीचे असू शकते काय, किंवा कागदोपत्री कमी (अथवा शून्यही) दाखवणार नाही याची हमी (फूलप्रूफनेस) काय?
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 04/06/2016 - 11:41 नवीन
पुरवठा होत असलेल्या विभागाच्या संबंधित वाहिनीच्या सबस्टेशनमधील मीटरमध्ये ही माहिती रेकोर्ड झालेली असते. हे रेकोर्ड माहिती अधिकाराखाली मिळू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
न
नितीनचंद्र Wed, 04/06/2016 - 11:26 नवीन
अन्या दातार, आपले म्हणणे अगदी बरोबर आहे परंतु वर्तमान पत्रातच हा कालावधी पाच तास असल्याचे नमुद केलेले आहे. दै. सकाळ प्रतिनीधी शी झालेल्या वार्तालापानुसार ते शहानिशा करुनच बातमी देतात म्हणे. आता महा वितरणला हे मान्य नसेल तर वेगळी गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
न
नितीनचंद्र Wed, 04/06/2016 - 11:29 नवीन
प्रयास नावाच्या संस्थेने एक पी डी एफ फाईल वेबवर ठेवलेली आहे ज्यात जरा आणखी उपयुक्त माहिती आहे. http://www.prayaspune.org/peg/media/k2/attachments/consumer_guide_english_112A01.pdf परंतु अद्यापही नेमकेपणाने समजत नाही की असा क्लेम कॉणत्या फॉरमॅट मधे करायचा. कॉल सेंटर आता सप्लाय पुर्ववत झाल्यावर अशी तक्रार घेईल काय आणि तक्रार नंबर देईल काय?
  • Log in or register to post comments
भ
भाते Wed, 04/06/2016 - 11:30 नवीन
मुंबई ग्राहक पंचायत पुणे विभाग मिपावर सदस्य आहेत. व्यनि करून त्यांच्याशी संपर्क साधा किंवा मागे त्यांच्या एका धाग्यात संपर्क क्रमांक दिले होते त्यावर चौकशी करा. त्यांच्याकडुन योग्य माहिती मिळू शकेल. (मिपा आयडी पुणे मुंग्रापं)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा