Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

<हे वागणं बरं नव्हं>

न — नीलमोहर, Wed, 04/06/2016 - 13:07
अवं हे जग लई न्यारं, हितं खोट्याचंच वारं ह्याला खरं बोलनं सोसंना ह्याचा दिखाव्याचा तोरा, ह्याचा कागद हाय कोरा हितं सत्याची लेखणी पोचंना हितं हुच्चपणाची गोडी रं, नको फुकट छेडाछेडी रं अरं सोंगाढोंगाचा बाजार हिथला, साळसूद घालतोय्‌ अळीमिळी अन्‌ डूख धरिती, डंख मारिती, घरात भोळी अन्‌ भायेर कळी रं, रं, रं अशा गावात तमाशा बरा, खोट्याचा खरा, पिचकारी भरा, उडू दे रंग, उडू दे ढंग, उडू दे संग दिखावू पडद्याच्या आत, अवसेची रात, घुबडे ती गात, होवू दे दंग अगं चटकचांदणी, चतुर दामिनी काय म्हनू तुला तू हायेस तरी कोन टोकदार लेखणी मी कोपर्‍यात उभी, जशी म्यानी तलवार छुपी अवं पंतोबा, चारचौघांत होईल शोभा, हे वागणं बरं नव्हं काटेरी रान हे भवतीनं, चालत आले मी जपून चकव्यातून या चालू कशी, पाठलाग ह्यो टाळू कशी अरं नरसाळ्या, असं काय करतोयस खुळ्या, हे वागणं बरं नव्हं हिसका दावते जोराचा, तिरपा डोळा चोराचा परत्येक शब्दाला आडिवतो, अंगावं चिखल उडिवतो अरं पतंगा, नकोस घालू पिंगा, हे वागणं बरं नव्हं पाहून जनांची खेळीमेळी, जळजळ जीवाची कशी झाली काड्या घालूनि करतो खुणा, घडीघडीला खोडसाळपणा अरं मर्दा, अब्रुचा होईल खुर्दा, हे वागणं बरं नव्हं अकलेचा तोरा मी करते रं, डोस्क्यात ऐवज भरते रं हात माझा तू धरतोस कसा, अवतीभवतीनं फिरतोस कसा अरं बत्ताशा, आता रं पळतोस कशा, हे वागणं बरं नव्हं प्रेरणा: हे गाव लई न्यारं (पिंजरा)

प्रतिक्रिया द्या
3714 वाचन

💬 प्रतिसाद (15)
य
यशोधरा Wed, 04/06/2016 - 13:20 नवीन
ते वागनं असं हाय, णं नाय! ;)
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 04/06/2016 - 13:24 नवीन
मीटर गंडलंय, बाकी चान चान!!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 04/06/2016 - 13:29 नवीन
=))
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित Wed, 04/06/2016 - 13:30 नवीन
अबबबबबब नीमो.... दिवसेंदिवस विडंबन साम्राज्ञी पदाकडे वाटचाल
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित Wed, 04/06/2016 - 13:31 नवीन
बाकी भन्नाट आहे हे नमूद करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित
श
श्रीरंग_जोशी Wed, 04/06/2016 - 17:17 नवीन
हेच म्हणतो. तरी पूर्वीच्या विडंबनांपुढे हे जरा सौम्य वाटले ;-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित
न
नूतन सावंत Wed, 04/06/2016 - 16:03 नवीन
Prayatn aawdala.
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Wed, 04/06/2016 - 17:14 नवीन
प्रेरणा: हे गाव लई न्यारं (पिंजरा) कंस मामा ही राहिले टाकायचे.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Wed, 04/06/2016 - 18:51 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 04/06/2016 - 18:58 नवीन
ह्ये वागनं बरं नव्हं.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Wed, 04/06/2016 - 19:05 नवीन
वाइच जरा तर्री टाकायची हुती थुडीशी..! आज कालवण सपाक लागतय..!
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Wed, 04/06/2016 - 20:08 नवीन
घुसमट घुसमट म्हणतात ती हीच. नीलमोहर ह्यांचं पहिलं (शेवटंच ठरो) फसलेलं विडंबन.
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 04/07/2016 - 04:43 नवीन
आणि आमचा उल्लेख आवडला.... तेंडुलकरकडून नेहमीच शतकाची अपेक्षा धरू नै.धुमशान ४०-५० धावाही पुरेश्या होतात... सामना फिरवायला
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 04/07/2016 - 04:48 नवीन
नेहमीप्रमाणेच टुकार
  • Log in or register to post comments
ज
जेपी गुरुवार, 04/07/2016 - 05:01 नवीन
गुर्जी मोड- अरे या पांडुSSSला धरा रे !!!=)) - मोड ऑफ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा