Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आई पी एल-२०१६

D
DEADPOOL
Wed, 04/06/2016 - 18:15
🗣 65 प्रतिसाद
आताच ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकाचे भूत उतरत नाहीच, तोवर इंडिया का त्योहार असलेलं आई पी एल हजर! यावेळी अतिबलाढ्य चेन्नई व राजस्थान नसणार! मात्र गेलेली पुणे टीम परत आल्याचा आनंद आहे. माझ्या मताप्रमाणे : धोनी पुण्याला विजय (की पुणेरी बाण्याला अनुसरून पुणे धोनीला विजय)मिळवून देऊ शकेल. मुम्बई कागदावर तरी संतुलित आहे दिल्ली मला सगळ्यात कमज़ोर टीम वाटते हैदराबाद पूर्णपणे गोलंदाजवर अवलंबून आहे राजकोटही पावरफुल वाटते. कोलकता अंदरडोग ठरू शकते पंजाबही फलंदाज बाबतीत ताकदवान आहे बेंगलोर सगळ्यात बलाढ्य वाटते, पण मालक पळून गेल्याने मनोमन खच्चिकरण झालच असेल! चला मिपाकर, लागा कामाला! ९ एप्रिल जवळच आहे!!!

प्रतिक्रिया द्या
9505 वाचन

💬 प्रतिसाद (65)
D
DEADPOOL Sat, 04/09/2016 - 18:09 नवीन
हरभजनने धुतले मुंबई १२१-८
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Sat, 04/09/2016 - 18:09 नवीन
हरभजनने धुतले मुंबई १२१-८ २० ओवर
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 04/11/2016 - 10:37 नवीन
मी fantasy.iplt20.com वर Misalpav (कोड - 280052-64480) ही लीग तयार केली आहे. इच्छुकांनी जॉईन व्हावे.
  • Log in or register to post comments
अ
अमेय देव Tue, 04/12/2016 - 01:24 नवीन
आज संध्याकाळी सहभागी होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 04/12/2016 - 10:54 नवीन
पहिल्या सामन्याच्या वेळी fantasy.iplt20.com ही साईट अतिगर्दीमुळे क्रॅश झाल्याने संघ निवडता आला नाही. दुसर्‍या सामन्यासाठी संघ निवडता आला, परंतु त्यांच्या सॉफ्टवेअरमधील घोळामुळे संघातले बदल सेव्ह झालेच नाहीत व सामन्यानंतरचे गुण सुद्धा रेकॉर्ड्वर आले नाहीत. काल तिसर्‍या सामन्याच्या वेळी सुद्धा साईट डाऊन असल्याने संघ निवडता आला नाही. आजही ही साईट बंदच आहे. एकंदरीत त्यांच्या लीगमध्ये किती मोठ्या संख्येने इच्छुक सामील होतील याचा अंदाज चुकल्याने त्यांची साईट, सर्व्हर व सॉफ्टवेअर क्रॅश झाले आहे. आता ३ सामने संपल्यानंतर लीग सुरू करण्यात अर्थ नाही. क्रिकइन्फोची लीग देखील यावर्षी सुरू नाही. त्यामुळे या दोन्ही लीगमध्ये मी यापुढे सहभागी न होण्याचे ठरविले आहे. अधूनमधून सामने बघीन परंतु लीगमध्ये जाणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमेय देव
श
श्रीगुरुजी Tue, 05/24/2016 - 10:49 नवीन
आयपीएलच्या प्राथमिक फेरीतील ५६ सामने संपले असून आता प्लेऑफचे फक्त ४ सामने शिल्लक आहेत. गतवर्षीच्या विजेत्या मुंबई चॅम्पियन्सला प्लेऑफ मध्ये स्थान मिळविण्यात अपयश आले आहे. नव्याने स्थापन झालेल्या पुणे संघाचा शेवटून दुसरा क्रमांक आला. धोनी कर्णधार असूनही या नवीन संघाला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. ४ परदेशी खेळाडू जखमी झाल्याचाही फटका बसला. दुसरीकडे पंजाबची कामगिरी पुन्हा एकदा निष्प्रभ ठरली. सर्व १४ सामन्यात अपयशी ठरलेल्या डेव्हिड मिलरला काही सामन्यानंतर वगळून दुसर्‍या खेळाडूला संधी द्यायला हवी होती. दिल्लीच्या संघाला यावेळी नवीन कर्णधार (झहीर) व नवीन मेंटॉर (द्रविड) लाभला होता. त्यांनी १४ पैकी ७ सामने जिंकले. परंतु प्रत्येक सामन्यात संघात बदल केल्याने हा संघ कधी स्थिरावलाच नाही व त्यामुळे ते प्लेऑफ मध्ये येऊ शकले नाहीत. मुंबईला मलिंगाची उणीव जाणवली. हरभजनही बहुतेक सामन्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांनीदेखील १४ पै़की फक्त ७ सामने जिंकले. दुसरीकडे नव्याने स्थापन झालेल्या गुजरात संघाने प्रथम क्रमांक मिळविला. अर्थात सुरवातीच्या धडाक्यानंतर त्यांची कामगिरी खालावली. पहिल्या ७ पैकी ६ सामने जिंकल्यावर उर्वरीत ७ पैकी फक्त ३ सामने त्यांना जिंकता आले. या संघात ड्वेन स्मिथ, मॅकलम्, रैना, फिंच, ड्वेन ब्राव्हो असे धडाकेबाज खेळाडू आहेत. बंगळूर संघात गेल, कोहली, डीव्हिलिअर्स, वॉटसन इ. तगडे फलंदाज असूनही पहिल्या १० सामन्यातील फक्त ४ सामने त्यांना जिंकता आले होते. मात्र शेवटचे चारही सामने जिंकून त्यांनी दुसरा क्रमांक मिळविला. कोहलीने जवळपास प्रत्येक सामन्यात खोर्‍याने धावा केल्या. हैद्राबादतर्फे कर्णधार वॉर्नरने धडाकेबाज धावा करून प्रथम ४ संघात स्थान मिळविले. वॉर्नरबरोबर भुवनेश्वर, मुस्तफिजूर, बरिंदर स्रान, नेहरू इ. मध्यमगती गोलंदाज हीच या संघाची खरी ताकद आहे. कलकत्त्याची खरी ताकद त्यांच्या फिरकी गोलंदाजात आहे. सुनील नरिने, शकिब, ब्रॅड हॉग, चावला इ. गोलंदाजांच्या जोरावरच त्यांनी देखील प्रथम ४ संघात स्थान मिळविले. रसेलच्या अष्टपैलू खेळाची देखील त्यांना खूप मदत झाली. या आठवड्यात उर्वरीत ४ सामने आहेत. बहुतेक गुजरात किंवा बंगळूर संघ यातील एक विजेता होईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
स
साहेब.. Tue, 05/24/2016 - 10:57 नवीन
गुजरात X बंगळूर = गुजरात कलकत्ता X हैद्राबाद = हैद्राबाद हैद्राबाद X बंगळूर = हैद्राबाद गुजरात X हैद्राबाद = गुजरात माझे आपले अंदाज :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
शलभ Tue, 05/24/2016 - 11:04 नवीन
बेंगळूरु.. फायनल मारल्याशिवाय कोहली काही थांबत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहेब..
श
श्रीगुरुजी Tue, 05/24/2016 - 11:26 नवीन
कोहली सध्या अशक्य आणि स्वप्नवत फॉर्मात आहे. १४ सामन्यात ९००+ धावा व त्यात ४ शतके ही अशक्यप्राय कामगिरी आहे. बहुतेक सर्व सामन्यात त्याला यष्टीरक्षक राहुल व गेल/वॉटसन/डीव्हिलिअर्स यापैकी किमान १ जण यांची जोरदार साथ मिळत आहे. गोलंदाजीत श्रीनाथ अरविंद व चहल हमखास बळी मिळवून देत आहेत. डीव्हिलिअर्स अशक्यप्राय झेल घेतो. एकंदरीत हा संघ खूप तगडा आहे. अर्थात गुजरातकडेही तगडे फलंदाज आहेत व प्रवीणकुमारची गोलंदाजी आहे. हैद्राबादकडे फलंदाजीत मुख्यत्वेकरून वॉर्नर असला तरी त्यांची गोलंदाजी खूप तगडी आहे. कलकत्त्याकडे अत्यंत प्रभावी फिरकी गोलंदाज आहेत. एकंदरीत सर्व ४ संघ तुल्यबळ आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
ग
गामा पैलवान Tue, 05/24/2016 - 13:45 नवीन
‌
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 05/25/2016 - 16:35 नवीन
काल आरसीबीने अत्यंत कठीण परिस्थितीतून सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता आज कलकत्ता वि. हैद्राबाद सामना आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 05/30/2016 - 11:04 नवीन
बहुतेकांचे अंदाज खोटे ठरवित सनरायझर्सने चुरशीच्या सामन्यात बलाढ्य बेंगळूरचा ८ धावांनी पराभव करून ९ व्या आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. या संघाने प्रथमच विजेतेपद मिळविले आहे. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाने ५ वेळा अंतिम फेरीत प्रवेश करून २ वेळा विजेतेपद मिळविले होते (या संघाच्या विजेतेपदाबद्दल आणि एकूणच कामगिरीबद्दल शंका आहे. या संघाचा मालक श्रीनिवासन व त्याचा जावई गुरूनाथ मयप्पन मॅच फिक्सिंग मध्ये गुंतल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याने आता या संघावर २ वर्षे व मयप्पनवर तहहयात बंदी आहे.). कलकत्त्याने २ वेळा अंतिम फेरीत प्रवेश करून दोन्ही वेळा विजेतेपद मिळविले होते. मुंबई इंडियन्सने ३ वेळा अंतिम फेरीत प्रवेश करून २ वेळा विजेतेपद मिळविले होते. पूर्वीच्या डेक्कन चार्जर्स व राजस्थान रॉयल्स संघांनी एकेकदा अंतिम फेरीत प्रवेश करून विजेतेपद मिळविले होते. बंगळूरने ३ वेळा अंतिम फेरीत प्रवेश करून तीनही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला. यावेळी नव्याने तयार झालेल्या गुजरात लायन्स संघाने स्पर्धेच्या पूर्वार्धात जबरदस्त कामगिरी केली. परंतु उत्तरार्धात ते ढेपाळले. नव्याने तयार झालेला अजून एक संघ म्हणजे पुणे सुपरजायंटस्. या संघाच्या नावात पुणे असले तरी पुणे व महाराष्ट्राचा या संघाशी सुतराम संबंध नव्हता. नावात पुणे असूनसुद्धा या संघाला पुण्यातून सुद्धा प्रेक्षकांचा फारसा पाठिंबा मिळाला नाही. या संघातील अनेक खेळाडू अपयशी ठरून सुद्धा त्यांनी शेवटपर्यंत संघात फारसे फेरफार केले नाहीत व एकही स्थानिक खेळाडूला संधी दिली नाही. बंगळूर व गुजरात संघांकडे अत्यंत तगडे फलंदाज होते, परंतु त्यांची गोलंदाजी दुर्बल होती. त्याचाच त्यांना फटका बसला. ट-२० सामन्यात बहुतांशी फलंदाजांचे वर्चस्व असले तरी ज्या संघाकडे चांगले गोलंदाज आहेत तो संघच शेवटी पुढे जातो हे यावर्षीही दिसून आले. हैद्राबाद व कलकत्त्याकडे बंगळूर व गुजरातच्या तुलनेत कमी तगडे फलंदाज होते. परंतु त्यांची गोलंदाजी चांगलीच भक्कम होती. त्यामुळेचे ते प्लेऑफमध्ये येऊ शकले. हैद्राबादने काल २०८ धावा करूनसुद्धा गेल व कोहलीने तुफान फलंदाजी करून सामना जिंकण्याच्या अवस्थेत आणला होता. परंतु हैद्राबादच्या गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये अचूक गोलंदाजी करून विजय मिळविला. मुंबईचा संघ समतोल असलात तरी त्यांना मलिंगाची उणीव जाणवली. हरभजन व पोलार्ड यावर्षी बहुतेक सामन्यात अपयशी ठरूनसुद्धा त्यांना बहुतेक सामन्यात खेळविले गेले. सलामीला पार्थिव पटेल व नंतर हार्दिक पंड्याही अपयशी ठरले. त्यामुळे त्यांना प्लेऑफमध्ये जाता आले नाही. पंजाबकडे डेव्हीड मिलर जवळपास सर्व सामन्यात अपयशी ठरला. तरी त्याला सर्व सामन्यात घेतले होते. मॅक्सवेलही बहुतेक सामन्यात अपयशी ठरला. त्यांच्याकडे मोहीत शर्मा व अक्षर पटेल हे बर्‍यापैकी गोलंदाज असूनही बरेच फलंदाज अपयशी ठरले. दिल्लीने प्रत्येक सामन्यात घाऊक बदल केल्याने त्यांचा संघ शेवटपर्यंत स्थिरावला नाही. त्याचाच त्यांना फटका बसला. एकंदरीत यावेळची स्पर्धा चांगलीच चुरशीची झाली.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 05/30/2016 - 13:30 नवीन
अवांतर : श्रीगुरुजी, मुंबई संघाचं नाव इंडियन्स का ठेवलं असावं? दुसरं कुठलं शहर मिळालं नाही का? खरं तर दिल्ली इंडियन्स शोभून दिसलं असतं. क्रिकेटच्या आडून वेगळ्या हालचाली तर चालू नाहीत? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चेक आणि मेट Mon, 05/30/2016 - 13:38 नवीन
प्रांतीय अस्मितेपक्षा राष्ट्रीय अस्मिता बरी! आणि पूर्वीचे pune worriers india बद्दल काय? बाकिच्या ipl संघांनी महाराष्ट्राकडून हे शिकण्यासारखे आहे विशेषतः पंजाब्यांनी.त्यांना फार कौतुक असतं पंजाबी असण्याचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Mon, 05/30/2016 - 14:39 नवीन
चेक आणि मेट, तुम्ही म्हणताय तशी राष्ट्रीय अस्मिता बरी. फक्त ती इतर संघांच्या नावांतून दिसंत नाही. तशी दिसलेली आवडेल बघायला मला. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा