Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कधी कधी

अ — अभिषेक पांचाळ, Wed, 04/06/2016 - 19:17
वास्तवाला स्विकारुन , स्वप्नांना खोटं म्हणावं लागतं दुःख ठेऊन मनात , जगासमोर हसावं लागतं कधी कधी , स्वतःला विसरून , मनाविरुद्ध वागावं लागतं अपेक्षांचं ओझं , डोक्यावरतीच असतं वाईट काळातच , खरं जग दिसतं तरी दुर्लक्ष करून , सारं विसरावं लागतं कधी कधी , ओळख असून सुद्धा , अनोळखी बनावं लागतं पंख असूनसुद्धा , जमिनीवरच घरटे मोकळे ते आकाश , पाहण्यासाठीच उरते कुवत असलीतरी , पिंजऱ्यातच राहावं लागतं कधी कधी , परिस्थितीपुढेसुद्धा , नतमस्तक व्हावं लागतं देती साऱ्या जगा , ते अल्पायुषी झाले देता देता सारे , जरा घाईत मरून गेले चांगलं देण्यासाठी , अपमानाने भरावं लागतं कधी कधी , अमर होण्यासाठी , क्षणोक्षणी मरावं लागतं सारं दिसूनसुद्धा , तोंड मुकं होई भीतीपोटी कधी , दृष्टीसुद्धा जाई पेटलेल्या मनाला , शांत करावं लागतं कधी कधी , आगीलाही त्या , पाण्यात शिरावं लागतं संधीकडे कडे कधी , डोळे बघत असतात व्याकूळतेने फक्त , एक क्षण मागत असतात संधी मिळत नाही , तरी आशेत राहावं लागतं कधी कधी , इच्छा नसतानाही , हात बांधून जगावं लागतं तडजोडींशीच मग , जिव्हाळा वाटू लागे संकटांची मालिका घेऊन , नियती येई मागे जिंकता जिंकता कधी , उगाचच हरावं लागतं कधी कधी , पूर्ण संपूनही , थोडसं तरी उरावं लागतं                  - अभिषेक पांचाळ

प्रतिक्रिया द्या
1108 वाचन

💬 प्रतिसाद (3)
च
चांदणे संदीप Wed, 04/06/2016 - 19:58 नवीन
होई-जाई, झाले-गेले, असतात, लागे-लागतं.... यात कुठेतरी कवितेचा आत्मा गुंडाळत जाऊन न सुटणारा, धाग्याचा गुंता होऊ पाहतोय. जरा शब्द/ओळी कमी करून अजून प्रभावी करता येते का बघा. चांगलच लिहिता अभिषेकराव! Sandy
  • Log in or register to post comments
अ
अभिषेक पांचाळ Wed, 04/06/2016 - 20:13 नवीन
Kk..thanx
  • Log in or register to post comments
अ
अभिषेक पांचाळ Wed, 04/06/2016 - 20:13 नवीन
नक्की प्रयत्न करेन
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा