वर्गणी नव्हे खंडणी
मी रोज जेथे दुध घ्यावयास जातो ते आमच्या भागातील एका राजकीय पक्षाचे प्रभाग अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी बर्याचदा एक दोन वाक्यात सध्याच्या बाबत काहीतरी बोलणे होतेच. आठवड्यापूर्वी शिवजयंतीनिमित्त दोन नेत्यांचे सकाळी बोलणे सुरु होते की सण आला की पळून जावेसे वाटते. मुलांची टोळी येते आणि जबर रक्कम मागते. नाही म्हणता येत नाही. एक एक सण १० ते १५००० रुपयात जातो. मी म्हटलो तुम्ही दोघे असे म्हणाल तर आम्ही कोणाकडे मदत मागायची? दोघांनी नुसतेच हसुन दिले. मी पण हसुन निघालो.
आजच सायंकाळी घरी आलो. तोवर ७ - ८ जणांचे टोळके घरी १४ एप्रिल ची वर्गणी मागायला हजर झाले. घासाघिस करुन वर्गणी दिली. घरात पत्नी, आई व माझे या वर्गणीवर बोलणे थोडा काथ्याकुट झाला. या वर्गणी मागणार्या टोळक्याबाबत मला सतत असे वाटते.
१ - कोणत्याही सणाची वर्गणी द्यायची म्हटले की माझी नाराजी असते.
२ - दिलेल्या रकमेचा उपयोग हवा तसा होत नाही
३ - माझ्या कष्टाचे पैसे हे लोक त्यांचा हक्क म्हणुन घेउन जातात मी नाही म्हणु शकत नाही म्हणुन संताप होतो.
४ - संघटीत पणाचा सरळ सरळ गैरफायदा आणि उपद्रवमुल्याची जाणीव करुन देतात.
५ - असहायपणा आणि अगतिकता यांची जाणीव.
६ - त्यांच्याकडे शारीरिक हावभाव आणि भाषेकडे पाहुन यांच्याशी ओळख का वाढवावी असा प्रश्न पडतो.
टीप : मी आंबेडकर विरोधी नाही. मला त्यांच्या कार्याबद्दल आदरच आहे.
जरा वेळ मिळाला की टंकतो. बर्याच आतल्या गाठी माहिती आहेत.लिहा लिहा.. नक्की लिहा.