Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गुंतण

P — pj, Wed, 04/06/2016 - 21:53
आणि अचानक तो बिलोरी आरसा हाती लागला पुरातन पण जादुई, अगदी परीकथेतल्या सारखा यौवनाच्या मंतरलेल्या दिवसात स्वप्नात भेटलेला आज माझ्या हातात हसत अलगद विसावलेला थरथरत्या हातानी, साशंक मनानी समोर धरला आणि माझच एक आगळं रूपडं आलं भेटीला अगदी नितळ, प्रफुल्लित, अन् आकंठ तृप्तता धडधडत्या उराशी त्याला गच्च कवटाळला हळूहळू त्यावरही काळाची काळी पुट चढू लागली तर पारा उडू नये म्हणून इकडे माझी वेडी काळजी त्यातल्या रुपड्यात कुठेशी उदासीची छटा दिसली तर माझीच नजर अंधूक, अशी समजूत काढली असं त्या आरश्यात गुंतण आता जड जातय दिवसरात्र जीवाची तडफड आता असह्य होतेय ते रुपड का तो आसरा प्रिय, हा पडलाय प्रश्न उत्तराची साशंकता, अन् काहूर माजलयं विचारांच हातावर वळ ही न उमटता कसा धरू मी आरसा रुपड्याला सोडून फक्त आरसा कसा म्हणू माझा बुद्धत्वाच्या वाटेवर गुंतण्याला त्यानं दिली तिलांजलि पण सामान्यत्व माझ्यातलं कशी चढेल ती पायरी -PJ

प्रतिक्रिया द्या
1180 वाचन

💬 प्रतिसाद (5)
अ
अमृता_जोशी Wed, 04/06/2016 - 21:57 नवीन
छान जमलय. मिपावर स्वागत आणि पुढील लेखनास शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य गुरुवार, 04/07/2016 - 05:28 नवीन
चांगलीये.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/07/2016 - 05:32 नवीन
आवडली कविता. शेवटच्या चार ओळी खासच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे गुरुवार, 04/07/2016 - 06:06 नवीन
आवडली कविता!
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 04/07/2016 - 06:17 नवीन
उत्तम कविता!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा