Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भूक भागत नाही

अ — अभिषेक पांचाळ, गुरुवार, 04/07/2016 - 18:30
आनंदाच्या क्षणांना , लागते संकटांची नजर दु:खाच्या अंधारात , हासु नसतेच हजर दु:ख करते कहर , येतो अश्रुंचा पुर अगदी समोरुन दिसते , सुख जाताना दुर दाटते दु:खाचे धुके , पुढे रस्ता दिसत नाही नेमके अशाच वेळी , काय करु सुचत नाही सुख गेलय पळुन , त्याला शोधू तरी कसे माझं नशिब किती वेड , खुळ माझ्यावरच हसे माझी अशी स्थिती बघता , देव येतो मग धावून माझ्याकडचं थोड दु:ख , संगे निघतो घेउन एक त्यालाच ती चिंता , माझी दशा पहावत नाही संकटात पडल्यावर मी , माझ्यावर हासत नाही देतो पाठीवर थाप , पुढे लढण्यासाठी देव येतो माझ्यासंगे , घेऊन कृपेची काठी देऊन मायेचा आधार , दु:ख बाजुला तो करतो माझ्याच या जन्मासाठी , पुन्हा पुन्हा तो का मरतो मती माझीच ती खोटी , दोष देतो जो मी त्याला त्याने जन्म दिला मोठा , सुख दिले अन वाट्याला सारे देऊन मग मला , देव काही मागत नाही सारंकाही घेउन , माझी भुक भागत नाही - अभिषेक पांचाळ

प्रतिक्रिया द्या
1073 वाचन

💬 प्रतिसाद (1)
च
चांदणे संदीप गुरुवार, 04/07/2016 - 19:20 नवीन
काही ओळी सचिन-द्रविडसारख्या तर काही वेंकटेश प्रसाद आणि आशिष नेहराने हातात बॅट घेतल्यासारख्या! ;) Sandy
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा