झेंडूची फुले
"दाखिव सखया मजला तू
काय ठेविलास लपवुनी?
आणिलास गेंद गुलाबाचे
बागेतुनी कुठल्या (चोरुनी?)
गजरा किंवा आणिलास
तू (दहा रुपये खर्चूनी?)
आणिलास नभिचे तारे वा
तव हस्ताने याच तोडूनी?"
"काय करायचे त्या
गुलाबांचे सजावटी?
काय करावे की
गजरा अन तो माळुनी?
काय करतेस ते
नभीचे तारेच आणि?
प्रिये तुजसाठीच
'झेंडूची फुले' आणिली
वाचू आस्वादू
चल तो काव्य रस चाखू
न विसरु ते खाण्या
आतिल खोबरे परंतु!"
💬 प्रतिसाद
(11)
प
प्रचेतस
Fri, 04/08/2016 - 05:39
नवीन
ह्म्म्म..
तुमच्या हाती झेंडूची फुले म्हणजे सेहवागच्या हाती तेंडल्याची ब्याट असा प्रकार झाला तर...
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Sat, 04/09/2016 - 06:12
नवीन
झेंडूची फुले, फुकट आहे आंजावर कुठेतरी!
मिळवून वाचा! लई झ्याक हाय !!
(लिंक देतो सापडल्यास !)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 04/09/2016 - 06:26
नवीन
हे आत्मलिखित आहे काय?
- Log in or register to post comments
स
सुधीरन
Wed, 04/13/2016 - 05:16
नवीन
पुनर्मुद्रण-नोव्हेंबर २०११
मूल्य-२५०
- Log in or register to post comments
स
सुधीरन
Wed, 04/13/2016 - 05:19
नवीन
झेंडूची फुले हे माझे अतिप्रिय पुस्तक! त्या पुस्तकाच्या प्रेमापोटिच हे काव्य लिहिले.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 04/13/2016 - 05:26
नवीन
आमच्या एका मित्रांचेही हे अवडते पुस्तक.
ह्याच पुस्तकावरुन प्रेरित होऊन त्यांनी 'मी माझा मग माझा कुणाचा' ह्या नावाने एक विडंबित चारोळ्यांचे पुस्तक काढले जे आख्ख्या व्होल महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय झाले.
कवीची स्वाक्षरी असलेली एक दुर्मिळ प्रत मजकडे आहे.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 04/13/2016 - 05:51
नवीन
कोण हो हे मित्र? ;
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 04/13/2016 - 06:01
नवीन
आपले नेहमीचेच. :)
- Log in or register to post comments
स
सुधीरन
Wed, 04/13/2016 - 05:30
नवीन
छान!
ते पुस्तक मिळते का बघतो.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 04/13/2016 - 05:50
नवीन
सध्या ही प्रत दुर्मिळ आहे. मात्र घरकुल प्रकाशनाच्या श्री व सौ पटवर्धन यांजकडे चौकशी केल्यास कदाचित एखादी प्रत तुम्हास मिळू शकेल.
- Log in or register to post comments
स
सुधीरन
Wed, 04/13/2016 - 06:08
नवीन
http://www.misalpav.com/node/18473
- Log in or register to post comments