Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मोबाइल आणि मी !!!

फ — फिझा, Fri, 04/08/2016 - 10:11
मोबाइल आणि मी !!! सकाळी उठल्या उठल्या आधी मोबाइल चेक करतो कुणाकुणाला like अन share, वगैरे करून टाकतो ! दात घासायला घेतले कि ' snooze वाला' अलार्म वाजतो अंघोळ होईपर्यंत बॉसचा, call पण येऊन जातो ! चहा नाश्ता करता करता videos काही पाहून घेतो ऑफिसला पोचेपर्यंत सगळी गाणी सुद्धा एन्जॉय करतो ! ऑफिसचे काम तर काय रोजचेच आहे पण whatsapp च्या कट्ट्यावर, आज बातमी नवीन आहे गालातल्या गालात हसत आजूबाजूला पाहून घेतो ५, ६ वाक्यं टंकून, मोबाइल vibrator वर जातो लंच break पर्यंत सगळे unread , read झालेले असते महत्वाच्या mails अन किराण्याची यादी सुद्धा, 'sent ' असते ! एक दोन sms , मिसकॉल फिस्कॉल कोण फिकीर करतो संध्याकाळची मिसळ अन dinner सुद्धा ' Order' करतो घरी येता येता फोनवरती लांबच्या मित्रांशी गप्पा मारतो , मोबाइल पाहत पाहतच, लेकरांची माझ्या पापी घेतो ! ' पूर्ण लक्ष तुझ्याचकडे ' असे बायकोलाही भासवतो कसा 'मी' सगळ्यांच्या आणि हा 'मोबाइल' माझ्या, मनासारखे वागतो ! सगळे खुश मीही खुश कित्ती कित्ती छान !! मोबाइल वरची दुनिया न्यारी हरपून जावे भान !! प्रत्येक दिवस हा 'असाच' , रोज रोज जातो तारीख सुद्धा मोबाइल स्वतःच बदलून घेतो अशा कितीक तारखा गेल्या आता आठवत नाही मी जगात कि हे जग माझ्या हातात, काही उमगत नाही आज मात्र मोबाइल वर काहीच update नाही कि आज कुणाला माझी आठवण च येत नाही !! तेव्हा कुठे मग …… Virtual जगातला मी, आज reality मध्ये बघतो आजूबाजूला सग्गळ तसंच , फक्त मी कुणाच्यात नसतो हरवून बसलोय खरं जग, अन लेकरांची पापी बायकोसुद्धा कामाशिवाय, हल्ली बोलत नाही फारशी कसे सांगू तुम्हाला या नव्या जाणीवेच्या यातना मोबाइल देतो फेकून , फक्त मला Reality मध्ये घ्याना !! ……… फिझा !

प्रतिक्रिया द्या
900 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा