Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शेअरबाजार : 'डिस्काऊण्ट...पहावा मिळवुन' !!!

प
प्रसाद भागवत
Fri, 04/08/2016 - 12:34
🗣 85 प्रतिसाद
"चिरंजीव शेअरबाजारांत करियर करणार आहेत म्हणे...." अशी माझ्या (कु)प्रसिध्दीची नुकतीच सुरवात होवु लागलेला, 20 एक वर्षांपुर्वीचा काळ, पोटापाण्याचे काहितरी बघावे या विवंचनेत घराबहेर पडलेला मी टळटळीत दुपार झाल्याने घरी परतण्यासाठी बस स्टॅंड्वर उभा होतो, तितक्यांत माझ्या ओळखीचे एक सदगृहस्थ व त्यांच्या पत्नी सुहास्य वदनाने येताना दिसले. दोघांच्याही हातात एक/एक ड्रायफ्रुटसचा पॅक !!... तो जमाना असे बॉक्स फक्त दिवाळींत मिळण्याचा होता. मी एखाद्या गोलंदाजाने पंचांकडे केवळ औपचारिकता म्हणुन अपील करावे, तसे नुसतेच मान व डोळे हलवुन बॉक्सकडे पहात 'आज काय विषेष??' अशी विचारणा केली. झाSSSले... पानशेतचा प्रलय प्रलय म्हणजे काय असेल..त्याची अनुभुती मला पुढच्या काही वेळांत आली (नशीबवान आहात तुम्ही, येथे मी तुम्हांला फक्त सारांश सागतोय....) मुद्दा असा होता की हे साहेब काही ठराविक कंपन्याचे प्रत्येकी २ शेअर्स घरातील प्रत्येकाच्या नावे घेत. आणि मग हे आख्खे 'शेअरहोल्डर्स' कुटुंब अशा कंपन्यांच्या पुणे शहरांत होणाऱ्या 'वार्षिक सर्वसाधारण सभेला'(AGM) अगदी न चुकता हजेरी लावे....."सभा ही कोणत्यातरी पॉश ए.सी सभागृहांतच होणार, तास दोनतास छान विश्रांती…..मस्त सरबराई होते,आणि वर अशी सप्रेम भेट मिळते...शिवाय डिव्हीडंड आहेच, तो कुठे जातोय??" श्री काका उवाच. मला उगीचच मेसच्या जेवणाचे आवढण आले की शोधुन शोधुन काढलेल्या मित्र/नातेवाईकांकडे संध्याकाळी उशीरा जाणारे माझे होस्टेलवर रहाणारे मित्र आठवले. "...बघ, XXXचे मुळ शेअर्स घ्यायला दहा हजार पण नाही लागले, आत्ता मार्केट व्हॅल्यु कैकपट आहे, पुर्वी माझ्या एकट्याच्या नावे होते, आता डि-मॅटची सोय झाल्याने तेच शेअर्स तिघांच्या नावे केले. तेवढीच एखाद्-दुसरी गिफ्ट एक्स्ट्रॉ. उगीच सोडा कशाला?? नाही का..” म्हणुन ते गडगडाटी हसले. काकांच्या या उद्गारांतुन मला मात्र शेअरबाजारांतील गुंतवणुकीचा एक नवा धडा मिळत होता. एक मात्र आहे,कोणत्या कंपनीची AGM पुण्यांत होते आणि कोणाच्या 'पाहुणचाराचा' दर्जा किती आहे याचा या काकांचा अभ्यास जबरदस्तच होता.. पुढे काही दिवसांनी सुदर्शन कंपनीतील माझे एक वरिष्ठ सहकारी माझ्याकडे आले, त्यांना TELCO मध्ये एक F.D.करावयाची होती. फोर्मवरील 'शेअरहोल्डर्सना अर्धा टक्का जास्त व्याज' ही ओळ पहाताच माझ्या मनांत श्री. काकांचे मौलिक विचार विजेसारखे चमकुन गेले.. 'सर, आपण दोन/तीन दिवसांनी करुयात F.D...." मी म्हणालो. "आधी 02 शेअर्स विकत घेवुन शेअरहोल्डर बनु... दोन शेअर घ्यायला जेमतेम 250 रुपये लागतील, जे ही फुकट जाणार नाहीतच मात्र त्यामुळे आपल्याला पुर्ण डिपॉझिटवर दरवर्षी अर्धा टक्का जास्त व्याज मिळेल.." आयडियेच्या ह्या कल्पनेने माझ्यातला आर्थिक सल्लागार आणि सरांमधला एक गणिती..दोघेही खुष झालो.. 'एखादी गोष्ट दोनदा घड्ली ..की ती वारवार घडते Everything that happens once may never happen again. But everything that happens twice will surely happen a third time " असा काहीसा एक सिद्धांत आहे म्हणे, खरे खोटे देवास ठावुक.. पण मला त्याचा प्रत्यय आला. काही कारणाने माझ्या ओळखीच्या एका समव्यवसायी गुजराथी मित्राला भेटायला चर्चगेट्ला गेलो असता पठ्ठ्या 'ताज' मध्ये नाश्ता करावयास गेला आहे असा गौप्यस्फोट त्याने फोनवरुन केला.....त्या काळी अगदी सचिन तेंडुलकरनेही असे करणे धाडसाचे झाले असते तिथे 'ह्याची' काय कथा??.. सहाजिकच मी चक्रावुन गेलो. पुढे अलिबाबाच्या गोष्टीतील कासिमच्या पत्नीला जसे 'भानगड काय आहे?' हे कळल्याशिवाय रहावले नव्हते तसेच माझे झाल्याने मी तो भेटल्यावर हळुच विषय काढला तेंव्हा खुलासा झाला.. "अरे यार, ये इंडियन हॉटेल वाले शेअरहोल्डर्स को 30% डिस्काउंट वाली कुपने देते है....एक बडा 'बकरा' मिला था..सोचा..थोडा ईंप्रेस कर दुं.." थंडपणे तो म्हणाला. ईकडे मी मात्र ‘ह्या ताजचे मालक असलेल्या इंडियन हॉटेलवाल्यांची AGM कुठे होत असेल बरे??' या विचाराने श्री.काका झालो होतो. दरम्यानच्या काळांत रिलायन्स, अरविंद मिल्स, मफतलाल, रेमंड्स सारख्या कंपन्या त्यांच्या शेअरहोल्डर्सना कंपनी शोरुममधुन खरेदीसाठी 15/20% भरघोस सवलत देतात हे मला पहावयास मिळाले. मला मिळालेली अशी कुपन्स मी कोणा ईच्छुकांस आवर्जुन देत असे आणि ‘नाखुन काट के शहिद होना’’ असा काहीसा वाकप्रचार हिंदीत आहे, त्याचा प्रत्यय घेत असे. ‘हॉकिन्स कुकर्स’ हे आणखी एक नाव मला येथे जोडावे लागेल. ही कंपनीही भागधारकांना तिच्या उत्पादनांवर 20% सवलत देते ज्याचा वापर करुन मी आमच्या संसारातील पहिला फ्युचुरा नॉनस्टीक संच घेतला. अनेक जगप्रसिद्ध महिलांप्रमाणेच माझ्या कन्येला सतत नवनवीन चप्पल्स,सॅंडल्स वापरायचा सोस आहे. मुलीचे पाय चप्पलांत (तेही निरनिराळ्या) दिसल्याने त्रस्त होतात्सा तिच्या एका वाढ्दिवशी गुरुवर्य श्री. काकांचे आदरपुर्वक स्मरण करुन मी तिच्या व माझ्या डि-मॅट खात्यांत 'बाटा' कंपनीचे दोन दोन शेअर्स घेतले. पाच एक वर्षे झाली असावीत, मला आठवते मला 310 च्या भावाने साधारण 1250 रु.चे आसपास गुंतवणुक झाली. हे 'बाटा'वाले प्रत्येक शेअरहोल्डरला 20% सवलतीची 02 कुपन्स देत असल्याने चप्पल्स पर्सेस ई. 'अत्यावश्यक'(?) खरेदीपोटी मला दरवर्षी किमान 600/700 रुपये डिस्काउंट मिळतो. कंपनी दरवर्षी 60/65% लाभांश देते, आणि शेअरचा भाव वाढतो ते निराळेच (आजचा भाव रु. 525). शेअर्स का घ्यावे आणि शेअर्सच का घ्यावे अशी भुमिका नेहमीच अहममिकेने मांडणारा मी आज ह्या अशा ‘ऑफ-बीट’ गोष्टींकरता वेळ का दवडतोय असे अनेकांना वाटल्याशिवाय रहाणार नाही. पण एकापेक्षा एक क्लिष्ट कायदे, चक्करदार वाजवुन दर्दी लोकांच्या टाळ्या घेणारे उस्तादही जसे नवीन, शिकावु प्रेक्षकांसाठी तबल्यावर रेल्वेचा, पाउसाचा आवाज काढणे असे सोप्पे प्रकार करतात (आणि त्यात गैर काहीही नाही असे मी मानतो)… तसेच काहीसे हे आहे. अर्थात उत्तम, ब्ल्यु-चीप शेअर्स मधील दीर्घकालीन गुंतवणुकीची भुमिका केवळ कुपने वा एखादे उत्तम जेवण वा गिफ्ट मिळविण्यापुरती मर्यादित ठेवणे म्हणजे घरांतील असलेल्या ऐतिहासिक तलवारीचा उपयोग कांदे बटाटे भाजी चिरण्यासाठी करण्यासारखे वा दारी असलेल्या कल्पवृक्षापासुन फुकट पाने मिळतात त्यातुन पत्रावळींचा व्यवसाय करण्यासारखे आहे, अगदीच हल्लीच्या भाषेत A.T.M.चा वापर आतील A.C ची थंड हवा अनुभवण्यासाठी करण्यासारखे आहे असे माझे मत आहेच. आणि हो..महत्वाचे. अशा गिफ्ट/डिस्काउंट कुपन्स देणारी कोणतीही कंपनी म्हणजे अगदी डोळे झाकुन खरेदी करावी अशी उत्तम कंपनी, असे मला बिलकुलच सुचवायचे नाही. किंबहुना बाजारांतील भविष्यकाळांतील भाव वा लाभांश अशा गोष्टींप्रमाणेच ही कुपन्स वा गिफ्ट्स मिळतील याची कोणतीही हमी नसते बरं का. उलट खरेतर हल्ली कंपनी कायद्यान्वये कंपनीच्या वार्षिक वा कोणत्याही सभेत थेट भेटवस्तु वाटण्यावर निर्बंध आहेत. मात्र सवलतीची कुपन्स देण्यावर अथवा सभेस उपस्थित सभासदांचे आदरातिथ्थ्य करण्यावर मात्र असे निर्बंध नाहीत. तर मंडळी, हे सारे, या लेखाचे, सव्यापसव्य करण्याचे कारण, म्हणजे कालच वाचलेली एक बातमी. जर्मनीतील प्रख्यात Daimler AG या, जगांतील लक्झरी कार बनविणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या कंपनीच्या नुकत्याच संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत(AGM) दोन शेअरहोल्डर्समध्ये चक्क बाचाबाची झाली ज्यात कंपनी व्यवस्थापनाला मध्यस्थी करुन दिलगिरी व्यक्त करावी लागली. ….निमित्त होते सभेनंतरच्या Buffet मध्ये कमी पडलेल्या खाद्यपदार्थांचे. जर्मनीत म्हणे अशा सभांनंतर भरगच्च मेनु असलेला ‘अल्पोपहार’ ठेवण्याचा प्रघात आहे, ज्याचा हजारो शेअर होल्डर्स फन्ना उडवतात…येथे sausage चे पाउचेस कमी पडण्याच्या शक्यतेने हा अनावस्था प्रसंग ओढवला.. शेवटी घरोघरी मातीच्याच चुली..दुसरे काय. – प्रसाद भागवत

Book traversal links for शेअरबाजार : 'डिस्काऊण्ट...पहावा मिळवुन' !!!

  • ‹ शेअर बाजार – काही IPO कथा
  • Up
  • शेअरबाजार: 'Brexit'....बेगाने डायव्होर्स से अब्दुल्ला परेशान ?? ›

प्रतिक्रिया द्या
31802 वाचन

💬 प्रतिसाद (85)
प
प्रसाद भागवत गुरुवार, 04/21/2016 - 06:47 नवीन
समजा, तुम्ही एका मिट्ट अंधार असलेल्या खोलीत गेला जेथे एक उदबत्ती, समई, मेणबत्ती कंदील, माचिस आणि पेट्रोमॅक्स ठेवले आहे तर तुम्ही सर्वात आधी काय पेटवाल??... आपल्या लहानपणी मुलांना हे कोडे घातले जात असे, आपण सर्वच आता मोठे झालो असल्याने कोड्याचे उत्तर सांगण्यांत मी वेळ घालवत नाही.... आता मला सांगा..जर मान्सून चांगला झाला तर सामान्यतः शेअर बाजार तेजीत येतो..कारण चांगला मान्सुन म्हणजे चांगली शेती, मुबलक पीकपाणी.. याने ग्रामिण विभागांतील उपभोक्त्यांची क्रयशक्ती (purchasing power) वाढते ज्यामुळे ऑटॉ/FMCG क्षेत्राला मोठा फायदा होतो आणि गाड्या, टीव्ही, फ्रिज, ए.सी यांच्यासारख्या चैनीच्या वस्तुंची विक्री वाढते. हे जर खरे आहे, तर मग आपण कोणते शेअर्स घ्यावे ?? माझ तर्क असा की ज्याप्रमाणे कोणताही दिवा पेटवायला पुर्वी माचिस लागत असे, तसे कोणतेही उपकरण चालवायला आधी वीज हवी आणि गाडी चालवायला टायर्स (पेट्रोल हा उत्पादन आपल्याकडे होत नसल्याने वेगळा विषय आहे)... म्हणुनच पोवर ग्रीड, ॲप्कोटेक्स यांच्यासारखे शेअर्स या आधुनिक कोड्याचे उत्तर असु शकते.... तुम्हाला काय वाटते?? -प्रसाद भागवत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
स
सुबोध खरे गुरुवार, 04/21/2016 - 07:08 नवीन
यात एक खोच आहे. सध्या भारतात अतिरिक्त उर्जा/ वीज उपलब्ध आहे त्यामुळे जोवर औद्योगिक उत्पादन तितके वाढत नाही तोवर या उद्योगाला तितकी चालना मिळणार नाही. http://articles.economictimes.indiatimes.com/2015-08-26/news/65886756_1_power-generation-capacity-power-utilities-indian-energy-exchange तसेच पेट्रोलीयमचे भाव कमी असल्याने जगात इतर ठिकाणी मंदी आहे त्यामुळे तेथे असलेल्या टायर उत्पादकांच्या अतिरिक्त क्षमतेमुळे आयात टायर स्वस्त झाले आहेत. टायर उत्पादकांनी सरकारला मागच्या वर्षीच आयात टायर वर २० % आयात करा लावण्याची विनंती केली होती. परंतु अजून तसे झालेलं नाही. आयात कर १० % होता. उरलेला १० टक्के हा नफ्याचा एक मोठा हिस्सा आहे त्यामुळे भारतीय टायर उत्पादक आजही खूप मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकतील असे वाटत नाही. http://auto.economictimes.indiatimes.com/news/tyres/increase-duty-on-finished-tyres-from-7-to-20-says-arun-k-bajoria-jk-tyres/47153870 http://www.business-standard.com/article/economy-policy/atma-urges-govt-to-raise-import-duty-on-tyre-to-20-115020300738_1.html तेंव्हा या क्षेत्रात गुंतवणूक करताना त्यातील वेचक समभागात गुंतवणूक करावी असेच मी सुचवेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत
प
प्रसाद भागवत गुरुवार, 04/21/2016 - 07:19 नवीन
डॉक्टर्साहेब, आपण म्हणता त्या पलिकडेही जाणारी गणिते बाजारांत मांडली जातात त्यामुळे आपल्या दुव्यांवरही खुप विसंबुन रहाता येणार नाही, पण तरीही '... त्यातील वेचक समभागात गुंतवणूक करावी या मताशी मी सहमत आहे. ...तसेही माझ्या ह्या प्रतिक्रियेचा उद्देश कोणतीही टीप देणे हा नसुन गुंतवणुकदारांचा तर्क विकसित करणे एवढ्यापुरताच मर्यादित आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 04/21/2016 - 08:36 नवीन
भागवत साहेब दुवांवर विसंबून राहता येणार नाहीहे खरे असले तरीही दोन्ही दुवे बाजाराशी निगडीत अशा "महत्त्वाच्या वृत्तपत्रांचे" आहेत. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे माझी स्वतःची या क्षेत्रातील गुंतवणूक आज अडकून पडलेली आहे. भारताची अर्थव्यवस्थेच्या प्रगतीची अशा दाखवून पायाभूत सुविधात मोठी गुंतवणूक करा अशा घोषणा २००९-१० मध्ये यू पी ए सरकारने केल्या होत्या त्या वर विश्वास ठेवून गुंतवलेला पैसा आजही तेथेच अडकून आहे. मुद्दल सुटले तरी नशीब अशी परिस्थिती इतरांची होऊ नये या हेतूने मी वरील माहिती लिहिली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत
प
प्रसाद भागवत गुरुवार, 04/21/2016 - 12:05 नवीन
कालचीच अगदी ताजी गोष्ट सांगतो... जगांतील सर्वांत मोठ्या ईन्व्हेस्ट्मेंट्स व बॅंकिंग कंपन्यांपैकी एक समजल्या जाणार्या गोल्ड्मन सॅच्झ या कंपनीचे तिमाही निकाल लागले आणि हे निकाल गेल्या 12 वर्षांच्या काळातील सर्वाधिक विदारक तिमाही निकाल होते. उदा. त्यांच्या equity securities business' या काही शे कोटी डॉल्रर्स नफा मिळविणात्या शाखेची कमाई 'शुन्य' होती. 'Investing & Lending या शाखेचा महसुल 95% घटला... investment-banking या विभागांत 23%, financial advisory या विभागांत 20%, underwriting धंद्यांत 27% घट नोंदविली गेली. दिवसाच्या सुरवातीस ही नफ्याची आकडेवारी जाहिर झाली आणि मग दिवसाअखेर.... गोल्ड्मन सॅच्झचा शेअर जानेवारीनंतरच्या आपल्या सर्वाधिक पातळीवर 2.28% वर बंद झाला. बाजार बातम्या,आकडेवारी, विष्लेषकांची मते या पलिकडे जावुन वागतो असे मी म्हणतो ते हेच..- प्रसाद भागवत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
भ
भंकस बाबा गुरुवार, 04/21/2016 - 15:11 नवीन
आपण या क्षेत्रातिल चांगलेच जाणकार आहात. मुख्य म्हणजे तुमचा व्यवहार या क्षेत्रात होत असतो. त्यामुळे तुमच्या मताला एक वेगळीच किमंत प्राप्त होते. तुमच्या गोल्डमैन सैशच्या निरीक्षणा बद्दल, मला यात काहीच आश्चर्यकारक वाटत नाही आहे. जो नफा नाही झाला आहे त्यासाठी मार्केट आधीच तयार होते असे दिसते. शेयर मार्केट नेहमी पुढचा विचार करते. म्हणजे जसे सामान्य गुंतवणूकदार कंपनीचा रिजल्ट तपासतो तसे मार्केट कधीच करत नाही. कंपनी पुढे भविष्यात काय करणार आहे याचा आढावा मार्केट घेते. गोल्डमैन्सचा भूतकाल घाबरवणारा असला तरी भविष्य आश्वासक वाटत आहे असा आढावा त्यातून निघत असेल. आता मार्केट वर जात असून देखिल सुस्तावलेल्या सरकारी कंपन्या कदाचित् सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदीमुळे धास्तावल्या असतील पण नंतर त्या पण या रैलीत सहभागी होणारच आहेत. रच्याकने हे माझे वैयक्तिक मत आहे, त्यामुळे गंभीरपणे घेऊ नये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत
प
प्रसाद भागवत गुरुवार, 04/21/2016 - 19:44 नवीन
बाबाश्री, '... आपण या क्षेत्रातिल चांगलेच जाणकार आहात' हे सुरवातीचे वाक्य वगळता आपल्या आशयाशी सहमत आहे..धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
प
प्रसाद भागवत गुरुवार, 04/21/2016 - 12:08 नवीन
कालचीच अगदी ताजी गोष्ट सांगतो... जगांतील सर्वांत मोठ्या ईन्व्हेस्ट्मेंट्स व बॅंकिंग कंपन्यांपैकी एक समजल्या जाणार्या गोल्ड्मन सॅच्झ या कंपनीचे तिमाही निकाल लागले आणि हे निकाल गेल्या 12 वर्षांच्या काळातील सर्वाधिक विदारक तिमाही निकाल होते. उदा. त्यांच्या equity securities business' या काही शे कोटी डॉल्रर्स नफा मिळविणात्या शाखेची कमाई 'शुन्य' होती. 'Investing & Lending या शाखेचा महसुल 95% घटला... investment-banking या विभागांत 23%, financial advisory या विभागांत 20%, underwriting धंद्यांत 27% घट नोंदविली गेली. दिवसाच्या सुरवातीस ही नफ्याची आकडेवारी जाहिर झाली आणि मग दिवसाअखेर.... गोल्ड्मन सॅच्झचा शेअर जानेवारीनंतरच्या आपल्या सर्वाधिक पातळीवर 2.28% वर बंद झाला. बाजार बातम्या,आकडेवारी, विष्लेषकांची मते या पलिकडे जावुन वागतो असे मी म्हणतो ते हेच..- प्रसाद भागवत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रसाद भागवत गुरुवार, 10/06/2016 - 12:38 नवीन
मी एप्रिलमधे मान्सुन्चा बाजारावरील परिणाम या विषयी केलेल्या पोस्ट्मधे टायर्स कंपन्याचे शेअर्स घेणेसंबंधी सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती.. तेंहा त्यावर येथे नेहमीप्र्माणे साधक/बाधक चर्चाही झाली. सांगावयाचे हे की गेल्या ४/५ महिन्यांत जवळ जवळ सर्व प्रमुख टाय्र्स कंपन्यांनी ३०% पेक्षा अधिक परतावा दिला आहे..मी कालच माझ्याजवळील ६०% शेअर्स विकुन माझे मुद्दल जवळ्पास परत मिळवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
स्नेधा Sun, 04/10/2016 - 20:29 नवीन
लिंक दिल्याबद्दल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Mon, 04/11/2016 - 18:58 नवीन
उत्तम लेख आणि माहितीपूर्ण प्रतिसाद, धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
विवेक्पूजा Tue, 04/12/2016 - 13:15 नवीन
उत्तम लेख. धन्यवाद साहेब.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत Wed, 04/20/2016 - 17:18 नवीन
माझ्या सततच्या शेअरबाजाराशी संबंधीत (बोअरिंग??) पोस्ट्स वाचुन कंटाळलेल्यांसाठी हा खास वेगळा पोस्ट..... बॅकेत करावयाच्या गुंतवणुकीविषयी. IDBI बॅंकेने आवर्ती स्वरुपाचे (Perpetual) बॉड्स विक्रीला आणले आहेत. हे विकत घेणाऱ्या बॉड्धारकास प्रतिवर्षी 10.75% दराने वार्षिक स्वरुपात 'परतावा' (व्याज नव्हे) मिळेल...एका बॉड्ची किंमत १० लाख रुपये आहे. व्याज देणे हे कोणत्याही स्थितीत बंधनकारक असते, मात्र 'परतावा' हा बॅकेला होणार्या नफ्यावर अवलंबुन असतो व बेंकेस तोटा झाल्यास बॅंकवर तो देणे सक्तीचे नाही हा महत्वाचा फरक येथे लक्षांत ठेवावयास हवा. (त्याच वेळी IDBI बॅंक ही एक सरकारी बेंक असुन भारत सरकार व L.I.C यांचा हिस्सा 88% पेक्षा अधिक आहे ही गोष्ट निर्णायक ठरु शकते.) सदर बोंडस हे केवळ डी-मॅट प्रकारातच मिळणार असुन बॉड्धारक ऑनलाईन पद्धतीने ते केंव्हाही विकु शकतील, उलट बॅकेस मात्र किमान 10 वर्षे ह्यांची परतफेड करता येणार नाही ही ही गुंतवणुकदारांच्या दृष्टिने फायदेशीर बाब आहे. दिवसेंदिवस कमी होत जाणाऱ्या व्याजदरांच्या काळात किमान 10 वर्षे प्रतिवर्षी 10.75% दराने 'परतावा' मिळण्याची संधी यातुन मिळणार आहे.. थोडक्यांत दीर्घ काळाकरिता प्रचलित व्याजदरापेक्षा अधिक परतावा आश्वसित करणारी एका राष्ट्रीयकृत बेंकेकडुन सादर झालेली, आणि म्हणुनच 'कमी' जोखमीची अशी ही योजना आहे. योजना खुपच छोटी आणि मर्यादित काळाकरिताच आहे. आपणा कोणास या योजनेंत रस असल्यास साधक बाधक चर्चेकरिता व अन्य मदतीकरिता अवश्य संपर्क करा..
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 04/20/2016 - 19:39 नवीन
एक बॉण्ड जर दहा लाखांचा असेल तर लहान गुंतवणूकदारांना यात गुंतवणूक करणे अवघडच जाईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत
प
प्रसाद भागवत गुरुवार, 04/21/2016 - 05:53 नवीन
येस बॉस. सहमत. पण हे असेच आहे..काय करणार ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
क
काळा पहाड गुरुवार, 04/21/2016 - 14:02 नवीन
रिस्क रिटर्न्स पहाता ही योजना अजिबात व्यवहार्य नाही असे मला वाटते. आयडीबीआय बँकेने मल्या ला तब्बल ९५० कोटी रुपये कर्ज दिलेले आहे. आणि त्यांना २०१८ पर्यंत बॅसेल कंप्लायंट व्हायचे आहे. या दोन्ही गोष्टी साठी (राईट ऑफ आणि कंप्लायन्स) पैसा लागणार आहे. हा पैसा बुडीत खाती आहे. म्हणजे हा पैसा बँकेच्या फायद्यासाठी वापरला जाणार नाही. परपेच्युअल बाँड हा एक प्रकारे इक्विटीच असतो. त्यामुळे त्यांच्यावर डिव्हीडंड देण्याचं बंधन नाही. जास्तीत जास्त रिटर्न्स १०.७५%. कमीत कमी ०%. जितका पैसा लावावा लागतो तो पहाता (आणि बँकेची सध्याची स्थिती पहाता) बँक किती पैसे उभे करू शकेल याबद्दल शंका वाटते. हा पूर्वीचा अनुभवः Perpetual bonds fail to woo investors: http://www.business-standard.com/article/finance/perpetual-bonds-fail-to-woo-investors-115042500484_1.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत
प
प्रसाद भागवत गुरुवार, 04/21/2016 - 15:01 नवीन
पहाड्साहेब,होय.आपण व्यक्त केलेल्या शंका ह्या योग्य आहेत आणि असा अभ्यास वा विचार हा प्रत्येकानेच करावयास हवा. मी ही माझ्या प्रतिक्रियेत हे व्याज नाही असे स्पष्टच सांगितले आहे, यात 'कमी' जोखीम आहे असेच निरिक्षण नोंदविले आहे.. आपण म्ह्णता ते सर्व घटक विचारंत घेवुनही या ईश्शुला क्रिसिलने 'A' (म्ह्णजे समाधानकारक) पतदर्जा दिला आहे. बॅंकेकडे ५००० कोटींचा रेवेन्यु रिझर्व्ह आहे, सरकारचा बॅंकेला भक्कम पाठिंबा आहे आणि एकुणातच स्थिती नियंत्रणाच्या पलिकडे आहे असे दिसत नाही. बाकी मल्य्या हा खरेतर बॅकापेक्षा मिडियाच्या चरितार्थाचा विषय अधिक बनला अहे. या प्रकारच्या बॉड्स घेण्यामागे दुसरी व्यहरचना म्ह्णजे सतत खाली येणारा Gsec yield पहाता योग्य वेळी भांडवली नफा पदरांत पाडणे..मान्सुन्च्या बहुप्रतिकक्षीत आगमनानंतर आक्रमकपणे वा सतत दोन तीनदा व्याजदर कपात झाल्यास अशी संधी मिळु शकेल.. अर्थात ही माझी भुमिका झाली जी मी अभ्यासाच्या दृष्टिकोनांतुन मांडली आहे. ही हे बॉडस विकत घेण्याची शिफारस समजु नये अथवा हा व्यवहार फायदेशीर होईलच याची हमीही मानु नये हे ओघाने आलेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
स
सुबोध खरे गुरुवार, 04/21/2016 - 15:11 नवीन
सरकारचा बॅंकेला भक्कम पाठिंबा आहे आणि एकुणातच स्थिती नियंत्रणाच्या पलिकडे आहे असे दिसत नाही The government currently owns 76.5% of IDBI Bank. IDBI Bank is governed by the IDBI Act and the government can lower its stake without having to approach Parliament. That's in contrast with the position at other state-run banks, where the government has committed to retain a 52% holding at least. याचा अर्थ या बँकेचे सरकारी भाग भांडवल ५० % च्याही खाली येऊ शकते आणी बँकेचे नियंत्रण खाजगी आस्थापनाच्या हातात जाऊ शकते.अशा स्थितीत हे रोखे "बुडीत" जाऊ शकतात किंवा मुदतपूर्व निकाली निघू शकतात किंवा म्हणाले आहेत तितका नफाही देऊ शकतात. थोडक्यात हे रोखे इतर सरकारी रोख्यान्सारखे सुरक्षित आहेत असे म्हणता येत नाही. पहा IDBI bank may be merged with private lender
  • Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत गुरुवार, 04/21/2016 - 19:42 नवीन
डॉक्टर साहेब, शेकड्यानी कायद्यांचे प्राबल्य असलेल्या या देशात त्यातील प्रत्येकाची अंमलबजावणी होईल अशा अंदाजाने वागलेच पाहिजे असे नाही, अशा कुठल्याश्या कायद्यातील एखाद्या कलमाकडॅ बोट दाखविताना आणि त्याची संभाव्यता, वास्तविकता महत्वाची. सध्याची स्थिती अशी आहे की मध्यंतरी या बॅकेत सरकारने 2229 कोटी रुपयाचा भांडवल पुनर्भरणा केला जो देशांतील SBI व BOI वगळता तिसर्या क्रमांकाचा अहे. सरकारी पाठबळ आहे असे मी म्ह्णतो त्याचा अर्थ हा आहे. तेंव्हा भविष्यात काय होईल ते होवो, आज तरी सरकारचा मनोदय या बॅकेची भांडवल पर्याप्तता वाढविणे, तिचे भाडवल उभारणे हीच आहे. आणि पुढे जावुन महत्वाचे म्हणजे खासगीकरणाची शक्यता मानलीही तरी ६५ लाख खातेदार असलेल्या बॅकेचे हस्तांतरण एखाद्या कमकुवत वा बुडित खाती जावु शकणार्या बॅकेकडॅ सरकार करेल हा आणखी एक अतिश्योक्तीपुर्ण निराशावाद आहे. खरेतर खासगीकरण झालेच तर उत्तम अशी स्थिती आहे, युनिट ट्रस्ट बद्दल आपण ते अनुभवतोच आहोत.. बाकी हे रोखे सरकारी रोख्यांईतके सुरक्षित नाहीत असा निष्कर्ष काढणे यात नविन ते काय ?? यातील धोक्यांची चर्चा आधी झालीच आहे की...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ज
ज्ञानव Sun, 07/17/2016 - 07:55 नवीन
आठवण अशी कि युनाटेड वेस्टर्न बँक रातोरात(खरे तर दुपारी दुपारी ३.३० नंतर) बुडाली आणि त्याच्या भाव १२ रुपयापर्यंत आला मी ५००० शेअर्स घेतले डीलरने वेड्यात काढले भाव १० रुपयांच्या खाली गेला मी आणखीन ५००० शेअर्स घेतले डीलर म्हणाला "क्यो गुप्त दान कर राहे हो यार मेरा पैसा इसमे अटका है मेरेको हि देदो वैसेभी डूबा हि रहे हो " २००६ची गोष्ट असावी. ७० करोड नेट वर्थ (आणि माझे खाते असलेली उत्तम स्टाफ असलेली माझी जिव्हाळ्याची बँक )असलेली बँक बुडली हे खरेच वाटेना काही दिवसात म्हणजे अगदी थोड्या दिवसात आय डी बी आय ने ती बँक विकत घेण्याचे ठरले त्या पोटी तिला १५० करोड युनाटेड वेस्टर्न ला देणे बंधन कारक आहे हेहि छापून आले आणि भाव ३२ रुपये झाला. आता हा सट्टा आहे कि ट्रेडिंग ते ज्याने त्याने पाहावे पण मी आणि माझे काही निवडक क्लायंट अक्षरशः मालामाल झालो होतो. हे आपले सहज आठवले म्हणून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत
श
शाम भागवत Sun, 07/17/2016 - 19:11 नवीन
त्यादिवशी तो शेअर ७ पर्यंत खाली आला होता व १४ ला बंद झाला होता. खरेच चांगली बँक होती ती. कर्मचारीपण चांगले होते. सुंदर सेवा. "आपुलकीने वागणारी" ही निव्वळ जाहीरातीची टॅग लाईन नव्हती तर ते वास्तव होते. हम्म. जाऊदे. न बोलणेच बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव
स
स्वीट टॉकर Mon, 05/09/2016 - 08:38 नवीन
मी संपूर्‍णपणे म्यूचुअल फंडांच्या स्टेपल डायटवर असूनही तुमचे लेख वाचायला मजा येते. माहिती तर भरपूर असतेच, लिहिता ही खुसखुशीत.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत Mon, 05/09/2016 - 09:33 नवीन
धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वीट टॉकर
व
वेदांत Tue, 05/31/2016 - 09:18 नवीन
कॅस्ट्रॉल (ई) बद्द्ल काय मत आहे ?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत Tue, 05/31/2016 - 09:34 नवीन
सर्वाधिक वेळा बोनस देणारी आनि शेअरहोल्डर्सचे भले करणारी ही एक अतियय उत्तम कंपनी आहे यात वादच नाही. पण बाजारात नेहमीच आवडी निवडी बदलतात, जुनी साम्राज्ये खालसा होतात, नवनवीन नायक उदयास येतात. येथे ही तसेच आहे. माझा या कंपनीविष्यीचा अभ्यास नाही पण तरीही BP, Shell सारख्या कंपन्यांचे परफोर्मन्स पहाता येथे निकटच्या काळात खुप काही सकारात्म्क घडेल अशी आशा करणे चुकीचे ठरेल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदांत
व
वेदांत Tue, 05/31/2016 - 10:26 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
वेदांत Fri, 07/15/2016 - 07:48 नवीन
टायटन ने दिड महिन्यात २०% रीटर्न दिलाय..
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 07/18/2016 - 07:47 नवीन
एक शंका...कदाचीत धाग्याच्या विषयानुरुप नसेल समजा मी अ कंपनीचे १० शेअर्स रु.१० प्रत्येकी या हिशोबाने घेतले तर माझी गुंतवणूक = रु.१०० समजा ६ महिन्यांनी शेअर्सची किंमत प्रत्येकी रु.२० झाली आणि त्यावेळेस मी ५ शेअर्स विकले, तर माझे रु.१०० मुद्दल मला परत मिळेल...उरलेले ५ शेअर्स मी तसेच ठेवले...या केसमध्ये मला इंन्कम टॅक्स लागेल का? माझा फायदा/तोटा रु.० आहे
  • Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत Mon, 07/18/2016 - 09:28 नवीन
लागेल..05 शेअर्सची एकुण ( विक्री -खरेदी) =नफा.. ज्यावर कर द्यायला लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 07/18/2016 - 09:43 नवीन
अच्छा...धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत
श
शाम भागवत Mon, 07/18/2016 - 12:07 नवीन
खरेदी व मग विक्री यामधे १ वर्ष अथवा जास्त अंतर असेल तर कर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सिरुसेरि Mon, 07/18/2016 - 08:10 नवीन
Sovereign Gold Bond Scheme कितपत फायदेशीर आहे ? त्यामध्ये लॉक इन पिरीयड आहे का ?
  • Log in or register to post comments
व
वेदांत Mon, 07/18/2016 - 08:16 नवीन
http://www.relakhs.com/sovereign-gold-bonds-scheme-july-2016/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
प
प्रसाद भागवत Mon, 07/18/2016 - 09:34 नवीन
व्यक्तीशः मी या योजनेत काही तशीच खास परिस्थिती असल्याशिवाय गुंतवणुक करावी या मताचा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
प
प्रसाद भागवत Fri, 07/21/2017 - 14:11 नवीन
Y'day Wipro announced a share buyback of Rs 11,000 crore entailing 34.3 crore equity shares at *Rs 320* apiece We would be buying wipro worth less than 2.00L for a buyback. We think, there is a very good chance of a decent % of buyback. Will prefer to buy around 280 to retain a good return.... At Rs. 280, the returns would be approx 14%, in 3 months. *Importantly*,though I feel this a a very calculated move having a good favorable risk/reward ratio, anything mentioned in this post shouldn't be taken as *any kind of guarantee* further, any such profit would attract short term capital gains . Careful, if you own only recently issued bonus shares as they will be taxed heavily. - prasad Bhagwat
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा