शब्द
शब्द , नीट वापरले तर सुख
नाहीतर दुःखाचे मूळ
नीट वापरले तर शहाणपण
नाहीतर नुसतेच खुळ
शब्द , नीट वापरले तर आनंद
अन् चेहऱ्यावर येणारे हसू
नाहीतर सारी दारं बंद
अन् नुसतेच वाहणारे आसू
शब्द , नीट वापरले तर
दोन मनातील दुवा
नाहीतर तोंडातून वाहणारी
नुसतीच कोरडी हवा
शब्द , एक असे औषध
जे जोडतं मन
नाहीतर तेच तोडण्याचं
एकमेव साधन
- अभिषेक पांचाळ
💬 प्रतिसाद
(3)
प
प्रचेतस
Sat, 04/09/2016 - 06:16
नवीन
तुमची काव्य लै भारी असतात.
यमक जुळलेले असते अगदी.
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Sat, 04/09/2016 - 07:51
नवीन
:)
- Log in or register to post comments
अ
अभिषेक पांचाळ
Sat, 04/09/2016 - 06:30
नवीन
वाचल्याबद्दल Thanx प्रचेतस
- Log in or register to post comments