Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठी भावानुवादः फर्ज़ करो - इब्ने इंशा

त — तर्राट जोकर, Sat, 04/09/2016 - 13:10
आज थोडा वेगळा प्रयत्न करुन पाहिला. बघू कसा वाटतो ते... :-)
म्हटलं तर...
म्हटलं तर मी एक प्रियकर हाय, म्हटलं तर येडपट हाय म्हटलं तर ह्या दोन्ही गोष्टी खोट्या हायेत, वटवट हाय म्हटलं तर हे जीवाचं दुखणं जीव ओतून ऐकवलं हाय म्हटलं तर अजून इतकंच असंल, अर्धं म्या लपवलं हाय म्हटलं तर तुला खुश करायला म्या कारणं रचली हाय म्हटलं तर तुझ्या डोळ्यांमधे अजबच नशा भरली हाय म्हटलं तर हा रोग हाय खोटा, खोटं प्रेम आमचं हाय. म्हटलं तर ह्या प्रेमाच्या रोगात कठिण जगणं आमचं हाय म्हटलं तर हे योग-वियोग आम्ही रचलेलं ढोंग हाय म्हटलं तर फक्त एवढंच खरं बाकी सगळं सोंग हाय __________________________________________
मूळ काव्य
.
फ़र्ज़ करो : कवी -इब्ने इंशा
फ़र्ज़ करो हम अहले वफ़ा हों, फ़र्ज़ करो दीवाने हों फ़र्ज़ करो ये दोनों बातें झूठी हों अफ़साने हों फ़र्ज़ करो ये जी की बिपता, जी से जोड़ सुनाई हो फ़र्ज़ करो अभी और हो इतनी, आधी हमने छुपाई हो फ़र्ज़ करो तुम्हें ख़ुश करने के ढूंढे हमने बहाने हों फ़र्ज़ करो ये नैन तुम्हारे सचमुच के मयख़ाने हों फ़र्ज़ करो ये रोग हो झूठा, झूठी पीत हमारी हो फ़र्ज़ करो इस पीत के रोग में सांस भी हम पर भारी हो फ़र्ज़ करो ये जोग बिजोग का हमने ढोंग रचाया हो फ़र्ज़ करो बस यही हक़ीक़त बाक़ी सब कुछ माया हो

Book traversal links for मराठी भावानुवादः फर्ज़ करो - इब्ने इंशा

  • ‹ मराठी अनुवादः आज हंसो हंसो जल्दी हंसो - रघुवीर सहाय
  • Up
  • मराठी भावानुवादः मैं चमारों की गली तक ले चलूँगा आपको - अदम गोंडवी ›

प्रतिक्रिया द्या
5262 वाचन

💬 प्रतिसाद (22)
न
नाना स्कॉच Sat, 04/09/2016 - 13:13 नवीन
म्हटलं तर हे जीवाचं दुखणं जीव ओतून ऐकवलं हाय म्हटलं तर अजून इतकंच असंल, अर्धं म्या लपवलं हाय जियो !!!
  • Log in or register to post comments
L
lgodbole Sat, 04/09/2016 - 13:22 नवीन
छान
  • Log in or register to post comments
र
राही Sat, 04/09/2016 - 13:55 नवीन
पण तो प्रियकर शब्द खटकला. तसे नेहमीच त्या शब्दापाशी अडखळायला होते. साध्यासोप्या मराठीत 'प्रेमी' साठी चपखल शब्दच आठवत नाही. जुने वग, लावण्या किंवा अन्य जुन्या शृंगारिक साहित्यात एखादा शब्द सापडेल का? सजण, साजण हेही तितकेसे समर्पक वाटत नाहीत.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Sat, 04/09/2016 - 15:28 नवीन
हो, प्रियकर शब्द मलाही खटकतो. जो प्रेमात धुंद झालेला आहे, ज्याला प्रेयसीशिवाय काहीच सुचत नाही, रुचत नाही त्याला काय म्हणावे हा प्रश्न पडत आलाय. प्रियकर, प्रेयसी हे दोन्ही शब्द त्या अवस्थेला न्याय देत नाहीत असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
अ
अभ्या.. Sat, 04/09/2016 - 15:50 नवीन
आवडले. इनपुट भारीच मिळालाय. . "म्हणायला जीवाचा जिवलग तुझा, म्हणलं तर यडा हाय म्हणायला दोन्ही बी अगदी खोटं, फुकाची बडबड हाय" असे डायरेक्ट फॉर्म्याटानुसार न चालता थोडं गावरान बोलीत मजा येऊ शकेल असे मला वाटते. बाकी कविता प्रकारात आमचे गिन्यान म्हंजे ह्याह्याह्याह्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
र
राही Sat, 04/09/2016 - 16:01 नवीन
'जिवलग' भारी आहे. गावरान बोलीत साजून दिसतो. पण तरीही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
त
तर्राट जोकर Sat, 04/09/2016 - 16:11 नवीन
तुमच्या दोन ओळी खासच. झकास! असाच थोडासा बाज आणायचा होता पण काही वाचकांना गावरान बोली जड जाऊ शकते म्हणुन सोडलं. बाकी जीवलग हा शब्दही तितका परफेक्ट नाही. का ते सांगतो. जीवलग ह्या शब्दात ज्याला जीव लागलाय असा. परत तो प्रियकर ह्या शब्दाचाच दुसरा अर्थ. एकतर्फी प्रेम करणार्‍याला जीवलग म्हणू शकत नाही. मला जो शब्द म्हणायचा आहे त्याचा अर्थ असा आहे की प्रेम करणारा प्रेमी. स्वयंभू प्रेम. जसं मीरा कृष्णावर करत होती. मीरा ही भक्त नाही. प्रेम करणारी आहे पण प्रेयसी नाही. चला शोधुया शोधुया... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Tue, 04/12/2016 - 12:18 नवीन
तीन चार दिवस डोस्क्यातून काय उतरंना राव कविता. आता तड लागल्याशिवाय काय खरं नाही. :( . तसं म्हणाया गेलं तर चार ओळी बिना थांगपत्त्याच्या तसं म्हणाया गेलं तर जखमा फाटल्या काळजाच्या . अवघडे अवघडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 04/12/2016 - 12:26 नवीन
बाब्बौ, अभ्याभौ, तुमच्यासाठी आम्ही ल्हिलेल्या खास दोन वळी: कत्ल कर डालो अब तुम्हारे लब्जों से हमें जमाना कहेगा के वो शायरी सुना रहा था.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Tue, 04/12/2016 - 12:30 नवीन
आह. जिओ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
र
राही Tue, 04/12/2016 - 14:27 नवीन
आता काय म्हणू! "जगा"! मराठीत काय खरं नाही. जिओ कुठे आणि जगा कुठे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
समाधान राऊत Sat, 04/09/2016 - 15:50 नवीन
+१
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 04/12/2016 - 10:17 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 04/12/2016 - 11:42 नवीन
समज, प्रेमाची व्याख्या आहोत, धुंद आम्ही दिवाणे आहोत... समज, हे दोन्ही खरे नसून, वार्यावरची विराणी आहोत... समज, ही सल काळजाची, मनापासून सांगत आहोत... समज, आत खूप काही आहे, अजून अर्ध्यातच आहोत... समज, तुझे हसू टिपण्यासाठीच, खेळ रचत आहोत... समज, तुझ्या डोळ्यातच, आकंठ बुडालेलो आहोत... समज, हे सारं खोट आहे, प्रीतही खोटीच करीत आहोत... समज, ह्या दुखण्यात, श्वासही बळेच घेत आहोत... समज, हे ढोंग आम्ही, जगण्याचं, उगा करीत आहोत... समज, हेच आहे खरं, बाकी माया पेरीत आहोत... Sandy
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Tue, 04/12/2016 - 12:27 नवीन
सँडीभाय, हे पण लय आवडलं. गजब. __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
र
राही Tue, 04/12/2016 - 14:29 नवीन
हेही छानच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
अ
अभ्या.. Tue, 04/12/2016 - 14:51 नवीन
अरे सॅन्डीबाबा, खतराच लिख्या ना. मै देख्याच नई तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
ए
एस Tue, 04/12/2016 - 11:52 नवीन
माशाल्लाह!
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 04/12/2016 - 13:21 नवीन
वा! प्रतिसादातल्या कविताही खास!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Tue, 04/12/2016 - 13:49 नवीन
हे राहिलं होतं वाचायचं. भारीये हे.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Tue, 04/12/2016 - 14:14 नवीन
मस्तं! राहिलं होतं वाचायचं.
  • Log in or register to post comments
स
स्वप्नज Tue, 04/12/2016 - 14:26 नवीन
जियो तजोभाऊ...मस्तच... @ चांदणे संदीप - तुमचीही लाजवाब कविता...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा