Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक प्रामाणिक hypothetical (गृहीतात्मक) प्रश्न

व
वडापाव
Wed, 04/13/2016 - 12:47
🗣 40 प्रतिसाद
एक प्रामाणिक hypothetical (गृहीतात्मक) प्रश्न - वयाचं अठरावं वर्ष ओलांडेपर्यंत जगातल्या सर्व मुलांना 'ईश्वर' या संकल्पनेचा परिचय करून दिलाच नाही, किंवा ऐतिहासिक घटना/समाजजीवन/मानसशास्त्र वगैरे समजावून देण्यासाठी गरजेपुरती तेवढी संकल्पना सांगितली, आणि तोवर केवळ विज्ञाननिष्ठ शिक्षण दिलं, त्याव्यतिरिक्त, धर्माधारित शिक्षणाचा लवलेशही बेकायदेशीर ठरवण्यात आला, अगदी घरगुती पातळीवरही (धरून चालू की अंमलबजावणी काटेकोरपणे होते - याचा अर्थ कुठल्याही धार्मिक विधीमध्ये भाग नाही - बाप्तिस्मा, मुंज आणि तत्सम विधीही नाही), अठरावं वर्ष ओलांडल्यानंतर आपल्याला हवा तो धर्म/पंथ निवडायचा किंवा न निवडायचा अधिकार त्या मुलांकडे राहिला आणि त्यासाठी त्यांनी आपल्या पालकांचं आणि इतर कोणाचंही मार्गदर्शन घेतलेलं चालणार असेल, तर त्या मुलांचा अठराव्या वर्षानंतर एखादा धर्म निवडण्याकडे किंवा देवाच्या हस्तक्षेपी अस्तित्वावर विश्वास ठेवण्याकडे साधारणपणे कल असेल का? आस्तिक-नास्तिकांच्या संख्येत किती वाढ/घट होईल?

प्रतिक्रिया द्या
5426 वाचन

💬 प्रतिसाद (40)
व
विजय पुरोहित Wed, 04/13/2016 - 12:53 नवीन
अशीच परिस्थिती माणसाच्या उत्पत्तीच्या वेळेस होतीच की! तेव्हां संघटीत धर्म, धर्मग्रंथ वगैरे कुठे होते? पण शेवटी निसर्गातील मानवी आकलनापलीकडील असणा-या नैसर्गिक शक्ती, मृत्यू व जन्माचे रहस्य, या गोष्टींच्या स्पष्टिकरणासाठी माणसाला कोणत्यातरी उच्च शक्तीची कल्पना करावीच लागली की?
  • Log in or register to post comments
व
वडापाव Wed, 04/13/2016 - 12:59 नवीन
पण तेव्हा विज्ञानाचीही आजच्या एवढी प्रगती झाली नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित
D
DEADPOOL गुरुवार, 04/14/2016 - 08:00 नवीन
अशीच परिस्थिती माणसाच्या उत्पत्तीच्या वेळेस होतीच की! तेव्हां संघटीत धर्म, धर्मग्रंथ वगैरे कुठे होते? पण शेवटी निसर्गातील मानवी आकलनापलीकडील असणा-या नैसर्गिक शक्ती, मृत्यू व जन्माचे रहस्य, या गोष्टींच्या स्पष्टिकरणासाठी माणसाला कोणत्यातरी उच्च शक्तीची कल्पना करावीच लागली की? +1111111111111111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित
स
स्पा Wed, 04/13/2016 - 12:57 नवीन
तुमच्या मुलाला असे वाढवा आणि आम्हाला सांगा - भजीपाव
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 04/14/2016 - 07:35 नवीन
@तुमच्या मुलाला असे वाढवा आणि आम्हाला सांगा>> Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
म
मराठी कथालेखक Wed, 04/13/2016 - 13:04 नवीन
विज्ञानाची प्रगती झालेली असणं आणि वैज्ञानिक दृष्टीकोन जनमानसात रुजणं यात खूप फरक आहे. त्यामुळे ही गृहीतात्मक परिस्थिती मोठ्या प्रमाणावर अशक्य आहे. अतिशय छोट्या प्रमाणात (म्हणजे एखाद्या कुटूंबात) कदाचित ते साधता येईलही पण त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील, काळजी घ्यावी लागेल , कठोर रहावे लागेल
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Wed, 04/13/2016 - 15:15 नवीन
कारण लोकांना धर्म आणि धार्मिकता यांच्याबद्दल फक्त घरातून समजत नाही, बाहेरुनही समजतं. कित्येक घरांमध्ये गणपती आणला जाण्याचं कारण मुलांच्या मित्रांच्या घरी आणला जातो हे आहे. आणि याचा प्रभाव मुलांवर होऊ द्यायचा नसेल तर समाजाबाहेर जाऊन राहावं लागेल, किंवा स्वतःचा समविचारी लोकांचा समाज निर्माण करावा लागेल. दोन्हीही अव्यापारेषु व्यापार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
त
तर्राट जोकर Wed, 04/13/2016 - 13:05 नवीन
दोन मुद्दे आहेत. आता हायपोथिटिकल म्हटलं तरी ही मांडणी गंडते आहे. अठराव्या वर्षापर्यंत काहीच नाही त्यानंतर धर्म वा देव निवडायचा हे मांडतांना आपण देव किंवा धर्म ह्यांची तुलना दारू, सेक्स, सामाजिक व्यवस्था, एखाद्या भागातली संस्कृती इत्यादींशी करत आहात असे वाटते. दुसरं असं की. असं हायपोथिटिकल उदाहरणापेक्षा माझेच उदाहरण देतो. वयाच्या साधारणतः तेराव्या चौदाव्या वर्षापासून मी देव, चमत्कार, दैवी अनुभव, जादू इत्यादी गोष्टी थोतांड असतात असे मानायला लागलो. असे मानण्यासाठी माझ्यावर कोणतेच संस्कार झाले नाहीत. कोणती पुस्तके वाचली नाहीत, सिनेमे बघितले नाहीत, भाषणे ऐकली नाहीत. उलट घरी, परिसरात प्रचंड देवभोळी लोकं राहत होती. नास्तिक, अज्ञेयवादी अशा कोणत्याही व्यक्तीच्या सहवासात तोवर तरी आलो नव्हतो. जादूटोणा करणारी, मांत्रिक, अंगात येणारी, अघोरी उपचार करणारे, उपासतापास, सणसमारंभ दणक्यात साजरे करणारे असेच लोक अवतीभवती होते. थोडक्यात अवतीभवतीचे लोक प्रचंड आस्तिक होते. तरीही त्यांच्यात मी नास्तिक कसा झालो? वडील आणि मी मंदिरात जायचो पण मी मंदिराच्या बाहेर उभा राहायचो, आईचे उपासतापास, नवस ह्यांना विरोध करायचो. त्यांनी बरेच समजवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या बुद्धीवादी प्रश्नांपुढे त्यांची उत्तरं उघडी पडायची... आता तुम्ही म्हणता तशी सिचुएशन आणली तरी लोक दैववादी होतीलच. देवाचे अस्तित्व मानणे न मानणे ह्याचे कारण बाह्य परिस्थितीत नाही तर माणसाच्या मनाच्या आत आहे
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Wed, 04/13/2016 - 13:27 नवीन
पण मी मंदिराच्या बाहेर उभा राहायचो दिवार मधला बच्चन आठवला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 04/13/2016 - 13:32 नवीन
"आज खुश तो बहोत होगे तुम" असा डॉयलोग मारायची वेळ आली नाही म्हणजे मिळवले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
ग
गॅरी ट्रुमन Wed, 04/13/2016 - 15:09 नवीन
थोडक्यात अवतीभवतीचे लोक प्रचंड आस्तिक होते. तरीही त्यांच्यात मी नास्तिक कसा झालो?
घरचे खूप देवाच्या पूजा वगैरे करणारे (आस्तिक हा शब्द मुद्दामून वापरत नाही) असतील तर मुलांची त्याच्या पूर्णपणे विरूध्द मते होणे आणि घरच्यांचा पूजा वगैरे गोष्टींना विरोध असेल तर मुले पूजा वगैरेंवर विश्वास ठेवणारी होणे हा प्रकार अनेकदा बघायला मिळतो. एक जनरल गोष्ट लिहित आहे. प्रत्येक घरी वेगळी परिस्थिती असेलही. अनेकदा घरचे काही गोष्टींमध्ये मुलांची मते स्वतः डेव्हलप होईपर्यंत थांबत नाहीत आणि स्वतःची मते नकळत लादण्याचा प्रयत्न करतात. अशी कुठचीही गोष्ट लादली जाणे फारसे कोणाला आवडत नाही.त्यामुळे योग्य संधी येताच (मोठे झाल्यावर) या लादण्यावर रिअ‍ॅक्शन म्हणून मुले अनेकदा दुसर्‍या टोकाला जातात. तसे होऊ नये असे वाटत असेल तर मुलांवर कुठलीही गोष्ट न लादता त्यांना स्वतःची मते बनविण्यासाठीच्या प्रक्रीयेतले (म्हणजे विचार कसा करायचा वगैरे गोष्टींचे ट्रेनिंग) फॅसिलिटेटर म्हणूनच पालकांनी राहावे. अन्यथा कुठचीही गोष्ट लादायचा प्रयत्न केल्यास त्याच्या विरूध्द टोकाची प्रतिक्रिया मुलांकडून येणार याची तयारी ठेवावी. सोमनाथ चॅटर्जींचे वडिल निर्मलचंद्र चॅटर्जी हे कट्टर हिंदुत्ववादी नेते होते आणि सोमनाथ चॅटर्जींची मते तर सर्वांनाच माहित आहेत. मला कधीकधी वाटते की सोमनाथ एकदम विरूध्द टोकाला गेले याचे कारण हे पण असू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
व
विजय पुरोहित Wed, 04/13/2016 - 15:11 नवीन
अगदी योग्य विश्लेषण गॅरी सर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
व
वडापाव Wed, 04/13/2016 - 17:29 नवीन
अनेकदा घरचे काही गोष्टींमध्ये मुलांची मते स्वतः डेव्हलप होईपर्यंत थांबत नाहीत आणि स्वतःची मते नकळत लादण्याचा प्रयत्न करतात. अशी कुठचीही गोष्ट लादली जाणे फारसे कोणाला आवडत नाही.त्यामुळे योग्य संधी येताच (मोठे झाल्यावर) या लादण्यावर रिअ‍ॅक्शन म्हणून मुले अनेकदा दुसर्‍या टोकाला जातात. तसे होऊ नये असे वाटत असेल तर मुलांवर कुठलीही गोष्ट न लादता त्यांना स्वतःची मते बनविण्यासाठीच्या प्रक्रीयेतले (म्हणजे विचार कसा करायचा वगैरे गोष्टींचे ट्रेनिंग) फॅसिलिटेटर म्हणूनच पालकांनी राहावे
. +1 मला म्हणायचं होतं ते तुम्ही नेमक्या शब्दांत मांडलंत. लोक आपल्या धार्मिक भावना आपल्या मुलांवर लादत राहतात, आणि त्यातील बहुतांशी जण कोणी कितीही समजावलं तरी लादतच राहतील त्यामुळे त्यांना तसं न करता येण्याची परिस्थिती उद्भवली तर घडून येणारा बदल हा किती चांगला असेल अशी साधारण कल्पना धागा काढताना माझ्या डोक्यात होती. याचा अर्थ मुलाला देवाच्या अस्तित्त्वाची शक्यता वाटत असताना त्याला दरडावून 'देव बिव काही नसतं म्हटलं ना' असं करणंही योग्य नव्हेच. पण विशिष्ट संकल्पना या मुलं योग्य वयात आल्याशिवाय त्यांच्या डोक्यात भरू नयेत असंच वाटतं. 'हे जग कसं निर्माण झालं?' या कुतुहलाचं उत्तर माहिती नसतं म्हणून सरळ देवाच्या नावावर बिल फाडून मोकळं व्हावं ही पालकांची भूमिका कितपत योग्य आहे? किंवा जगाच्या निर्मितीबद्दलचा वैज्ञानिक दृष्टीकोन काय आहे आणि साधारणतः लोक काय मानत असतात हे सांगून मुलाला आवडेल ती कल्पना आपलीशी करू द्यावी. जग कसं निर्माण झालं? देवानं केलं. मी कुठून आलो? देव तुला आईच्या पोटात ठेवून गेला. चांगलं काम का करावं? देव बक्षीस देईल. वाईट काम का करू नये? देव शिक्षा देईल. असली उत्तरं देऊन सगळ्या गोष्टींचं मूळ देवात आहे म्हटलं की मूल ते मूळ शोधेल की मुळाशी असलेला कपोलकल्पित देव?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
अत्रे गुरुवार, 04/14/2016 - 04:27 नवीन
किंवा जगाच्या निर्मितीबद्दलचा वैज्ञानिक दृष्टीकोन काय आहे आणि साधारणतः लोक काय मानत असतात हे सांगून मुलाला आवडेल ती कल्पना आपलीशी करू द्यावी.
आता बरोबर बोललात. मूळ लेखात हे वाक्य टाकले असते तर बरे झाले असते. मुलांना पूर्णतः अज्ञानी ठेवणे अशक्य आहे. अजून एक. विशिष्ट वयामधे मुलं पालकांकडे गाईड म्हणून बघत असतात. अशा वेळी, ही माहिती घे आणि तुझं तू ठरव - असं म्हटलं तर त्यांचा रिस्पॉन्स काय असेल? त्याचवेळी बाहेरून कोणी ठामपणे सांगितले - की देव धर्म या गोष्टी मानणे चांगले आहे/नाही तर मुले त्या विचारसरणीला आकर्षित होतील. जनरली माणसाला ठामपणा आवडतो. मग तो कोणत्या का बाजूचा का असेना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडापाव
व
वडापाव गुरुवार, 04/14/2016 - 07:22 नवीन
पण प्रसंगी ठामपणामुळे कुतुहल नाही का मारलं जात? मुलांचं कुतुहल जागं राहील अशाप्रकारे आपली भूमिका मांडायला हवी ना (जी असेल ती)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे गुरुवार, 04/14/2016 - 07:40 नवीन
तसे नव्हे. दोन्ही गोष्टी करता येतात. आधी कुतूहल शमवून मग ठामपणा ही दर्शवता येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडापाव
अ
अत्रे गुरुवार, 04/14/2016 - 07:43 नवीन
तुम्ही एक काल्पनिक संवाद लिहायचा प्रयत्न करा, एक मुलगा आणि त्याचे पालक यामधला. तुम्हाला पाहिजे तसे पालक त्यात ठेवा पण मुलगा मात्र फार कुतूहल असलेला असेल. वाचायला मजा येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडापाव
प
प्रसाद प्रसाद गुरुवार, 04/14/2016 - 08:34 नवीन
Hypothetically just a curiosity मी कुठून आलो? देव तुला आईच्या पोटात ठेवून गेला. मग मुलांना त्या वेळी काय सांगायचं ? (इथे लहान मूल असे गृहीत धरले आहे असं वाटतंय...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडापाव
व
वडापाव Wed, 04/13/2016 - 17:13 नवीन
अठराव्या वर्षापर्यंत काहीच नाही त्यानंतर धर्म वा देव निवडायचा हे मांडतांना आपण देव किंवा धर्म ह्यांची तुलना दारू, सेक्स, सामाजिक व्यवस्था, एखाद्या भागातली संस्कृती इत्यादींशी करत आहात असे वाटते.
तुमचा अंदाज काही प्रमाणात बरोबर आहे. व्यसनाशी करतोय. माझ्या घरची मंडळी फारशी देवदेव करत नसली तरी सगळे आस्तिक आहेत. मी स्वतः सहावीत असताना नास्तिक झालो. त्यासुमारास मी विचार केला आणि माझं डोकं चालवलं म्हणून हे झालं. त्याआधीपर्यंत मी येताजाता प्रार्थना करा, देवदेव करा, असा होतो. माझा मुद्दा हा आहे की मुलांना स्वावलंबी आणि स्वाभिमानी करण्यासाठी जे जे करावं लागतं त्यात त्यांना देवावर/नशिबावर विसंबून न राहता परिस्थितीला तोंड देणं शिकवायला हवं. मी वर मांडलेली परिस्थिती उद्भवणं अशक्य आहे म्हणूनच ती गृहीतात्मक आहे असं म्हणतोय. पण समजा, देवधर्माच्या सिद्धांतांपासून (doctrines पासून) मुलांना ती सुजाण होईपर्यंत लांब ठेवलं तर ते त्यांच्यासाठी चांगलं नाही का? निदान याबाबतीतल्या (cognitive dissonance) विसंवादी बोधाशी झगडा देण्यापासून तरी बचावतील. माझं असं अजिबात म्हणणं नाही की या doctrines पासून दूर राहिल्याने नंतर कोणीच देवभोळी माणसं उरणार नाहीत. ती कायमच राहतील. कारण शेवटी प्रत्येकाची मानसिक आणि बौद्धिक कुवत वेगवेगळी असते. पण त्यांचा टक्का आजच्या देवभोळ्या पिढ्यांपेक्षा लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो हे तर नक्की?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
अ
अत्रे Wed, 04/13/2016 - 13:16 नवीन
सण साजरे करण्याबद्दल काय? या प्रयोगात सणही साजरे करायचे नाहीत का? आणि त्या मुलाने विचारले आपण का नाही साजरे करत तर काय उत्तर द्यायचे?
  • Log in or register to post comments
'
'पिंक' पॅंथर्न Wed, 04/13/2016 - 13:37 नवीन
"तर्राट जोकर" म्हणतात त्याप्रमाणे माझ्यावरही नास्तीकतेचे संस्कार झाले नाहीत. माझी आई धार्मिक होती पण वडील नव्हते. पण "त्या" विशिष्ट वयानंतर मी सुद्धा नास्तिक झालो.. अंशतः मी माझ्या मुलीवर नकळत तसेच संस्कार केले. वयाच्या ११ व्या वर्षापासुन ती देव नसतो यावर ठाम झाली. सण साजरा करायचे तर, पाचवी पासुन तीचे विविध सणांबाबत विविध प्रश्न आहेत.. उदा. वटसावित्री, नागपंचमी.. यामुळं काय झालं की तिचे आवडते चॅनेल डिस्कवरी, नॅशनल जिऑग्राफी हे झाले... आणि "हिस्ट्री १८" चा " एनसिंएंट अलिएन्स" आवडता कार्यक्रम..
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 04/13/2016 - 14:31 नवीन
मी काय म्हणतो, धर्मच नसला तर? -टाका डाव!!
  • Log in or register to post comments
S
sagarpdy गुरुवार, 04/14/2016 - 11:33 नवीन
दुर्योधनाला गादी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
'
'पिंक' पॅंथर्न Wed, 04/13/2016 - 14:45 नवीन
आफ्रीकेत किंवा डीप अॅमेझॉन खो-यामधे अजुन अदिवासिंना जगातले "मेन स्ट्रीम" धर्म माहित नाहीत.. आपणच आपला धर्म ठरवा आणि आपणच भांडा... सण वगैरे तर लई दुरची गोष्ट !!!
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Wed, 04/13/2016 - 15:01 नवीन
मोगलीला विचारावं लागेल.
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित Wed, 04/13/2016 - 15:02 नवीन
उकांची ट्विस्टर तुफ्फान वेगात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
ब
बोका-ए-आझम Wed, 04/13/2016 - 15:11 नवीन
तर समाजाबाहेर राहायला लागणार नाही का? इतरांच्या घरी आणि सार्वजनिक स्वरूपात होत असलेल्या धार्मिक विधींवर आपलं कसं काय नियंत्रण असणार आहे? बरं, कुठलेही धार्मिक संस्कार नाही करायचे म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलाला साधं शाळेतून घरी आणतानासुद्धा वाटेत एकही देऊळ, मशीद, चर्च, गुरुद्वारा, अग्यारी, सिनेगाॅग वगैरे नसलेल्या रस्त्यावरुन आणावं लागेल. घरावरून गणपती आणताना किंवा विसर्जनाची मिरवणूक जात असताना दारं खिडक्या बंद करुन घ्याव्या लागतील, अन्न हे पूर्णब्रम्ह वगैरे वाक्यंही उच्चारता येणार नाहीत, रामायण-महाभारत, भगवद्गीता वगैरे ग्रंथांचा परिचय करुन देता येणार नाही, दसरा-दिवाळी, नाताळ, ईद वगैरे काहीही साजरं करता येणार नाही. थोडक्यात आयुष्य महाबोरिंग होऊन जाईल. हायपोथेटिकली विचार केला तरी.
  • Log in or register to post comments
व
वडापाव Wed, 04/13/2016 - 17:33 नवीन
तर समाजाबाहेर राहायला लागणार नाही का? इतरांच्या घरी आणि सार्वजनिक स्वरूपात होत असलेल्या धार्मिक विधींवर आपलं कसं काय नियंत्रण असणार आहे? बरं, कुठलेही धार्मिक संस्कार नाही करायचे म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलाला साधं शाळेतून घरी आणतानासुद्धा वाटेत एकही देऊळ, मशीद, चर्च, गुरुद्वारा, अग्यारी, सिनेगाॅग वगैरे नसलेल्या रस्त्यावरुन आणावं लागेल. घरावरून गणपती आणताना किंवा विसर्जनाची मिरवणूक जात असताना दारं खिडक्या बंद करुन घ्याव्या लागतील, अन्न हे पूर्णब्रम्ह वगैरे वाक्यंही उच्चारता येणार नाहीत, रामायण-महाभारत, भगवद्गीता वगैरे ग्रंथांचा परिचय करुन देता येणार नाही, दसरा-दिवाळी, नाताळ, ईद वगैरे काहीही साजरं करता येणार नाही.
हा विचार हेच पालक मुलांना लैंगिक शिक्षण देण्याची गरज असतेवेळी करताना दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
व
विवेकपटाईत Wed, 04/13/2016 - 17:39 नवीन
पहिले तर धर्म शब्दाचा अर्थ माहित पाहिजे. दुसर्यांचा जगण्याचा अधिकाराचा सम्मान करत जगण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मनुष्याचा धर्म.
  • Log in or register to post comments
M
mugdhagode Wed, 04/13/2016 - 18:02 नवीन
अगदी सहमत. धर्म व त्याचे आस्तित्व आपण वयाच्या अठरा वर्षापर्यंत शुन्य करु शकत नाही. एक्स्पोजर होणारच. त्यामुळे घरात सर्वच सण साजरे करावेत... मुलांच्या समोर मुद्दाम सर्वच देवांची नावे घ्यावीत... चर्च देउळ मशीद इ सगळेच दाखवावे .. व तुला काय हवे ते विचारावे. हमरी बेटी को चर्च पसंत है. परीक्षा संपतात त्ञा सुमारास इस्टर येतो. ख्रिस्मस व हॅपी न्यु इअर एकत्र होते. हमकु क्या पसंत है सबकु पता है. उद्या गुरुवार ' गुरुना ' शिरा द्यायचा दिवस. धार्मिक कथा हे लहान वयात फारसे शिकवुच नये. असे वाटते. मेंदु प्रिऑक्युपाइड होतो. सण धर्म हे आनंदाचा एक दिवस या दृष्टीने पहावे. सुखाचे चार आठ दिवस वाढतात. बाकी धार्मिक कथा / तत्वज्ञान हे वाचायला बालपण्कशाला वापरायचे ? तारुण्यात त्याचे ते वाचुन ज्ञान घेतील.
  • Log in or register to post comments
ह
होबासराव गुरुवार, 04/14/2016 - 14:30 नवीन
पण त्याला प्रथमतः कवटीच्या आत मेंदु असावा लागतो. काय जंत बरे आहेत ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode
आ
आनन्दा Fri, 04/15/2016 - 07:48 नवीन
तुम्हाला एव्हढे आयडी मिळतात कसे? माझा एक डुआयडी काढलाय तो अजून अ‍ॅप्रूव्ह होत नाहिये. कोणी संपादकच इन्सायडर ट्रेडिंग करत नाहीये ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode
क
कंजूस गुरुवार, 04/14/2016 - 08:00 नवीन
अवघड आहे एवढे म्हणेन.तर्राटजोकर आज खुशि के बंगले बनाओ चाहे जितने।हम तुम्हारे साथ हैं।
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sat, 04/16/2016 - 15:35 नवीन
असे प्रयोग मोठ्या प्रमाणावर कम्युनिस्ट देशांमध्ये झालेले आहेत. त्याचे रिझल्ट्स थोडे या बाजूला थोडे त्याबाजूला आहेत. अनेक देशांत कम्युनिस्ट राजवट उठल्यावर लोक पुन्हा धर्माकडे वळले. तर अनेक देशांत नास्तिक लोकांचं प्रमाण प्रचंड जास्त आहे. उदाहरणार्थ चीन, झेक रिपब्लिक. तेव्हा काही प्रमाणात तरी तो प्रयोग यशस्वी होतो एवढंच म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
व
वडापाव Sat, 04/16/2016 - 16:11 नवीन
यावरून आठवलं. चीनने नुकतंच इमामांना नाचायला लावलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
अ
अत्रे Sat, 04/16/2016 - 19:03 नवीन
वाचून हसू आलं. खरं का खोटं माहित नाही पण एकाही प्रसिद्ध न्यूज agency त ही बातमी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडापाव
व
वडापाव Sat, 04/16/2016 - 21:02 नवीन
येणारही नाही. मलाही हसू आलं होतं. बातमी खरी आहे. अनेक संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. China makes imams dance असं गुगलून पाहिलंत तरी दुवे मिळतील खूप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
व
विजय पुरोहित Sun, 04/17/2016 - 03:09 नवीन
वडापाव साहेब. भारीच बातमी आहे. आता भारतातील विचारवंत, बुद्धीवादी, पुरोगामी, सेक्युलर बघुया काय करतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडापाव
व
वडापाव Sun, 04/17/2016 - 03:39 नवीन
ते काय करणार हे उघड आहे - अळीमिळी गुपचिळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित
व
वडापाव Sun, 04/17/2016 - 03:42 नवीन
फारफार तर आव्हाड प्रभृती Save Xinjiang चा टीशर्ट मिरवताना दिसतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडापाव
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा