-स
तुझ्या ओल्या केसांचा गंध
करीत नाही मला धुंद-
शॅम्पू का बरे लावतेस?
तुझे डोळे तसे अगदी
गहिरे वगैरे आहेत-
लेन्सेस का वापरतेस?
तुझ्या ओठांची लाली
थोडी कडू बघ लागते-
लिपस्टिक कसलं लावतेस?
तुझ्या गोब-या गालांना
कुस्करणं मला आवडतं-
त्यांना क्रीम का फासतेस?
कितीदा तुला सांगितले
नटू नकोस उगाचच तू-
अशीच मला आवडतेस!
💬 प्रतिसाद
(3)
ज
जव्हेरगंज
Wed, 04/13/2016 - 16:29
नवीन
हम्म
- Log in or register to post comments
ग
गोंडस बाळ
गुरुवार, 04/14/2016 - 10:27
नवीन
माफ करा, मन दुखवायचं नाही तुमचं ..पण अपूर्णता वाटते काव्यात ...
- Log in or register to post comments
स
सुधीरन
गुरुवार, 04/14/2016 - 17:33
नवीन
काय अपूर्णता वाटते?
- Log in or register to post comments