आभाळानं वाजिवलाय ढोल
आभाळानं वाजिवलाय ढोल
हानम्या सुतार लुना घीऊन झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसलाय
तंबाखूची पिशवी घिऊन धुरपी कॉकटेल सर्व्ह करायला निघालीय
विमान १८० मैल वेगानं आभाळात झेपावलयं
माकडांनी भक्तीसंगिताचा खिस काढत बानूबयावर ठेका धरलाय
गोलमेज परिषदेत मारुतीनं शनवारचा उपास सोडलाय
एक डोळा झाकून पारध्यानं चिमणीवर निशाना साधलाय
बेबेवाडीच्या धरणात वाळूचा उपसा चाललाय
डांबरीवर घसरुन संत्याचा पायजमा फाटलाय
आरं हाय कारं मंडळी हितं कोण? आज एंडरेल पिऊन आभाळानंच ढोल बडवलाय
💬 प्रतिसाद
(7)
ए
एस
Wed, 04/13/2016 - 20:07
नवीन
च्यक्!
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
गुरुवार, 04/14/2016 - 08:10
नवीन
आब्स्ट्रेक्ट!
- Log in or register to post comments
ह
हर_हुन्नरी
गुरुवार, 04/14/2016 - 14:31
नवीन
यावर कोणी तरी इलस्ट्रेशन करायला पाहिजे :)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 04/14/2016 - 21:38
नवीन
एवढ्या एका ओळीचे इल्स्ट्रेशन करणार्याला माझ्यातर्फे एक कॉर्डलेस माऊस बक्षीस.
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 04/15/2016 - 15:30
नवीन
अरे काय हे! नव्वदोत्तर का?
- Log in or register to post comments
स
समाधान राऊत
Fri, 04/15/2016 - 15:44
नवीन
बदलत्या जगाचे छान वर्णन जमलय..पण हानम्या सुताराचे कशाबद्दल सांगायचेय.... कळाले नाही
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
Fri, 04/15/2016 - 16:09
नवीन
जव्हेरभौ आवडली कविता.
यातील चमत्कृती मनाला भावते अगदी आणि ती चमत्कृती हेच कवितेचे बलस्थान आहे.
- Log in or register to post comments