दुष्काळात दारू कारखाने सुरु असावे का?
मंडळी
स्वैर संदर्भ
http://www.misalpav.com/node/३५७१०
जर महाराष्ट्र पाण्याचा अभावी वैराण होत आहे ,तर निदान नगर जिल्ह्यातील दारू कारखाने तात्पुरते बंद ठेऊन कामगार वर्गाला म न रे गा मध्ये भरती करावे का ?
आता हे दारू कारखाने मातब्बर नेत्यांचे असले तरी सर्व विरोधी पक्षातले आहे
online PIL ने लौकर निर्णय होईल का ? कि एखादा दुसरा उपाय असल्यास कृपया कळवावे ?
निकृष्ट कामांमुळे पावसात अनेक बंधारे गेले वाहून
- - सकाळ वृत्तसेवा सोमवार, 5 ऑक्टोबर 2015 - 12:52 PM IST औरंगाबाद - कोल्हापुरी, सिमेंट बंधाऱ्यांवर आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, यामध्ये अनेकांनी डल्ला मारल्याने कामे निकृष्ट दर्जाची झाली. जिल्ह्यात या बंधाऱ्यांचा सिंचनाला फायदा होण्याऐवजी आर्थिक नुकसानच जास्त झाले. कोल्हापुरी बंधाऱ्यांची पूर्ण बिले उचलली, मात्र त्याला गेटच बसविण्यात आलेले नाहीत. त्यातच दरवर्षी उपकरातून पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे दुरुस्तीचा सपाटा लावला जात आहे. जिल्ह्यात 17 व 18 सप्टेंबरच्या पावसात अनेक बंधारे वाहून गेले. यामध्ये कोल्हापुरी आणि सिमेंट बधाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात जवळपास शंभरपेक्षा जास्त बंधाऱ्यांचे नुकसान झालेले आहे. यामधील अनेक बंधारे दोन ते तीन वर्षांतील आहेत. जिकडेतिकडे कोल्हापुरी बंधारे मागील दोन वर्षांत जिल्हा परिषदेने अनेक कोल्हापुरी बंधाऱ्यांना प्रशासकीय मान्यता दिल्या. यात 2013-14 मध्ये 77, 2014-15 मध्ये 93 कोल्हापुरी बंधाऱ्यांना मान्यता दिल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. 2013-14 मध्ये 39 कोल्हापुरी बंधारे बाधले; मात्र त्यांच्या निविदा उपलब्ध केल्या गेल्या नाहीत. 2014-15 मध्ये 41 कोल्हापुरी बंधारे बांधले, त्याच्या निविदा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. जिल्हा परिषदेतर्फे आतापर्यंत शेकडो कोल्हापुरी बंधारे बांधले; मात्र त्यांचा खरोखरच उपयोग होता का, याचा विचार न करता आता आणखी कोल्हापुरी बंधारे बांधण्याचा घाट घातला जात आहे. जलयुक्त शिवारातून सिंचनाची कामे होत असताना अनेकांचा आग्रह कोल्हापुरी, सिमेंट बंधाऱ्यांसाठी असतो. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात कोल्हापुरी बंधाऱ्यांची आवश्यकता आहे का, याचा शास्त्रीय पद्धतीने कुणीही मुद्दा जिल्हा परिषदेत मांडला नाही. सिमेंट बंधाऱ्यांचीही हीच गत अहवालानुसार लेखाशीर्ष एमआयएन-6 मध्ये 2013-14 मध्ये प्रशासकीय मान्यता असलेले 117 सिमेंट बधारे बांधण्यात आले. 2013-14 मध्ये प्रशासकीय मान्यता असलेली कामे 26 होती. तर 2013-14 या वर्षात निविदा उपलब्ध करून न देण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांची कामे 34 होती. 2014-15 मध्ये निविदा उपलब्ध नसलेली कामे 10 होती. जिल्ह्यात अनेक सिमेंट बंधाऱ्यांचा फायदा झालेला असला, तरी काही ठिकाणी आवश्यकता नसताना ते बांधले जात आहेत. त्यातील अनेक कामे निकृष्ट दर्जाची होताना दिसतात. त्यामुळे जोरदार पावसात त्यांचा टिकाव लागत नाही. उपकरातून दरवर्षी दुरुस्तीची कामे जिल्ह्यात 2013-14 आणि 2014-15 या दोन वर्षांमध्ये उपकरातून अगोदरच तब्बल 242 पाझर तलाव, कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आलेली आहे. यावर कोट्यवधी रुपये खर्च झालेले आहेत. आता पुन्हा कोल्हापुरी, पाझर तलाव दुरुस्तीसाठी निधी मागितला जात आहे. उपकरातून आता पुन्हा नव्याने दुरुस्तीची कामे घेण्याचे नियोजन सुरू आहे. याची काही गरज आहे का, याचा विचार कुणीही करीत नाही. फक्त मलिदा कसा लाटता येईल, याचा जास्त विचार झालेला दिसतो.महामंडळे बनली पांढरे हत्ती....
तिजोरीवरील ताणामुळे सरकारपुढे प्रश्न मुंबई - जनकल्याणकारी हेतूने राज्य चालवताना सार्वजनिक उपक्रम राबवले जातात. राज्यात विविध प्रशासकीय विभागांतर्गत सध्या ५५ उपक्रम-महामंडळे कार्यरत असून, त्यातील २४ उपक्रम फायद्यात, तर सहा उपक्रम ना-नफा ना-तोटा तत्त्वावर कार्यरत आहेत. उरलेले २५ उपक्रम तोट्यात आहेत. शासकीय तिजोरीत खडखडाट असताना या महामंडळांचे करायचे काय, अशी परिस्थिती निर्माण झाली असून हे पांढरे हत्ती पोसायचे की मोडीत काढायचे हा प्रश्न सरकारला पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर येताच सार्वजनिक उपक्रमाच्या धांडोळा घ्यायचे ठरवले होते. त्यातून ही वस्तुस्थिती पुढे आली असली, तरी सरकारपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचा तोटा पाहता त्यांची तपासणी करून घ्यावी, अशी शिफारस सचिवांनी केली आहे आणि मागास वर्गाच्या हितासाठीच्या महामंडळासाठी टाटा सामाजिक संस्थेकडून या महामंडळांचे मूल्यांकन करावे, असे सुचवले आहे. सार्वजनिक उपयुक्ततेसाठीचे उपक्रम बंद करणे धाडसाचे ठरू शकते. ते शक्य नाही. मात्र, तोटा भरून काढण्यावर विचार करावा लागणार आहे. सामाजिक महामंडळे बंद केली, तर राजकीय टीकेला सामोरे जावे लागेल. या महामंडळांचा तोटा कमी असला, तरी भुर्दंड आहेच. या महामंडळावर राजकीय हस्तक्षेपातून अवाच्या सव्वा नोकरभरती केली आहे. ही महामंडळे बंद केली, तर या कर्मचाऱ्यांची सोय कोठे लावावी, हा मोठा प्रश्न आहे. त्यांच्या वेतनावर कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. तोट्यातील हे उपक्रम बंद - कोकण विकास महामंडळ मर्यादित व या महामंडळाच्या दोन दुय्यम कंपन्या - विदर्भ विकास महामंडळ मर्यादित व या महामंडळाच्या तीन दुय्यम कंपन्या - मराठवाडा विकास महामंडळ मर्यादित व या महामंडळाच्या सात दुय्यम कंपन्या - महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स महामंडळ मर्यादित - महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ व या मंडळाच्या नऊ गिरण्या - महाराष्ट्र भू-विकास महामंडळ मर्यादित - मॅफको महामंडळ ‘ आर्थिक प्रगती दहा वर्षांत खुंटली..! प्रगतिशील व देशात नंबर एकचे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख असली तरी मागील दहा वर्षांत राज्याची आर्थिक प्रगती मात्र कमी झाल्याचा धक्कादायक निष्कर्ष ‘कॅग’ने काढला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात राज्याचे आर्थिक नियोजन फसले असून, लालफितीच्या कारभाराचा फटका आर्थिक प्रगतीला बसल्याचेच ‘कॅग’च्या अहवालातून उघड झाले आहे. ‘कॅग’चा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये २००५ ते २०१५ दरम्यानच्या राज्याच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला आहे. राज्याची लोकसंख्या जशी मागील दहा वर्षांत १६ टक्क्यांनी वाढली, तशी आर्थिक प्रगती मात्र वाढली नसल्याचे अहवालात नमूद केले आहे. राज्याचे सकल उत्पादन (जीएसडीपी) २०१४-१५ मध्ये प्रचलित दराने १६,८६,६९५ कोटी होते. २००५ ते २०१५ दरम्यान राज्याने १४.८१ टक्के दराने सकल उत्पादनवाढीचा दर गाठला; पण याच दशकात देशातील सर्वसाधारण इतर राज्यांतील सकल उत्पादनवाढीचा दर १५.४४ टक्के होता. त्यामुळे महाराष्ट्राने मागील दहा वर्षांत कमी आर्थिक प्रगती केल्याचा निष्कर्ष ‘कॅग’ने काढला आहे. मागील पाच वर्षांत राज्याच्या ‘जीडीपी’ (एकूण स्थूल उत्पादन) वाढीच्या दराने तर कमालीची घसरण नोंदवल्याचे अहवालात नमूद केले आहे. २०१०-११ मध्ये राज्याचा जीडीपीवाढीचा दर २२.६० टक्के होता. हा दर घसरून २०१४-१५ मध्ये ११.६९ टक्के इतका खाली आल्याचे ‘कॅग’ने नमूद केले आहे. कर्जावरील व्याजाची रक्कम वाढली असून खर्चाचे महसुली जमेशी असणारे प्रमाणही व्यस्त झाल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. तर, महसुली खर्चापैकी ८२ टक्के खर्च योजनेतर घटकांवर झाल्याची बाब समोर आली आहे. राज्यातल्या सामाजिक व विकास कार्यक्रमाच्या धीम्या गतीमुळे खर्चात ४३,२६५ कोटींची बचत झाल्याचे अवालात नमूद केले आहे. यामुळे काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये लालफितीचा कारभार होता. हे ‘कॅग’ने अप्रत्यक्षरीत्या सुचवले आहे.पुन्हा टंकण्याऐवजी ह्या भागातील सुरुवातीस दिलेली आकडेवारी पहा..
इतकी पाणी बचत तर नक्कीच शहरातील लोक करू शकतात. भारवाही हमाल नाखुतसेच संपुर्ण भारतात पावसाचे पाणी साठविणे/पुनर्वापर (रेन वाटर हार्वेस्टींग) यात चेन्नई अव्वल खालोखाल बेंगलोर व त्या नंतर पुणे येते.मुंबईबाबत माहीती नाही मुंबईचे रहिवासी सांगू शकतील अगदी बदलापुर्/कळ्याणवाल्यांनीही सांगावे.
मुंबईत दररोज किमान ७०० ते ७५० एमेल्डी पाणी चोरी आणि गळतीत वाया जाते,तसेच पुरेशी पुनर्प्रक्रिया उद्योग पुनर्वापर इच्छा नसल्याने दररोज सुमारे १५०० दशल्क्ष पाणी समुद्रात सांडपाण्याद्वारे सोडले जाते मुंबैला मुंबईबाबत सद्यस्थीती अतिक्र्मण आणि राजकारण्यांनी गिळलेल्या पवनेकाठचा नाखु