Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कांजण्या: रोग, उपचार, काळजी, संसर्ग संबंधी माहिती हवी आहे.

त
तर्राट जोकर
Sat, 04/16/2016 - 18:03
🗣 29 प्रतिसाद
काल मोठ्या मुलाला (वय ५ वर्ष) ताप आला, चार पाणी भरल्या पुळी हातावर, पायावर, पोटावर, कानाखाली मानेवर आल्या. डॉक्टरला दाखवले तर त्यांनी कांजण्या झाल्यात असे सांगितले. काही औषधे दिलीत. ९ दिवस ह्या रोगाचा कोर्स आहे असे सांगितले आहे. घरात कांजण्या न झालेले व डोस न दिलेले मी व माझा दुसरा लहान मुलगा वय वर्ष दिड आहोत. अशा परिस्थितीत काय काळजी घ्यावी ह्याबद्दल आमच्या डॉक्टरने फारसे काही सांगितले नाही. फक्त मोठ्या मुलापासून दूर राहा एवढेच सांगितले. बायको म्हणतेय तुम्ही दोघेही १०-१२ दिवस घर सोडुन दुसरीकडे राहायला जा. ती खूप घाबरली आहे की आम्हा दोघांना इन्फेक्षन होऊ नये म्हणून. मला नक्की कळत नाही काय काळजी घ्यावी. मुलासाठी स्वतंत्र बेडरुम व अटेच्ड बाथरुम-टॉयलेट आहे. आम्ही काही दिवस हॉलमधेच काढू असा माझा प्लान आहे. पेचात पडलोय. कांजण्यांबद्दल अनुभवी लोकांनी, डॉक्टरांनी मार्गदर्शन करावे ही विनंती. तसेच काय काळजी घ्यावी, औषधोपचार, संसर्ग टाळण्यासाठीची उपाययोजना काय असावी ह्याबद्दल मार्गदर्शन अपेक्षित आहे.

प्रतिक्रिया द्या
56220 वाचन

💬 प्रतिसाद (29)
आ
आरोह Sat, 04/16/2016 - 20:14 नवीन
कडूलिंबाचा पाला वाटून लावा किंवा चांगल्या प्रतीचे मध लावा
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sat, 04/16/2016 - 20:22 नवीन
मिपावारील डॉक्टरलोक मदत करू शकतील. माझा वैयक्तिक अनुभव सांगतो... मला ८-९ वर्षांपूर्वी आल्या होत्या कांजण्या .सुरूवातीला विशेष काही खाजत वगैरे नाही. पण २-३ दिवसांनी आग होते , खाज सुटते पण खाजवायला जमत नाही. आणी हो डॉक्टरांनी नखाने अज्जिबात फोडायचं नाही असं सांगितलं होतं . तुमचा मुलगा लहान आहे तेव्हा तो खाजवणार नाही याकडे तुम्हालाच लक्ष ठेवावे लागेल.तुम्हाला एवढी भिती नाही पण दुसऱ्या लहान मुलाला प्रचंड जपावे लागेल . दोघांचा स्पर्शपण होऊ देऊ नका. शक्य असल्यास वेगळे रहा. माझ्या मते हा आजार होत नसावा. याचे जे डाग असतात ते पूर्णपणे जायला बराच वेळ लागू शकतो. बाकी तो लवकर बरा व्हावा हीच इच्छा .
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sat, 04/16/2016 - 20:23 नवीन
माझ्या मते मोठ्या व्यक्तींना हा आजार होत नसावा. ***
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Sun, 04/17/2016 - 20:34 नवीन
होतो मोठ्यानापण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
ब
बोका-ए-आझम Sat, 04/16/2016 - 21:28 नवीन
असं ऐकलेलं आहे. तुम्हाला जर लहानपणी वगैरे होऊन गेला असेल हा आजार तर तुमच्यामध्ये immunity विकसित झाली असेल आणि त्यामुळे तुम्हाला हा आजार होणार नाही. तरी वैद्यकीय मत विचाराच. हा अगदीच साधा आजार आहे. टेन्शन घेण्यासारखा अजिबात नाही.
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरसर्वसाक्षी Sat, 04/16/2016 - 22:30 नवीन
तर्राट जोकर तुमच्या मुलाच्या कांजण्या बर्‍या होवोत. प्लि़ज वैद्द्किय ईलाज करा आणि तेहि फक्त अ‍ॅलोपॅथि एव्हढेच सांगेन. मलाहि झाल्या होत्या ! तो त्रास मला माहित आहे. ह्या देवि कडे घेउन चल, तिथे लिंबु उतार ह्यामध्ये मला खुप भोगाव लागलय. खास म्हणजे शितला माता, अंगात २ ताप असताना आई ने माझ्या कडुन आरति ओवाळुन घेतलि होति. वैद्द्किय ईलाज करा.
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 04/17/2016 - 00:21 नवीन
हा विषाणूजन्य आजार असून संसर्गजन्य आहे. बाकी यावर माहिती डॉक्टरलोकच देऊ शकतील.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 04/17/2016 - 01:58 नवीन
आजकाल कांजिण्या होतात हे माहित नव्हते. लसीकरणाने आता फारश्या कोणाला होत नसव्यात असे वाटत होते. धाकट्या मुलाला लांब ठेवणे हे तर आलेच! डॉक्टरी इलाजाशिवाय आणखी काही सांगू शकत नाही. दिलेली औषधे घेण्याशिवाय आत्तातरी पर्याय नाही. मिपावरील डॉ. सांगतीलच! घर सोडून मात्र जाऊ नये असे वाटते. मुले आजारपणात हळवी होतात व आधाराला मनुष्य हवे असते. धाकट्या मुलालाही समजणार नाही की हे काय चालले आहे. मुलाला लवकर बरे वाटो.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 04/17/2016 - 08:10 नवीन
कांजिण्या झाल्यावर औषधे घ्यावी लागतात का याबद्दल साशंक आहे. क्रोसिन सारखी ताप उतरवणारी गोळी सोडल्यास इतर काही खावे लागू नये असे वाटते. बाकी - १. कांजिण्यांचा रोगी लक्षणे दिसण्याआधीच रोग पसरवून मोकळा झालेला असतो, तेव्हा तुम्हाला कांजिण्या होणे न होणे हे तुमच्या इम्युनिटीवर अवलंबून आहे. संपर्क बंद करून आता फारसा उपयोग नाही. माझा भाऊ आणि मी सुटीत १ दिवस भेटलो, ४ दिवसांनी मला कांजिण्या आल्या, घरी फोन केल्यावर कळले की आम्ही भेटल्याच्या दिसर्‍याच दिवशी त्याला कांजिण्या आल्या (दिसायला लागल्या) होत्या. २. कांजिण्यांचे फोड फोडू नयेत, त्यांचे कायमस्वरूपी व्रण राहतात बाकी शक्यतो आंघोळ करू नये वगैरे ऐकून आहे. माझ्या कांजिण्या स्वस्तात सुटल्या होत्या, पण पूर्ण शरीरभर कांजिण्या आलेले लोक ऐकण्यात आहेत.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Sun, 04/17/2016 - 09:21 नवीन
धन्यवाद मित्रांनो, दुसरीकडे आता जाऊन उपयोग नाही असे कळले. लहानग्यास कांजण्या होण्याची ५० ५० चान्सेस आहेत. बघू.
  • Log in or register to post comments
भ
भीमाईचा पिपळ्या. Sun, 04/17/2016 - 09:25 नवीन
मिपावरील डॉक्टर्समंडळींनी धाग्यावर हजेरी नाही लावली हे पाहोण अंमळ आश्चर्य वांटलें.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 04/17/2016 - 09:33 नवीन
पोटास थंडावा येणारं काहीतरी दिवसातुन २-३ वेळा खायला लावा. प्रवा़ळयुक्तं गुलकंद सगळ्यात उत्तम. कांजिण्यांना कितीही खाज सुटली तरी हात लाउन देउ नका. फुटलेल्या कांजिण्यांच्या लसीने शरिराच्या अन्य भागावरही फोड येतात. ती लस लागलेली वस्तु दुसर्‍याच्या हाताला लागली तर त्यालाही कांजिण्या होण्याचा धोका असतो. खाज कमी व्हावी म्हणुन खास कांजिण्या पेशंट्साठी खास पावडरी सुद्धा असतात त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने सतत लावा. सैल कपडे घालायला लावा जेणेकरुन स्किन इरिटेशन होणार नाही.
  • Log in or register to post comments
न
नाना स्कॉच Sun, 04/17/2016 - 09:35 नवीन
तजो, बोका ह्यांच्याशी मी सहमत आहे, 1 कृपया तुम्ही पॅनिक होऊ नका 2 हा आजार अतिशय साधा आजार आहे treat it like one :) 3 छोट्याला ज़रा जपा, कॉन्टेक्ट येऊ देऊ नका, शक्य तितका 4 तुम्हाला जर कधीच कांजण्या झाल्या नसतील तर तुम्ही सुद्धा थोड़ी काळजी घ्या 5 चांगल्या पेडियाट्रिशनला भेटा अन लहान मुलांना सूटेबल अन परिणामकारक असे एंटी पयरेटिक डोज़ घरात हाताशी ठेवा 6 दोन्ही मुलांचा आहार डॉक्टरसोबत बोलून ठरवा तुमचा मुलगा लवकर बरा होवो ही प्रार्थना :)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 04/17/2016 - 10:03 नवीन
हाओ. स्कॉच नाना परफेक्ट बोलतेत. ते सब्जा पण ठंड असतेत म्हणे. पाण्यात भिजवून. बघा विचारुन. . पिल्लू लवकर बरे होतेय तुमचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Sun, 04/17/2016 - 10:25 नवीन
जितके गार खायला प्यायला देऊ शकता ते द्या, फ़क्त पदार्थ उष्णतेने गार नाही तर प्रकृतीने सुद्धा शीतल असेल असे पहा ! उदा कलिंगड़ चव अन स्पर्शाला थंड लागते पण मुळात पित्तकारक असते. सब्जाचे बी बेस्ट गुलाबजल उत्तम वाळा पाणी अतिउत्तम! जमल्यास कापसाने हलक्या हाताने गुलाबजल मुलाला विचारून जिथे जास्त आग असेल तिथे थोड़े हलके हलके डॅब करा आराम पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
आ
आनन्दा Sun, 04/17/2016 - 12:16 नवीन
कांजिण्यांना पाणी लावू नये असे ऐकून आहे. ख खो दे जा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
M
mugdhagode Sun, 04/17/2016 - 12:22 नवीन
कांजण्या हे व्हायरल इन्फेक्शन आहे. उपचार फक्त .... ताप अंगदुखीची औषधे... त्वचेची काळजी. सेपरेशन आता करुन उपयोग नाही... प्रसार आधीच झालेला असतो. घरातील इतर लोकानी आहार मजबूत ठेवावा... पेशंटलाही आहार व विश्रांती हेच मुख्य औषध.
  • Log in or register to post comments
र
राही Sun, 04/17/2016 - 16:53 नवीन
पूर्वी हमखास परिपाठाचा काढा द्यायचे. उकळलेल्या पाण्याने धुतलेल्या सहाणेवर स्वच्छ धुतलेले चंदनाचे कांड उगाळून ते मलम अंगाची जळजळ आणि कंड यातून तात्पुरत्या सुटकेसाठी त्वचेवर लावायचे. पण आग आग होतेच. डॉक्टर सांगतील ती अंगदुखी आणि तापाची औषधे घ्यावी. कांजिण्या अंगावर उठण्याआधीच शरीरातले कांजिण्यांचे जंतू संसर्गक्षम अवस्थेत पोचलेले असतात. त्यामुळे जवळच्यांना संसर्ग झालेलाच असतो. पण इम्यूनिटी असेल तर किंवा प्रतिकारशक्ति अधिक असेल तर आजार होत नाही किंवा बळावत नाही. मुलांना उपाशी ठेवू नये. पण ताप आणि खाज यांमुळे खाण्याची वासना नसते. लहान मूल असेल तर तोंडात अजिबात अन्न घेत नाही. बाबापुता करावा लागतो. ताप लवकर उतरतो पण कंड पाचसहा दिवस राहातो. आणि कंडामुळे मुले अधिक हैराण होतात. चेहेर्‍यावर खपल्या धरल्यावर थोडी विद्रूपता येते. मुले आरशातले प्रतिबिंब पाहून धसका घेतात. पण व्रण राहात नाहीत. एखादाच कुठेतरी राहातो.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 04/21/2016 - 19:17 नवीन
स्वतः मी घेतलेला आहे लहानपणी. कांजिण्यांसाठी पण देतात हे खरंच माहित नव्हतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
स
सुबोध खरे Sun, 04/17/2016 - 16:56 नवीन
Ring me ९८१९१७००४९
  • Log in or register to post comments
उ
उल्का Sun, 04/17/2016 - 17:14 नवीन
सर्वप्रथम मी डॉक्टर नाही. पण अनुभव आहे. माझ्या मोठ्या मुलीला कांजण्या झाल्या तेव्हा डॉक्टरनी भविष्यवाणी केली होती की धाकट्याला नक्की होणार, न होण्यासाठी फार आटापिटा करून उपयोग नाही. तरीही मी माझ्या परीने पूर्णत: काळजी घेतली. अखेरीस डॉक्टरांची भविष्यवाणी खरी ठरून पंधरा ते वीस दिवसांनी मुलाला पण कांजण्या झाल्याच. ऐकीव पण खात्री नसलेली माहिती कंसात लिहित आहे. १. (आंघोळ घालू नये) डॉक्टरनी मात्र ताप नसेल तर रोज अंघोळ घालायला सांगितली होती. मी सुरवातीला एक दिवस आड घातली होती. २. साबाच्या सूचनेप्रमाणे अंघोळीच्या पाण्यात स्वछ धुतलेली कडुलिंबाची पाने घालत होते. ३. अंघोळ झाल्यावर हलक्या हाताने शक्यतो मलमल च्या कपड्याने अंग कोरडे करत होते. इथे फोड फुटता कामा नयेत म्हणून थोडी काळजी घ्यावी लागते. ४. त्यानंतर सर्व फोडांवर डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे Lacto Calamine लावत होते. त्याने थंड वाटून खाज पण पडत नाही. दिवसातुन दोन्तीनदा लावत असे. ५. औषधे फक्त तापावर होती. साबा च्या सूचनेप्रमाणे परीपाठादी काढा देत होते. ६. जेवण अतिशय हलके फुलके देत होते. तेलकट तुपकट मसालेदार अर्थातच नाही. ७. पाणी पिण्यास जास्तीत जास्त देत होते. शहाळ्याचे पाणी, फळांचा ताजा रस मधून मधून देत होते. दूध, ताक रोज देत होते. तुमचा इतरांचा आहार व्यवस्थित असू दे. हयगय करू नका. जेणेकरून तुमची प्रतिकारशक्ती वाढेल. (जेवढे वय जास्त तेवढा त्रास जास्त होतो. तीव्रता जास्त असते.) हे मात्र खरे असावे. मुलीला नववीत असताना आल्या आणि मुलगा तेव्हा पाचवीत होता. तिला खूप त्रास झाला. त्यामानाने मुलाला कमी झाला. (सुकल्यावर खपली पडताना हा संसर्ग पसरतो.) हेही खरे असावे. कारण मुलीच्या बऱ्या झाल्यानंतर ७-८ दिवसांनी मुलाला झाल्या होत्या. तेव्हा तुमच्या धाकट्या मुलाला खपल्या पडण्याच्या काळात पण दूर ठेवलेत तर उत्तम. (एकदा होउन गेल्या तर परत होत नाहीत.) हे खरे नसावे. माझ्या ओळखीत पुन्हा झालेल्या पाहिल्या आहेत. फक्त तीव्रता कमी असते. (फोड फोडल्यामुळे आणखी पसरतात.) शक्यतो मोठ्याला एकटे सोडू नका. एकटा असताना तो फोड फोडायची किंवा खाजवायची शक्यता आहे. काळजी घेतलेली बरी. मी समजू शकते तुमची अवस्था म्हणून सविस्तरपणे लिहिले आहे. माझे अनुभवाचे बोल आहेत तरीही काही चुकले असेल तर मिपा वरील डॉक्टर सांगतीलच तुम्हाला. एकच सांगायचं आहे की काळजी करू नका.
  • Log in or register to post comments
अ
अजया Sun, 04/17/2016 - 19:40 नवीन
कांजिण्या सेल्फ लिमिटिंग व्हायरल इंफेक्शन आहे.हल्ली त्याची लसही मिळते.पण एकदा होऊन गेल्यासही इम्युनिटी येते.मग लसची गरज नाही.पण आधी आलेली नसल्यास लसीकरण केल्याने कांजिण्या आल्या तरी कमी प्रमाणात येतात. कोणत्याही व्हायरल आजारात संसर्गाची भिती असते तसेच इथेही.पेशंटच्या वापरातल्या गोष्टी वेगळ्या ठेवणे. ट्रीटमेंट लक्षणाप्रमाणे देतात.तापाचे औषध ,खाजेवर थंड वाटणारे क्रिम इ. भरपूर पाणी, सूप इ द्रवपदार्थ जास्त.प्रोटिनयुक्त आहार जरुर द्यावा.
  • Log in or register to post comments
M
mugdhagode Tue, 04/19/2016 - 17:13 नवीन
सहा महिन्यापुर्वी आमच्या मुलीलाही कांजिण्या येऊन गेल्या... पण तो मात्र गमतीदार अनुभव होता. टॉम अँड जेरीमध्ये एकदा जेरी टोम झोपलेला असताना त्याच्या तोंडावर हळुच रंगाने ठिपके काढतो. त्याला गोवर आल्याचे सांगुन फसवतो . पण शेवटी दोघान खरोखरच गोवर होते. ते पाहुन आमच्या जेरीने मी झोपल्यावर मला अंगभर ठिपके काढले . दोन दिवसानी तिला खरोखरच कांजिण्या आल्या.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Wed, 04/20/2016 - 07:30 नवीन
सर्वांचे धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे मुलाची तब्येत अपेक्षेपेक्षा उत्तम आहे. काही कॉम्प्लीकेशन्स नाहीत. खोलीत एकटा बसबसून बोअर होतोय तेवढं सोडलं तर चिंता करण्यासारखं काही नाही. अंगावरचे फोड मॅनेजेबल आहेत. धन्यवाद मित्रहो. :)
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 04/20/2016 - 07:37 नवीन
वाचून बरं वाटलं. व्हायरल आजाराला औषधे काय असणार? लक्षणांनुसार त्रास कमी होईल अशी काही असतील तीच. माझी मुलगी लहान असताना तिला लस दिली होती. पण नंतर मुलाला दिली नव्हती. त्याला एकदा कांजण्या आल्या. पण लगेच उपचार सुरू झाल्यामुळे किंवा काही असेल त्याचे दुखणे अगदी थोडक्यात आटपले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ए
एस Wed, 04/20/2016 - 09:07 नवीन
वा. बरं वाटलं. मुलांना काही झालं की पालक म्हणून आपण नाही म्हटलं तरी अंमळ धास्तावतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
र
रेवती गुरुवार, 04/21/2016 - 19:16 नवीन
चला, बरं झालं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
न
नाखु Wed, 04/20/2016 - 07:58 नवीन
आणि पिल्लांना लवकर आराम येवो आणि ठणठणीत आरोग्य येण्यासाठी शुभेच्छा पालकायनी नाखु
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 04/21/2016 - 19:13 नवीन
बोअर होणं स्वाभाविक आहे. पण बरा होतोय ही चांगली गोष्ट आहे!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा