Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कन्या मानव्याची

G — gsjendra, Sun, 04/17/2016 - 08:36
मी अधीर मी बधीर मी रुधिर सबंध विश्वाचे मी स्तन्य मी चैतन्य चिवचिवाट अनन्य घरट्यातल्या चिमण्यांचा मी नागीन मी जोगीण मी वाघीण जगातल्या क्रांतीयूद्धाची मी स्वच्छंद मी अनिर्बंध मी मुक्तगंध अपत्य निसर्गाचे मी मोहिनी मी रोहिणी वंश वाहिनी प्रचंड जगपसर्‍याची मी सौंदर्य मी माधूर्य मी चातूर्य घराचे घरपण गजेंद्र भोसले आत्मशोध (काव्यसंग्रह)

प्रतिक्रिया द्या
3345 वाचन

💬 प्रतिसाद (22)
G
gsjendra Sun, 04/17/2016 - 08:37 नवीन
ओके
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित Sun, 04/17/2016 - 08:39 नवीन
पण काय ओके?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: gsjendra
अ
अभ्या.. Sun, 04/17/2016 - 09:02 नवीन
मी ओके ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित
स
सतिश गावडे Mon, 04/18/2016 - 06:14 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 04/18/2016 - 06:11 नवीन
मी केळं मी शहाळ मी रताळ उपासाला सिताफळ मी भेंडी मी वांगी मी पुंगी लालचुटुक गाजराची मी रिक्षा मी एसटी मी पी एम टी काळ्या कळकट धुराची मी म्हमद्या मी म्हादु मी साधू चल करुया जादू मी कावळा मी सावळा मी मावळा सतरा इंच छातीचा मी दगड मी बोकड मी मी माकड नारळाच्या झाडावरचे मी गाल मी पाल मी साल पिकलेल्या फणसाचे मी ओके मी ओके मी ओके ओके ओके हा टाटाचा ओके टाटाचा ओके धुण्याचा साबण कपडे जादा धोने वाला ओके जादा चलने वाला ओके ओके हा टाटाचा ओके टाटाचा ओके धुण्याचा साबण टाटाचा ओके धुण्याचा साबण टिंग टिंगटि डिंग श्रोते हो आता ऐकुया काही ठळक बातम्या......... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 04/18/2016 - 06:22 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ज
जेपी Mon, 04/18/2016 - 06:28 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
न
नाखु Wed, 04/20/2016 - 07:01 नवीन
म्हणतात धो धो धुणे..... एक डाव धोबीघाट पंखा नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
व
विजय पुरोहित Mon, 04/18/2016 - 06:38 नवीन
धन्य धन्य माऊली... कहरच अगदी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
च
चांदणे संदीप Mon, 04/18/2016 - 06:47 नवीन
कहर! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ज
जव्हेरगंज Mon, 04/18/2016 - 15:44 नवीन
हा हा हा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
प
पैसा Mon, 04/18/2016 - 17:18 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
स
सस्नेह Wed, 04/20/2016 - 08:07 नवीन
चरणकमल कुठे आहेत पैजारदेवा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
व
वेल्लाभट Wed, 04/20/2016 - 08:00 नवीन
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र काय ओ हे!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 04/20/2016 - 08:04 नवीन
मी प्लेट मी वेट मी सेट शेक प्रोटीनचा मी फसल मी मसल मी कसल बेटकुळ्या फुगलेल्या मी गजर मी अधर मी जबर गाडा आयुष्याचा मी शोध मी बोध मी क्रोध हरवलेल्या वेळाचा
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Wed, 04/20/2016 - 08:13 नवीन
________/\________ दोघांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
स
सनईचौघडा Wed, 04/20/2016 - 10:40 नवीन
आऽराऽरा पार बाजार उठवलाय की.. माझेही दोन पैसे... मी ओटा मी गोटा मी काटा पायात रुतणारा मी भांग मी रांग मी बांग मशिदीत दिली जाणारी मी भक्ष मी दक्ष मी अक्ष स्वतःभोवती फिरणारा मी मंदी मी कंदी मी संधी हातातुन निसटणारी मी वेग मी आवेग मी वेध भविष्याचा सजेंद्र चौसले अत्मबोध (स्वतःला स्वत:चा )
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित Wed, 04/20/2016 - 13:19 नवीन
_/\_ देर्देकर काका दंडवत घ्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सनईचौघडा
न
नाखु Wed, 04/20/2016 - 13:30 नवीन
मी मोठा मी खोटा मी सोटा पाठीत बसणारा मी अढी मी गढी मी दाढी नको तेंव्हा वाढणारी मी कडका मी धडका मी फडका इथली धूळ तिकडे करणारा मी खत्री मी संत्री मी मंत्री काय्द्यातून(सलामत) निसटणारा मी धागा मी जागा मी त्रागा अवकाळी भूच्छत्रीचा. खत्मशोध (कुणाला कशाचा )
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 04/21/2016 - 09:21 नवीन
अरारा! श्री कवी-धागाकर्ते, वाईट वाटून घेऊ नका. कविता लिहिण्यातली तुमची भावना पोचली. पण बाकी सगळ्या विडंबनकारांना दाद दिल्याशिवाय रहावत नाही! =))
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर गुरुवार, 04/21/2016 - 09:35 नवीन
मूळ कवींसकट इतरही सर्वांना __/\__ (आत्ता वेळ नाही, नाहीतर आमीबी भर घातल्यावीण सोडलं नसतं ;)
  • Log in or register to post comments
G
gsjendra Sun, 04/24/2016 - 15:42 नवीन
कविता म्हणल्यावर असं चालायचंच आपल्या माणसांनी असं खचकाटून बोलायचंच
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा