Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मोकळ्या दाही दिशा

आ — आनन्दा, Tue, 04/19/2016 - 08:44
शरदकाकांच्या धाग्याला प्रतिसाद म्हणून तिथे ही कविता टंकली होती. म्हणले धागा पण काढूया. - प्रेरणा कवितेचा पहिलाच प्रयत्न आहे. काही नाहीच राहिले झाले सगळे भोगून पार अंधारच सारा ना कवडसा कुठून माझ्या श्वासांनीच असा का रे अबोला धरिला माझ्या केसांचाच असा कसा गळफास झाला नाही ओढणार मला आता कुणाचेच पाश एकट्याने चालायची नाही राहिलीच आस आता मज ऐकू येते दूरवर किणकिण एक पाऊल टाकता थांबेल ही वणवण नाही उरला मनात रस आयुष्यात अश्या प्रवासाला अनंताच्या उघडल्या दहा दिशा

प्रतिक्रिया द्या
1273 वाचन

💬 प्रतिसाद (6)
व
विजय पुरोहित Tue, 04/19/2016 - 08:47 नवीन
सुंदर लिहिलेय. निराशा, दुर्दैव आणि वैराग्य यांत शब्द न्हाऊन निघालेले आहेत. आता मज ऐकू येते दूरवर किणकिण अंगावर काटाच आला...
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित Tue, 04/19/2016 - 09:02 नवीन
शीर्षकातील विडंबनात्मक टोन काढून टाकला तर बरे होईल असे वाटते!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित
आ
आनन्दा Tue, 04/19/2016 - 11:00 नवीन
ह्म्म.. काढायला पाहिजे खरा. संपादकांना विनंती, तो शक्य असल्यास काढावा. अवांतर - मोकल्या दाही दिशा चे भूत काही मानेवरून उतरू शकत नाही काही झाले तरी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित
ट
टवाळ कार्टा Tue, 04/19/2016 - 09:19 नवीन
शीर्षक वाचून आलेलो....अपेक्षाभंग झाला ;)
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 04/19/2016 - 09:23 नवीन
पार्था उचल ते धनुष्य आणि लाव बाण (विडंबनाचा) ! ता.क. यमकांचा ताजा साठा उपल्ब्ध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पैसा Tue, 04/19/2016 - 09:22 नवीन
पण खरंच अंगावर काटा आला. निराशा, वैराग्य, उदासी ओतप्रोत भरली आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा