Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चिरंतन भेट

म — मनमेघ, Tue, 04/19/2016 - 15:18
तिच्या मिठीचा गर्भरेशमी पोत छळे । नकळत कंठी मौनाचा अन् सूर जुळे ।। तिचे मौनही पल्याड देशी दरवळते । अल्याड देशी एकांताचे निळे तळे ।। दिशा भिन्न जरि, उरी असोशी पाझरते । ओझरती दिसतात डोळियांतील जळे ।। कुणा न कळते मौनाचे तारुण्य असे । क्वचित् कधितरी गाण्याचा त्या सूर गळे ।। तिच्या नि माझ्या मौनाला व्यापेल असा । तानपुरा होऊन सारखा चंद्र जळे ।। चिरंजीव ती मिठी, चिरंतन भेट तिची अंशात्मक ती अंशात्मक मज, पूर्ण मिळे ।। -चैतन्य

प्रतिक्रिया द्या
1623 वाचन

💬 प्रतिसाद (10)
व
विजय पुरोहित Tue, 04/19/2016 - 17:34 नवीन
सुंदर... अप्रतिम... पण जरा लय गडबडल्ये...
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 04/20/2016 - 07:11 नवीन
सहीच... सुरेख आहे
  • Log in or register to post comments
म
मनमेघ Wed, 04/20/2016 - 14:11 नवीन
प्रतिसादाबद्दल आभारी आहे विजयजी आणि वेल्लाभटजी. विजयजी, लय कुठे गडबडली सांगता का?
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित Wed, 04/20/2016 - 15:30 नवीन
क्वचित् कधितरी गाण्याचा त्या सूर गळे... याऐवजी यदाकदाचित गाण्याचा त्या सूर गळे असा बदल केला तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनमेघ
म
मनमेघ गुरुवार, 04/21/2016 - 08:46 नवीन
जसे लिहिले तसेच वाचले तर लय सांभाळली जाते. कधितरी यात धि ह्रस्व ठेवलाय, तो दीर्घ वाचला तर लय बिघडेल. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित
प
प्रसाद गोडबोले Wed, 04/20/2016 - 14:43 नवीन
खुपच सुंदर :)
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 04/20/2016 - 14:59 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 04/20/2016 - 15:08 नवीन
पहिली ओळ वाचली अन "वाचनखूण साठवा"वर क्लिक केलं! धन्यवाद, Sandy
  • Log in or register to post comments
म
मनमेघ गुरुवार, 04/21/2016 - 08:47 नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार _/\_
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 04/22/2016 - 05:59 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा