पु . ल . तुमच्यासाठी!
महाराष्ट्राचे लाडके दैवत
मनापासुनी हा केला गौरव
‘आपुलकी’ ही साऱ्यांची
उदंड केले प्रेम तुम्हावरी
‘पुरचुंडी’ ही तुम्ही बांधली
‘खिल्ली’ कोटयानी उडवली
‘पूर्वरंग’ हा तुम्ही सजवला
‘वंग-चित्रे’ ना साज चढवला
‘जावे त्यांच्या देशा’ जेव्हा
‘गणगोत’ सारे जमते तेव्हा
‘बटाटयाची चाळ’ असो
वा ‘वाऱ्यावरची वरात’ असो
भेटले ‘व्यक्ती आणि वल्ली’
‘हसवणूक’ ही झाली न्यारी
आम्हास वाटे ‘अपूर्वाई’
फळास आली आमुची पुण्याई
शब्दरूपी हा खजिना तुमचा
भाग्य आमुचे आम्हा लाभला
अनंत या हो उपकारांची
होऊ कशी मी उतराई
ऋणात राहुनी तुमच्या मी
सदैव ‘गुण गाईन आवडी’
– उल्का कडले
(ही कविता मी एक-दीड वर्षापूर्वी केली होती. खास पु. ल. ना श्रद्धांजली म्हणून. त्यांच्याच पुस्तकांमधून दिलेली.
ह्याचे कृपया विडंबन करू नये ही नम्र विनंती.)
💬 प्रतिसाद
(6)
श
शान्तिप्रिय
Tue, 04/19/2016 - 19:13
नवीन
छान कविता
पु लं च्या सर्व प्रसिद्ध पुस्तकांचा उल्लेख आवडला.
- Log in or register to post comments
उ
उल्का
Tue, 04/19/2016 - 20:03
नवीन
धन्यवाद!
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Wed, 04/20/2016 - 10:53
नवीन
आमची पण पु.लं ना श्रद्धांजली.
http://misalpav.com/node/32486
- Log in or register to post comments
उ
उल्का
Wed, 04/20/2016 - 11:06
नवीन
मला अशी कला अवगत नाही याची कायम खन्त वाटते. स्केच आवडले.
- Log in or register to post comments
क
किरण कुमार
Wed, 04/20/2016 - 12:29
नवीन
विडंबन करू नये.............. विडंबन करण्यासाठी एक प्रकारचा दर्जा हवा मूळ लेखनाला तो अजिबात नाही
असो .... पुस्तकांचा उल्लेख आवडला
- Log in or register to post comments
उ
उल्का
Wed, 04/20/2016 - 15:19
नवीन
माझ्या एका कवितेचे विडम्बन मिपा वरच लगेच केले गेले होते म्हणुन असे लिहिले.
दर्जा आहे किन्वा नाही हा वैयक्तिक द्रुष्टिकोन आहे.
- Log in or register to post comments