Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

येते आठवण अधून -मधून ....

अ — अविनाश लोंढे., गुरुवार, 04/21/2016 - 17:56
येते आठवण अधून -मधून , पहिल्या भेटीची , तहानलेल्या स्पर्शाची , तुझ्या नाजूक हातांची , अन त्यावर कोरलेल्या स्वप्नांची … येते आठवण अधून -मधून , पहिल्या चुंबनाची , निसटलेल्या ओठांची , तुझ्या डोळ्यातील आसवांची , अन एकाचवेळी बघितलेल्या चंद्राची …. येते आठवण अधून -मधून , पहिल्या प्रणयाची , लाखो धकधकींची , तुझ्या नयनांतील भीतीची , अन त्या क्षणी जगलेल्या एका जन्माची …… येते आठवण अधून -मधून , घरी सारे कळल्याची , तुझ्या थरथरनाऱ्या पायांची , मान -अपमानांची , अन तुझ्या चेहरा सुकल्याची येते आठवण अधून -मधून , तू पुन्हा -पुन्हा रड्ल्याची , दाबलेल्या माझ्या आसवांची , तुझ्या उतरलेल्या वजनांची , अन समाजाने दुखवलेल्या नसेची …. येते आठवण अधून -मधून , घर की प्रेम ह्या दुविधेची , जळलेल्या स्वप्नांची , आपले हात सुटल्याची , अन वेड्या मनातील वेड्या आक्रोशाची ……

प्रतिक्रिया द्या
2941 वाचन

💬 प्रतिसाद (8)
च
चांदणे संदीप गुरुवार, 04/21/2016 - 18:10 नवीन
आवाल्डी! \0/ \0/ \0/ Sandy
  • Log in or register to post comments
अ
अविनाश लोंढे. Sun, 04/24/2016 - 15:55 नवीन
धन्यवाद संदीप
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 04/24/2016 - 17:15 नवीन
मनातली उतरलीय. लागली मनाला. . येऊद्या अजून
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय गुरुवार, 09/22/2016 - 20:35 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अविनाश लोंढे. Tue, 04/26/2016 - 08:57 नवीन
धन्यवाद अभ्या..
  • Log in or register to post comments
स
सचिन चौगुले Wed, 09/21/2016 - 14:06 नवीन
उत्तम कविता!
  • Log in or register to post comments
ह
हलकट बाब्या गुरुवार, 09/22/2016 - 07:45 नवीन
छान आहे !!
  • Log in or register to post comments
स
सरदार Sat, 09/24/2016 - 09:07 नवीन
मस्त!!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा