व्यसन (?) मुक्ती
सध्या अनेक प्रश्न पडत आहेत.
व्यसन नेमकं कशाला म्हणावं?
कार्यालयीन काम करताना एखाद्या गोष्टीमुळे काम होत नसेल, कार्यक्षमता घटत असेल तर त्याला व्यसन म्हणावं का?
घरगुती अडचणी बाबत सातत्याने विचार डोक्यात येऊन काम होत नसेल तर काय करावे?
Whatsapp, मिपा, फेसबुक आणि तत्सम गोष्टी मध्ये 5 मिन 5 मिन करत तासंतास जात असतील तर त्याला व्यसन म्हणावे काय ?
या सगळ्यातून बाहेर पडता यावे म्हणून काय करणं आवश्यक आहे? कृपया मार्गदर्शन व्हावे.
वैतागलेला वैभ्या...
💬 प्रतिसाद
(5)
ए
एस
Fri, 04/22/2016 - 14:18
नवीन
व्यसन न करणे हा खरा विकल्प आहे. हे लक्षात न आल्यामुळे तुमचा लेख मुळातूनच गंडला आहे. हे तुम्ही आधी बेशर्त स्वीकृत करा. :-)
- Log in or register to post comments
व
वैभव जाधव
Fri, 04/22/2016 - 14:22
नवीन
अण्णा, अण्णा.
माणूस कावलंय, तुम्ही मस्करी काय करताय?
- Log in or register to post comments
ए
एस
Fri, 04/22/2016 - 14:25
नवीन
हाहाहा! अहो म्हणूनच तर थोडा विनोदाचा शिडकावा करतोय. ;-)
असो, ह. घ्या.
- Log in or register to post comments
भ
भाते
Fri, 04/22/2016 - 14:45
नवीन
'व्यसन' यावर मिपावर आधी आलेले हे दोन धागे मिळाले. इथे सविस्तर चर्चा झाली आहे.
फुकणं वाईट, फुकाडे नव्हे.
कोवळ्या वयातलं व्यसन
संपादक मंडळ / तांत्रिक समिती,
एक शंका, मिपावर नविन धागा काढल्यावर त्यासंबधीचे मिपावरचे आधीचे धागे What links here इथे दाखवणे शक्य आहे का?
तशी सोय आधीपासुन असेल तर माहित नाही पण आत्ता तरी हे धागे दिसले नाहीत.
- Log in or register to post comments
व
वैभव जाधव
Fri, 04/22/2016 - 18:18
नवीन
व्यसन म्हणजे सिगारेट किंवा दारु यापुरतं मर्यादित नसावं असं वाटत आहे. ज्या गोष्टीच्या असण्याने अथवा नसण्याने बेचैन होतं ती गोष्ट व्यसन मानायला हवी. त्या अनुषंगाने मनोकायिक व्यवहारात होणारे बदल कशा पद्धतीने stream line करता येतील, त्याची उपयुक्तता वाढवता येईल?
- Log in or register to post comments